BSNL Recharge Plan: अवघा एक दिवस शिल्लक! यूजर्स मिळणार डेली 2.6GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग... अशी आहे कंपनीची ऑफर
बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये यूजर्सना 365 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जात आहे. म्हणजेच एकदा रिचार्ज केल्यानंतर संपूर्ण वर्षभर चिंता करण्याची गरज नाही. ही खास ऑफर अशा यूजर्ससाठी सुरु करण्यात आली आहे, ज्यांना वारंवार रिचार्ज करायचा नसतो. तसेच मर्यादित काळासाठी उपलब्ध असलेल्या Bharat Connect 26 प्लॅनची किंमत 2626 रुपये आहे. हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना रोज 2.6GB डेटा मिळणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
Choose smarter connectivity with BSNL Bharat Connect 26 Plan and Enjoy 2.6GB data/day, unlimited calls, 100 SMS/day & 365 days validity all at just ₹2626. Recharge smart via #BReX 👉 https://t.co/41wNbHpQ5c
Offer valid till 24 Feb 2026. #BharatConnect26 #BSNL… pic.twitter.com/D13rPe5iS4 — BSNL India (@BSNLCorporate) February 22, 2026
तसेच या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देखील दिली जाणार आहे. कंपनीच्या या खास ऑफरमध्ये यूजर्सना रोज 100 एसएमएस ऑफर केले जाणार आहेत. या सर्व फायद्यांमुळे हा रिचार्ज प्लॅन एक आदर्श प्लॅन ठरतो. तुम्हाला जर हा प्लॅन खरेदी करायचा असेल तर तुम्हाला घाई करावी लागणार आहे कारण उद्या म्हणजेच 24 फेब्रुवारी रोजी ही ऑफर संपणार आहे.
यूजर्स बीएसएनएलच्या ऑफिशियल पोर्टल किंवा BReX (BSNL रिचार्ज अनुभव) चॅटबोटद्वारे नवीन रिचार्ज प्लॅन खरेदी करू शकतात. मात्र हा रिचार्ज प्लॅन खरेदी करायचा असेल तर लक्षात ठेवा की तुमच्याकडे शेवटचे अवघे काही तास शिल्लक आहेत. याबाबत कंपनीने देखील त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट करत माहिती दिली आहे. कंपनीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, बीएसएनएल भारत कनेक्ट 26 प्लॅनसह स्मार्ट कनेक्टिव्हिटी निवडा आणि फक्त 2626 रुपयांमध्ये 2.6 जीबी डेटा/दिवस, अमर्यादित कॉल, 100 एसएमएस/दिवस आणि 365 दिवसांची वैधता मिळवा.






