Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

क्रिकेट मॅचदरम्यान कंडोम आणि डेटिंग Apps च्या जाहिरातींवर बंदी घाला! CTI चे ICC अध्यक्ष जय शाह यांना खळबळजनक पत्र

क्रिकेट सामन्यांच्या प्रक्षेपणादरम्यान कंडोम, लैंगिक समस्यांशी संबंधित औषधे आणि डेटिंग ॲप्सच्या जाहिरातींवर बंदी घालण्याची मागणी करणारी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्रीने या संदर्भात ICC लाअध्यक्ष जय शाह यांना अधिकृत पत्र लिहून या जाहिरातींवर तात्काळ बंदी घालण्याची मागणी केली.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 06, 2026 | 07:30 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • क्रिकेट मॅचदरम्यान कंडोम आणि डेटिंग Apps च्या जाहिरातींवर बंदी घाला!
  • CTI चे ICC अध्यक्ष जय शाह यांना खळबळजनक पत्र
  • पालकांसाठी परिस्थिती अस्वस्थ करणारी – CTI 
क्रिकेट मॅचदरम्यान टेलिव्हिजन दाखवल्या जाणाऱ्या जाहिरातीवरुन वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्रीने CTI आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांच्या प्रसारणादरम्यान प्रौढांसाठीच्या जाहिरातींवर आक्षेप घेतला आहे. त्यांनी ICCचे अध्यक्ष जय शाह यांना पत्र लिहित हा आक्षेप घेतला. या पत्रात, CTI चे अध्यक्ष ब्रिजेश गोयल यांनी कुटुंबासोबत सामना पाहण्याच्या वेळेत कंडोम, डेटिंग ॲप आणि इतर प्रौढांसाठीच्या जाहिरातींच्या प्रसारणावर संपूर्ण बंदी घालण्याची मागणी केली आहे. नेमकी काय आहे मागणी ? त्यामुळे काय परिणाम होणार आहे?

PF पेमेंट करणं झालं सोपं! IDFC FIRST Bank ला EPFO ची मान्यता; पाहा कशी आहे ऑनलाईन प्रक्रिया

आपल्या पत्रात, CTI ने ४ जुलै २०२६ रोजी इंग्लंडमधील मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड येथे खेळल्या गेलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्याचा संदर्भ दिला आहे. संस्थेनुसार, सामन्याच्या षटकांच्या मधल्या वेळेत, जेव्हा लाखो लोक आपल्या कुटुंबासोबत थेट सामना पाहत होते, तेव्हा ड्यूरेक्स कंडोमची एक जाहिरात प्रसारित करण्यात आली होती.

पालकांसाठी परिस्थिती अस्वस्थ करणारी -CTI

CTI चा दावा आहे की, देशात १६ वर्षांखालील मुलांसह अंदाजे ४४ कोटी लोक क्रिकेट पाहतात. त्यामुळे, अशा जाहिरातींमुळे प्रेक्षकांसाठी, विशेषतः आपल्या कुटुंबासोबत सामने पाहणाऱ्या मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी अस्वस्थ करणारी परिस्थिती निर्माण होते.
पत्रात, CTI चे अध्यक्ष ब्रिजेश गोयल यांनी म्हटले आहे की, भारतात क्रिकेट हा केवळ एक खेळ नाही, तर लोकांच्या भावनांमध्ये खोलवर रुजलेला विषय आहे. त्यांनी आपला एक वैयक्तिक अनुभवही सांगितला की, त्यांचा १३ वर्षांचा मुलगा त्यांच्यासोबत सामना पाहत होता आणि कंडोमची जाहिरात प्रसारित होत असताना त्याने त्यासंबंधी प्रश्न विचारले, ज्यामुळे त्याच्यासाठी अस्वस्थ करणारी परिस्थिती निर्माण झाली. संस्थेचे म्हणणे आहे की, देशभरातील अनेक कुटुंबे अशाच परिस्थितीचा सामना करत असतील.

CTI ची मागणी काय?

CTI ने मागणी केली आहे की, ICC ने सायंकाळी ७ ते रात्री ११ या कौटुंबिक प्रसारण वेळेत प्रसारित होणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांदरम्यान कंडोम, डेटिंग ॲप आणि इतर प्रौढ जाहिरातींच्या प्रसारणावर बंदी घालण्यासाठी स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे जारी करावीत. तसेच, बीसीसीआय आणि आयसीसीच्या सर्व सदस्य मंडळांनी त्यांच्या प्रसारण भागीदारांसोबतच्या करारांमध्ये ‘कौटुंबिक प्रसारण संहिता’ (फॅमिली व्ह्यूइंग कोड) अनिवार्य करावी, अशीही मागणी केली आहे.

बंदीनंतर प्रौढ जाहिराती दाखवल्यास कारवाई करा – CTI

या संघटनेने अशीही मागणी केली आहे की, भविष्यात अशा जाहिराती प्रसारित झाल्यास, संबंधित प्रसारक आणि क्रिकेट मंडळावर कारवाई करावी. देशात दारू आणि तंबाखूच्या जाहिरातींवर बंदी असताना षटकांच्या दरम्यान प्रौढ जाहिरातींना का परवानगी दिली जाते, असा प्रश्न या पत्रात विचारण्यात आला आहे.
CTI ने ICC अध्यक्ष जय शाह यांना आगामी ICC बोर्ड बैठकीत या मुद्द्याला प्राधान्य देण्याची आणि मुलांच्या मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करून ३० दिवसांच्या आत एक ठोस धोरण तयार करण्याची विनंती केली आहे. संस्थेने असेही म्हटले आहे की, गरज भासल्यास हा मुद्दा संसद आणि माहिती व प्रसारण मंत्रालयाकडेही मांडला जाईल.

Weekend Spending Report: वीकेंड मोड Full On! इतका पैसा खर्च करतात तरी कुठे? ‘या’ रिपोर्टने भारतीयांची केली पोलखोल

Web Title: Cti demands ban on condom dating apps ads letter to jay shah marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2026 | 07:30 PM

Topics:  

  • bcci
  • BCCI India
  • BCCI Secretary Jai Shah
  • Business News
  • Condoms
  • cricket sports
  • Dating App
  • ICC
  • Jay shah
  • Marathi News

संबंधित बातम्या

IND Vs WI : तोच फॉर्म, तोच अंदाज..!  कर्णधार अय्यरला भारताच्या विजयाचे ‘श्रेय’श, विडिंजचा पराभव
1

IND Vs WI : तोच फॉर्म, तोच अंदाज..! कर्णधार अय्यरला भारताच्या विजयाचे ‘श्रेय’श, विडिंजचा पराभव

Solapur News :सोलापुरात मोठा उद्योग आणणार; तरुणांचे स्थलांतर थांबविण्याचे उदय सामंत यांचे आश्वासन
2

Solapur News :सोलापुरात मोठा उद्योग आणणार; तरुणांचे स्थलांतर थांबविण्याचे उदय सामंत यांचे आश्वासन

Solapur News :१६० हरकतींवर मंगळवारी सुनावणी; तीन तालुक्यांतील संस्थांवर प्रशासनाची नजर
3

Solapur News :१६० हरकतींवर मंगळवारी सुनावणी; तीन तालुक्यांतील संस्थांवर प्रशासनाची नजर

Hollywood News :$81 अब्जचा सौदा; Paramount- Warner Bros. एकत्र, Skydanceचा दबदबा
4

Hollywood News :$81 अब्जचा सौदा; Paramount- Warner Bros. एकत्र, Skydanceचा दबदबा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.