...आता पासपोर्टशिवाय करता येणार विमान प्रवास; लवकरच होणार 'हा' मोठा बदल!
आजही विमानतळावर विमान पकडण्यापूर्वी प्रवाशांना एकदा नव्हे तर अनेक वेळा तपासणीच्या प्रक्रियेतून जावे लागते. जर प्रवास आंतरराष्ट्रीय असेल तर ही प्रक्रिया खूपच लांबलचक आणि थकवणारी असते. मात्र, आता लवकरच प्रवाशांची या सर्व त्रासातून सुटका होणार आहे. संयुक्त अरब अमिराती या देशातील अबुधाबीच्या झायेद आंतरराष्ट्रीय विमानतळावर लवकरच प्रवाशांना पासपोर्ट आणि ओळखपत्र न दाखवता चेक-इन आणि बोर्डिंग सारख्या सुविधा मिळणार आहेत. हे स्वप्नवत नसून, अगदी खरे आहे.
बायोमेट्रिक सेंसर बसवले जाणार
सीएनएन या आघाडीच्या वृत्तवाहिनीच्या रिपोर्टनुसार, अबू धाबी येथील झायेद आंतरराष्ट्रीय विमानतळावर लवकरच मोठे बदल होणार आहेत. या बदलांनंतर त्या विमानतळावरून नागरिकांचा आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक सुलभ होणार आहे. इनोव्हेटिव्ह स्मार्ट ट्रॅव्हल प्रोजेक्ट अंतर्गत, 2025 पर्यंत अबुधाबीचे झायेद आंतरराष्ट्रीय विमानतळ हे आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज होणार आहे. विमानतळाच्या प्रत्येक एन्ट्री आणि एक्सिट पॉईंटवर बायोमेट्रिक सेंसर बसवले जाणार आहे. ज्यामुळे विमान प्रवासासातील सुखकरपणा वाढणार आहे.
हेही वाचा : ‘या’ देशाच्या जीडीपीपेक्षाही अधिक आहे, भारतातील ‘या’ तीन कुटुंबांची संपत्ती!
काय म्हटलंय विमानतळ प्रशासनाने?
याबाबत माहिती देताना झायेद आंतरराष्ट्रीय विमानतळाचे मुख्य माहिती अधिकारी अँड्र्यू मर्फी यांनी म्हटले आहे की, बायोमेट्रिक सेन्सरची रचना कोणत्याही पूर्व-नोंदणीशिवाय करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत जेव्हा जेव्हा प्रवासी विमानतळाच्या प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या मार्गावरून जातात. तेव्हा ते आपोआप प्रवाशांची ओळख प्रमाणित करणार आहे. हे काम काही सेकंदात होणार असून, त्यामुळे विमानतळावर नागरिकांचा व्यर्थ जाणारा वेळही वाचणार आहे.
याआधीही वापरले जातंय ‘हे’ तंत्रज्ञान
परिणामी, अशा परिस्थितीत प्रवासी 15 मिनिटांत गेटवर पोहोचतील. हा अनुभव प्रवाशांसाठी अद्भुत असणार आहे. अँड्र्यू मर्फी म्हणाले आहे की, विमानतळाच्या काही भागात हे तंत्रज्ञान आधीच वापरले जात आहे. इतिहाद एअरलाइन्सची उड्डाणे आधीपासूनच वापरत आहेत. दरम्यान, जेव्हाही पर्यटक UAE मध्ये येतो. तेव्हा त्याचा बायोमेट्रिक डेटा, नागरिकत्व इत्यादींशी संबंधित माहिती इमिग्रेशन म्हणून घेतली जाते. आता या डेटाचा वापर करून त्या लोकांची बायोमेट्रिक ओळख विमानतळावर केली जाणार आहे.