Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amazon चा पहिला ‘शॉपिंग एक्सपिरियन्स रिपोर्ट’ प्रसिद्ध; बनावटगिरी आणि फसवणुकीविरुद्ध ॲमेझॉनची मोठी मोहीम

ॲमेझॉनने आपला पहिला जागतिक 'ट्रस्टवर्दी शॉपिंग एक्सपिरियन्स रिपोर्ट' प्रसिद्ध केला आहे. बनावट उत्पादने, घोटाळे आणि एआय तंत्रज्ञानाद्वारे ग्राहकांचे संरक्षण कसे केले जाते, याची सविस्तर माहिती वाचा.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 08, 2026 | 02:02 PM
Amazon चा पहिला 'शॉपिंग एक्सपिरियन्स रिपोर्ट' प्रसिद्ध (Photo Credit- X)

Amazon चा पहिला 'शॉपिंग एक्सपिरियन्स रिपोर्ट' प्रसिद्ध (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • Amazon चा पहिला ‘शॉपिंग एक्सपिरियन्स रिपोर्ट’ प्रसिद्ध
  • बनावटगिरी आणि फसवणुकीविरुद्ध ॲमेझॉनची मोठी मोहीम
अॅमेझॉनने आज आपला पहिला ट्रस्टवर्दी शॉपिंग एक्सपिरियन्स रिपोर्ट प्रसिद्ध केला. हा अहवाल अॅमेझॉन आपल्या जागतिक स्टोअरमध्ये ग्राहक, विक्री भागीदार आणि ब्रँड्सचे संरक्षण कसे करते, याचा सर्वसमावेशक आढावा देतो. बनावटगिरी रोखणे, उत्पादनांची सुरक्षितता, घोटाळ्यांपासून बचाव, विश्वसनीय रिव्ह्यूज आणि संघटित किरकोळ गुन्हेगारी यांविरुद्ध अॅमेझॉनने केलेल्या कार्याची माहिती पहिल्यांदाच या अहवालाद्वारे एकत्रितपणे समोर आली आहे. हा अहवाल अॅमेझॉनचे स्टोअर सुरक्षित आणि विश्वासार्ह ठेवण्यासाठी वापरली जाणारी यंत्रणा, तंत्रज्ञान आणि भागीदारी यांवर प्रकाश टाकतो.

वर्ल्डवाइड कस्टमर अँड पार्टनर ट्रस्टचे उपाध्यक्ष रोहन ओम्मेन म्हणाले, “आमचे ग्राहक, ब्रँड्स आणि विक्रेते या सर्वांसाठी स्टोअरचे संरक्षण करणे हे ध्येय आहे. पण, ग्राहकांच्या संरक्षणासाठी बनवलेल्या धोरणांमुळे कधी-कधी आपला व्यवसाय वाढवू पाहणाऱ्या विक्रेत्यांना अडचणी येऊ शकतात, हे आम्हाला समजते. म्हणून आम्ही अॅमेझॉन अकाउंट हेल्थ डॅशबोर्ड सारख्या साधनांमध्ये गुंतवणूक केली आहे, जे विक्रेत्यांना धोरणांचे पालन, कामगिरीची उद्दिष्टे आणि इतर गोष्टींमध्ये पारदर्शकता व नियंत्रण देते. कायदेशीर विक्री भागीदार अॅमेझॉनवर प्रगती करू शकतील याची खात्री करणे हे आमच्या मोहिमेचा मुख्‍य उद्देश आहे आणि या अहवालामधून ती कटिबद्धता दिसून येते.”

अॅमेझॉनचा दृष्टिकोन चार परस्पर जोडलेल्या स्तंभांवर आधारलेला आहे:

1) सक्रिय नियंत्रण, जे समस्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच थांबवतात

2) शक्तिशाली साधने, जी जोखमींचा आधीच अंदाज घेतात

3) गैरप्रकार करणाऱ्यांना जबाबदार धरणे, आणि

4) ग्राहकांचे संरक्षण व प्रबोधन करणे.

या प्रत्येक स्तंभाची कार्यपद्धती स्पष्ट करणारे काही ठळक मुद्दे खालीलप्रमाणे आहेत:

1. ग्राहकांपर्यंत समस्या पोहोचण्यापूर्वीच रोखणे

अॅमेझॉन कायदेशीर व्यवसायांसाठी विक्री खाते सुरू करणे सुलभ करते, परंतु स्वतःची खोटी माहिती देणाऱ्या फसव्या विक्रेत्यांना प्रत्येक टप्प्यावर जाणीवपूर्वक अडथळ्यांचा सामना करावा लागतो. स्टोअरमध्ये विक्री सुरू करण्यापूर्वी सर्व नवीन विक्रेत्यांना अॅमेझॉनची पडताळणी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे. विक्रेत्याच्या प्रवासावर सतत देखरेख ठेवली जाते. उत्पादन तपशील पृष्ठांवर दररोज होणाऱ्या अब्जावधी बदलांच्या प्रयत्नांचे ‘ऑटोमेटेड तंत्रज्ञान’ आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) द्वारे स्कॅनिंग केले जाते, ज्‍यामुळे संभाव्य गैरप्रकारांचे संकेत शोधता येतील. मल्‍टीमोडल यंत्रणा मजकूर, फोटो, विक्रेत्याची वर्तवणूक आणि पुरवठा साखळीचे नमुने अशा अब्जावधी सिग्नलचे एकाच वेळी विश्‍लेषण करते, ज्‍यामुळे ग्राहकांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच संभाव्य गैरप्रकार ओळखण्यास मदत करते.

युद्धाच्या परिस्थितीत Trump यांना मोठा धक्का…,10 % Tarrif कोर्टाकडून रद्द! काय परिणाम होणार?

अॅमेझॉनने उत्पादनांची सत्यता तपासण्याकरिता मान्यताप्राप्त सेफ्टी लॅबोरेटरीजसोबत प्रत्‍यक्ष काम करण्यासाठी डायरेक्ट प्रॉडक्ट व्हॅलिडेशन प्रोग्राम सुरू केला आहे. तसेच, ओम्नीस्कॅन ही प्रगत मशीन लर्निंग यंत्रणा अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, तुर्की, सौदी अरेबिया आणि युरोपमधील जागतिक नेटवर्कमध्ये तैनात केली आहे. ही यंत्रणा उत्पादनांची सूची तयार होण्यापूर्वी मोठ्या प्रमाणावर सुरक्षा तपशीलांची पडताळणी करते. या यंत्रणेने 12 दशलक्षहून अधिक उत्पादनांसाठी इमेज सेट्स तयार केले आहेत.

ग्राहकांच्या रिव्ह्यूजची सत्यता जपण्यासाठी अॅमेझॉनची यंत्रणा स्टोअरमध्ये रिव्ह्यू दिसण्यापूर्वी अब्जावधी रिव्ह्यूजमधील हजारो डेटा पॉईंट्सचे विश्‍लेषण करते. यासाठी 1995 पासूनच्या रिव्ह्यू डेटाचा वापर बनावट किंवा आक्षेपार्ह मजकूर शोधण्यासाठी केला जातो. 2025 मध्ये, कंपनीने संशयास्पद असणारे कोट्यवधी बनावट रिव्ह्यूज आधीच सक्रियपणे ब्लॉक केले आहेत.

2. जोखीम निर्माण होण्यापूर्वीच तिचा अंदाज घेणे

अॅमेझॉनने अर्ली वॉर्निंग सिस्‍टम (पूर्वसूचना देणारी यंत्रणा) विकसित केली आहे, जी नवीन ब्रँड्स आणि उत्पादनांना असलेला धोका ते कॅटलॉगमध्ये येण्यापूर्वीच ओळखू शकते. सोशल मीडिया आणि इतर किरकोळ विक्रेत्यांकडून मिळणाऱ्या रिअल-टाइम सिग्नलचा वापर करून अॅमेझॉन संभाव्य उल्लंघनाचा अंदाज लावू शकते. काही प्रकरणांमध्ये, ब्रँड मालकांनी त्यांची बौद्धिक संपदा (आयपी) शेअर करण्यापूर्वीच हे ओळखले जाते. 2025 मध्ये, सोशल मीडियावर ट्रेंड होत असलेल्या एका नवीन व्हायरल ब्रँडेड उत्पादनावर फसव्या विक्रेत्यांनी केलेला हल्ला अॅमेझॉनच्या टीमने आधीच ओळखला आणि ब्रँड मालकाने माहिती देण्याच्या पूर्ण आठ दिवस आधीच उल्लंघन करणाऱ्या सूची ब्लॉक केल्या.

हाच पूर्वअंदाज घेण्याचा दृष्टिकोन घोटाळ्यांपासून बचावासाठी देखील वापरला जातो. अॅमेझॉनने गेल्या वर्षी सेन्ट्रिक्‍स हे एआय तंत्रज्ञान लाँच केले आहे, जे घातक वेबसाइट्स ओळखण्याची आणि काढून टाकण्याची क्षमता वाढवते. सेन्ट्रिक्‍सच्या स्वयंचलित शोध क्षमतेमुळे संभाव्य फिशिंग वेबसाइट्सचा शोध लावला जातो, ज्यामुळे फिशिंग यूआरएल काढून टाकण्याच्या प्रमाणात 10 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे.

3. गैरप्रकार करणाऱ्यांना जबाबदार धरणे

अॅमेझॉन जागतिक घोटाळे रोखणे, संघटित किरकोळ गुन्हेगारी, सायबर गुन्हे, बनावटगिरी अंमलबजावणी आणि रिटर्न व रिफंड फसवणूक यांसारख्या बेकायदेशीर क्रियाकलापांच्या विविध क्षेत्रांत गैरप्रकार करणाऱ्यांचा शोध घेते. 2020 मध्ये सुरू झाल्यापासून, अॅमेझॉनच्या काउंटरफीट क्राईम्स युनिटने 14 देशांमध्ये 32,000 हून अधिक गैरप्रकार करणाऱ्यांविरुद्ध खटले आणि गुन्हेगारी संदर्भांद्वारे कारवाई केली आहे. 2025 मध्ये, अॅमेझॉनने जगभरात 15 दशलक्षहून अधिक बनावट उत्पादने ओळखली, जप्त केली आणि त्यांची योग्य विल्हेवाट लावली. तसेच, कंपनीच्या कायदेशीर कारवायांमुळे बनावट रिव्ह्यूज आणि घोटाळ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या १०० हून अधिक वेबसाइट्स बंद करण्यात आल्या. कंपनी अमेरिकेतील अॅटर्नी जनरलच्या नेतृत्वाखालील 10 संघटित किरकोळ गुन्हेगारी टास्क फोर्सची सदस्य देखील आहे.

अॅमेझॉन सीमेपलीकडे देखील कार्य करते. अॅमेझॉनने चीनमधील कायदे अंमलबजावणी संस्था आणि ब्रँड्ससोबत केलेल्या सहयोगामुळे बनावट उत्पादनांचे उत्पादक, पुरवठादार आणि वितरकांविरुद्ध ७० हून अधिक यशस्वी स्थानिक छापेमारी करण्यात आल्या. या कारवायांमुळे दंडासह कारावासासारख्या गुन्हेगारी शिक्षा सुनावण्यात आल्या आहेत.

4. ग्राहकांचे संरक्षण आणि सक्षमीकरण

2025 मध्ये, अॅमेझॉनने लाखो ग्राहकांशी थेट संपर्क साधून त्यांनी खरेदी केलेल्या उत्पादनांच्या सुरक्षिततेबद्दल माहिती दिली. तसेच, सात देशांमधील 34 ग्राहक संघटनांशी भागीदारी करून 71 महत्त्वाच्या विषयांवर सुरक्षा सरकार एखाद्या उत्पादनाला रिकॉल करण्याची घोषणा करते, तेव्हा त्या उत्पादनाचा परिणाम झालेल्या प्रत्येक ग्राहकाला वैयक्तिक नोटिफिकेशन मिळते. यामध्ये त्या उत्पादनातील धोक्याची माहिती आणि रिफंड, रिटर्न किंवा दुरुस्तीच्या पर्यायांची लिंक दिली जाते. हे प्रयत्‍न फक्त अॅमेझॉनच्या स्टोअरपुरते मर्यादित नाहीत. जगभरातील सरकार, सुरक्षा संस्था आणि ग्राहक हक्‍क गटांच्या सहयोगाने अॅमेझॉन खात्री घेते की, प्रत्येक ग्राहकाकडे आत्मविश्वासाने आणि सुरक्षितपणे खरेदी करण्यासाठी आवश्यक माहिती व साधने उपलब्ध असतील. या अहवालात वर्णन केलेल्या यंत्रणा दररोज विकसित होत आहेत, ज्यामध्ये दशकांचा अनुभव, अब्जावधी डेटा पॉईंट्स आणि ग्राहकांकडून मिळणाऱ्या सातत्यपूर्ण अभिप्रायाचा आधार घेतला जात आहे. एक विश्वासार्ह खरेदी अनुभव तयार करणे हा निरंतर प्रवास आहे. या प्रवासात आतापर्यंत झालेली प्रगती, उर्वरित आव्हाने आणि हे कार्य पुढे नेण्यासाठी असलेली वचनबद्धता, यांचा अॅमेझॉनने आतापर्यंतचा सर्वात पारदर्शक आढावा या अहवालात दिला आहे.

तसेच, हा अहवाल अॅमेझॉनच्या त्या अलीकडील घोषणेनंतर आला आहे, ज्यामध्ये त्यांनी आपल्या काउंटरफीट क्राईम्स युनिटचा विस्तार भारतात करण्याची माहिती दिली होती. यामुळे जगातील वेगाने वाढणारी ई-कॉमर्स बाजारपेठ भारतात स्थानिक तज्ञ आणि यंत्रणा अधिक सक्रिय होतील. या पावलामुळे अॅमेझॉनला भारतातील ब्रँड्स, विक्रेते आणि कायदे अंमलबजावणी संस्थांसोबत अधिक जवळून काम करण्यास मदत होईल. यामुळे बनावटगिरीचे प्रकार वेगाने ओळखणे, बौद्धिक संपदेचे संरक्षण करणे आणि आवश्यक तेथे कठोर कायदेशीर कारवाई करणे शक्य होईल, ज्‍यासह भारतातील ग्राहकांसाठी कंपनीची व्‍यापक कटिबद्धता अधिक दृढ होईल.

Share Market Today: सेन्सेक्स-निफ्टीवर दबाव, गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचं वातावरण, बाजारात मोठी घसरण होणार का?

Web Title: Amazon first trustworthy shopping experience report fake products prevention

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2026 | 02:01 PM

Topics:  

  • amazon
  • Business News

संबंधित बातम्या

परिस्थिती गंभीर! Modi चं आवाहन, Trump चा निर्णय, कच्च्या तेलाच्या किमती करणार मार्केटवर तिहेरी परिणाम? आता…
1

परिस्थिती गंभीर! Modi चं आवाहन, Trump चा निर्णय, कच्च्या तेलाच्या किमती करणार मार्केटवर तिहेरी परिणाम? आता…

Share Crash: बुडाले रे बुडाले… एका मिनिटांत 1700 कोटींची संपत्ती खाक, गुंतवणूकदारांमध्ये खळबळ, नेमकं काय घडलं?
2

Share Crash: बुडाले रे बुडाले… एका मिनिटांत 1700 कोटींची संपत्ती खाक, गुंतवणूकदारांमध्ये खळबळ, नेमकं काय घडलं?

Retirement Planning: म्हातारपणात 1 कोटी रुपये पुरतील का? निवृत्तीनंतर सुखी आयुष्यासाठी ‘हा’ आहे नवा मॅजिक नंबर
3

Retirement Planning: म्हातारपणात 1 कोटी रुपये पुरतील का? निवृत्तीनंतर सुखी आयुष्यासाठी ‘हा’ आहे नवा मॅजिक नंबर

Stock Market Crash: भीतीचं वातावरण… बाजार सुरु होताच कोसळला; सोनं, Petrol-Diesel बाबत मोदींच्या आवाहनानंतर मोठा परिणाम?
4

Stock Market Crash: भीतीचं वातावरण… बाजार सुरु होताच कोसळला; सोनं, Petrol-Diesel बाबत मोदींच्या आवाहनानंतर मोठा परिणाम?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.