
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
ऑगस्ट 2022 मध्ये विमान उड्डाण सुरू केल्यापासून, अकासा एअरने उद्योगातील अनेक महत्त्वाचे टप्पे गाठले आहेत, कंपनीने जवळपास 30 दशलक्ष प्रवाशांना सेवा दिली आहे आणि भारतीय नागरी विमान वाहतुकीच्या इतिहासात सर्वात वेगाने वाढणारी विमान कंपनी ठरली आहे. तसेच इतक्या कमी वेळात 40 पेक्षा जास्त विमाने आपल्या ताफ्यात समाविष्ट करणारी अकासा एअर ही भारतातील पहिली विमान कंपनी बनली आहे. हे यश अकासाच्या मजबूत व्यवसाय मॉडेलला आणि ग्राहक केंद्रित नाविन्यपूर्ण उपक्रम व शाश्वत वाढीवरील त्यांच्या सततच्या ध्येयाला अधोरेखित करते.
अकासा एअरच्या वाढीच्या या प्रवासाचा मुख्य आधार म्हणजे त्यांचे सतत वाढत जाणारे निष्ठावंत ग्राहक आहे आणि त्यांच्या विश्वास, अभिप्राय आणि बदलत्या गरजांमुळेच अकासाचा प्रवास अनुभव अधिक चांगला बनण्यास मदत झाली आहे. ग्राहकांच्या या निष्ठेचा सन्मान करण्यासाठीच अकासा एलिव्हेट हा प्रोग्राम तयार करण्यात आला आहे, याद्वारे ग्राहकांना अधिक मूल्य, वैयक्तिक ओळख आणि प्रवासाचे खास फायदे मिळतील, तसेच अकासा एअरची नेहमीची आपुलकीची आणि विश्वासू सेवा पुढेही चालू राहील.
या प्रसंगी बोलताना, अकासा एअरचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुबे म्हणाले, “आम्ही अकासा एअरचा चौथा वर्धापन दिन साजरा करत असताना, आमच्यासोबत प्रवास करणाऱ्या लाखो ग्राहकांबद्दल आम्ही मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. त्यांचा विश्वास आणि निष्ठा आमच्या या प्रवासाचा मुख्य आधार राहिला आहे आणि यामुळेच आम्हाला अकासाचा अनुभव अधिक चांगला करण्याची सतत प्रेरणा मिळाली आहे”.
ते पुढे म्हणाले की, “आम्ही करत असलेल्या प्रत्येक कामाच्या केंद्रास्थानी ग्राहकाला ठेवण्याच्या आमच्या तत्त्वज्ञानाचे प्रतीक म्हणजे अकासा एलिव्हेट. हा प्रोग्राम अत्यंत सोपा, सहज उपलब्ध आणि खरोखरच फायदेशीर ठरेल अशा पद्धतीने तयार करण्यात आला आहे, यामुळे सदस्यांना त्यांच्या अगदी पहिल्या प्रवासापासूनच फायदे मिळण्यास सुरुवात होते, तसेच उच्च टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी एक जलद आणि सोपा मार्ग मिळतो. अर्थपूर्ण बक्षिसे, विना अडथळे येणारे अनुभव आणि वैयक्तिक ओळख यांची सांगड घालून आम्ही ग्राहकांसोबतचे नाते अधिक घट्ट करत आहोत आणि प्रत्येक वेळी विमानाने प्रवास करताना अकासाचीच निवड करण्यासाठी त्यांना अधिक कारणे देत आहोत. आम्ही आमच्या पाचव्या वर्षात पदार्पण करत असताना, आमचे संपूर्ण लक्ष शिस्तबद्ध वाढ, उत्कृष्ट कार्यपद्धती, कर्मचारी-केंद्रित दृष्टिकोन आणि ग्राहकांसाठी वेगळा अनुभव देण्यावरच राहील.”
विमान कंपनी जसजसा आपल्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मार्गांचा विस्तार करत आहे आणि सेवा अधिक उत्तम करत आहेत, तसतसे अकासा एलिव्हेट देखील नवीन क्षमता, भागीदारी आणि फायद्यांसह आणखी प्रगत होत राहील, यामुळे ग्राहक जेव्हा जेव्हा अकासा एअरने प्रवास करण्याची निवड करतील, तेव्हा त्यांना प्रत्येक वेळी अधिक फायदा मिळेल.