Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुल, क्रेन अन् उंच इमारती होणार अधिक दणकट! AM/NS India ने लाँच केल्या ‘स्ट्रक्ट्रोमॅक्स’, ‘वेल्डस्टार’ हेवी स्टील प्लेट्स

AM/NS India : आर्सेलरमित्तल निप्पॉन स्टील इंडियाने भारतातील पायाभूत सुविधा, बांधकाम, वाहतूक आणि अवजड अभियांत्रिकी क्षेत्रासाठी 'स्ट्रक्ट्रोमॅक्स' आणि 'वेल्डस्टार' या दोन प्रगत हेवी स्टील प्लेट ब्रँडचे लाँचिंग केले आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 11, 2026 | 02:36 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • पुल, क्रेन अन् उंच इमारती होणार अधिक दणकट!
  • AM/NS India ने लाँच केल्या हेवी स्टील प्लेट्स
  • ग्रीन स्टील सर्टिफिकेशनसह मिळतील ‘हे’ फायदे
AM/NS India : आर्सेलरमित्तल निप्पॉन स्टील इंडिया ( AM/NS INDIA ) ने आज भारतातील वाढत्या पायाभूत सुविधा, उत्पादन, बांधकाम, ऊर्जा, वाहतूक आणि अवजड अभियांत्रिकी क्षेत्रांसाठी विकसित केलेल्या स्ट्रक्ट्रोमॅक्स आणि वेल्डस्टार या दोन नव्या हेवी स्टील प्लेट ब्रँडचे लॉन्चिंग जाहीर केले.गुजरातमधील हजीरा येथील एएम/एनएस इंडियाच्या अत्याधुनिक प्लेट मिल प्रकल्पात विकसित करण्यात आलेली ही नवीन उत्पादने प्रगत रोलिंग आणि उष्णता उपचार तंत्रज्ञानासोबत अचूक धातुकर्म प्रक्रिया आणि गुणवत्तेचे कठोर नियंत्रण यांचा समन्वय साधतात.

Railway Porter Loot : कुलींची दादागिरी… प्रवाशाकडून उकळले तब्बल 4700 रुपये, तक्रार होताच रेल्वेने घेतला कठोर निर्णय

हवामानाच्या परिस्थितीतही  टिकाऊ संरचना उभारण्यास मदत

स्ट्रक्ट्रोमॅक्स हे थर्मो-मेकॅनिकल कंट्रोल्ड प्रोसेसिंग (TMCP) तंत्रज्ञानाचा वापर करून विकसित करण्यात आले आहे. पूल, उंच इमारती, समुद्रातील प्रकल्प, रेल्वे, पवन ऊर्जा प्रकल्प तसेच इतर अवजड क्षेत्रांमध्ये त्याचा वापर करता येतो.या स्टील प्लेटमध्ये उत्कृष्ट वेल्डिंग क्षमता, मजबुती, भार सहन करण्याची क्षमता, गंजरोधकता आणि फॅब्रिकेशन कार्यक्षमता आहे. त्यामुळे अभियंते आणि प्रकल्प विकासकांना आव्हानात्मक कार्यप्रणाली किंवा हवामानाच्या परिस्थितीतही स्थिर आणि टिकाऊ संरचना उभारण्यास मदत होते.

वेल्डस्टार ही अतिउच्च सामर्थ्याच्या स्टील प्लेटची श्रेणी

वेल्डस्टार ही अतिउच्च सामर्थ्याच्या स्टील प्लेटची श्रेणी आहे. यामुळे अभियंत्यांना सुरक्षितता आणि टिकाऊपणाशी कोणतीही तडजोड न करता संरचनांचे वजन कमी करण्यास, भार वाहून नेण्याची क्षमता वाढविण्यास, इंधनाची बचत करण्यास आणि संपूर्ण कार्यकाळातील खर्च कमी करण्यास मदत होते.वेल्डस्टार प्रामुख्याने क्रेन, खाणकामासाठी लागणारी उपकरणे, वाहतूक व्यवस्था, समुद्रातील प्रकल्प तसेच इतर महत्त्वपूर्ण वापरांसाठी विकसित करण्यात आले आहे. त्यामुळे दीर्घकाळातील संचालनाचा खर्च कमी करण्यास मदत होते.

देशांतर्गत क्षमता अधिक मजबूत होण्यास मदत

AM/NS इंडियाचे संचालक आणि उपाध्यक्ष – विक्री व विपणन, रंजन धर म्हणाले, “भारताच्या पायाभूत सुविधा आणि उत्पादन क्षेत्राच्या विकासाच्या पुढील टप्प्यासाठी अधिक गुंतागुंतीच्या प्रकल्पांमध्ये अधिक मजबुती, विश्वासार्हता आणि कार्यक्षमता देणाऱ्या स्टीलच्या उपाययोजनांची गरज भासणार आहे. स्ट्रक्ट्रोमॅक्स आणि वेल्डस्टारमुळे भारतीय अभियंते, फॅब्रिकेटर्स आणि उत्पादकांसाठी उपलब्ध असलेल्या प्रगत हेवी प्लेटच्या पर्यायांमध्ये वाढ होईल. तसेच उच्च-मूल्याच्या वापरासाठी देशांतर्गत क्षमता अधिक मजबूत होण्यास मदत मिळेल.”

ग्रीन स्टील टॅक्सोनॉमी अंतर्गत 3-स्टार रेटिंग

एएम/एनएस इंडियाच्या हेवी प्लेट उत्पादनांच्या श्रेणीतील एक महत्त्वाचा केंद्रबिंदू म्हणजे शाश्वत स्टीलनिर्मितीची बांधिलकी. एएम/एनएस इंडियाच्या हेवी प्लेट उत्पादनांना हरित स्टील प्रमाणपत्र मिळाले असून, डिसेंबर 2024 मध्ये सुरू करण्यात आलेल्या केंद्रीय पोलाद मंत्रालयाच्या ग्रीन स्टील टॅक्सोनॉमी अंतर्गत त्यांना 3-स्टार रेटिंग देण्यात आले आहे.

या चौकटीमध्ये प्रति टन तयार स्टीलच्या उत्पादनातून होणाऱ्या कार्बन उत्सर्जनाच्या आधारे स्टीलचे वर्गीकरण केले जाते. तसेच विविध स्टील उत्पादनांच्या शाश्वततेच्या कामगिरीचे मूल्यांकन आणि तुलना करण्यासाठी पारदर्शक व प्रमाणित, स्टार-आधारित प्रमाणपत्र प्रणाली उपलब्ध करून दिली जाते.

ग्राहकांसोबत जवळून काम

स्ट्रक्ट्रोमॅक्स आणि वेल्डस्टारचे लॉन्चिंग हे पायाभूत सुविधा, अभियांत्रिकी आणि उत्पादन क्षेत्रातील बदलत्या गरजा पूर्ण करणाऱ्या स्टीलच्या उपाययोजना विकसित करण्यासाठी ग्राहकांसोबत जवळून काम करण्यावर एएम/एनएस इंडियाचा असलेला भर दर्शवते.या उत्पादनांमुळे पूल आणि औद्योगिक संरचनांपासून ते क्रेन, खाणकामासाठी लागणारी उपकरणे आणि वाहतूक व्यवस्थेपर्यंतच्या विविध प्रकल्पांना मदत मिळण्याची अपेक्षा आहे. यामुळे भारतातील देशांतर्गत उत्पादन परिसंस्था अधिक मजबूत होण्यासही हातभार लागणार आहे.

Gold Hallmarking : सोन्याची खरेदी करताय? सरकारने घेतला मोठा निर्णय, फसवणूक टाळण्यासाठी ‘या’ गोष्टी नक्की तपासा

Web Title: Am ns india launches structromax and weldstar heavy steel plates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2026 | 02:36 PM

Topics:  

  • Business News
  • Largest Steel Plant
  • Marathi News
  • Steel Plant
  • structural audit

संबंधित बातम्या

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
1

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

भारतातील Data Center विस्तारामुळे रोजगाराची मोठी संधी! 1 लाख इंजिनिअरिंग नोकऱ्या अन् 300 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक
2

भारतातील Data Center विस्तारामुळे रोजगाराची मोठी संधी! 1 लाख इंजिनिअरिंग नोकऱ्या अन् 300 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
3

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

Trump-Zelensky News : युक्रेनला मिळणार Patriotची ताकद; ट्रम्प यांनी घेतला ‘अंतिम निर्णय’!
4

Trump-Zelensky News : युक्रेनला मिळणार Patriotची ताकद; ट्रम्प यांनी घेतला ‘अंतिम निर्णय’!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.