जुने कामगार कायदे रद्द करून केंद्र सरकारने गेल्या वर्षी कामगार विरोधी ४ कामगार संहिता नवीन कायदे लागू केले आहेत. या कायद्यांमुळे अनिर्बंध कंत्राटी कामगार ठेवण्याचा अधिकार मालक वर्गाला दिला असल्यामुळे कामगारांना कामावरून काढून टाकण्याची बंधने शिथिल करण्यात आली आहेत. त्यामुळे कामगारांना साहजिकच नोकरीची सुरक्षा राहत नाही. तसेच अंगणवाडी सेविका यांच्या मानधनात वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे आमचे वेतन आयोग कुठे आहे हा संतप्त सवाल अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सरकारला केला आहेत. या व इतर मागण्यांसाठी सुमारे ३२०० अंगणवाडी सेविकांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन सुरु केले आहे.