मोहोळ शहरात उभारण्यात आलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यासंदर्भात पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून, पुतळा अधिकृत परवानगीने उभारण्यात आला आहे की नाही याबाबत माहिती मागवण्यात आली आहे. पोलीस उपअधीक्षक संकेत देवळेकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, संबंधित जागा ही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीतील असून त्या जागेचे आरक्षण कशासाठी करण्यात आले आहे, याचीही माहिती मागवली आहे. त्यामुळे पुतळा उभारणीची कायदेशीर स्थिती स्पष्ट होणार आहे.