
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
इतर अनेक बँकांप्रमाणे, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI ) देखील आपल्या ग्राहकांना क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरून केलेल्या व्यवहारांसाठी रिवॉर्ड पॉइंट्स देते. हे पॉइंट्स मोबाईल रिचार्जपासून ते शॉपिंगपर्यंत सर्व गोष्टींसाठी वापरले जाऊ शकतात. तथापि, दोन वर्षे न वापरल्यास ते कालबाह्य होतात. ग्राहकांमध्ये रिवॉर्ड पॉइंट्सची क्रेझ वाढत आहे आणि घोटाळेबाज याचाच फायदा घेऊन तुम्हाला जाळ्यात अडकवत आहेत आणि तुमचे बँक खाते क्षणात रिकामे करत आहेत.
Did you also receive a message asking you to download & install an APK file to redeem SBI rewards❓ Beware‼️ #PIBFactCheck ❌@TheOfficialSBI NEVER sends links or APK files over SMS/WhatsApp. ✔️Never download unknown files or click on such links. pic.twitter.com/VyE4RLK7k4 — PIB Fact Check (@PIBFactCheck) July 5, 2026
सरकारची तथ्य-तपासणी संस्था, PIB Fact Check ने, असे संदेश खोटे असल्याचे सांगून फेटाळून लावले आहेत आणि त्यांचा वापर न करण्याचा सल्ला दिला आहे. फॅक्ट चेकमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की, SBI आपल्या ग्राहकांना कोणतीही APK file डाउनलोड करण्यासाठी SMS किंवा WhatsApp कधीही लिंक्स किंवा एपीके फाईल्स पाठवणार नाही.
स्कॅमर्स तुमच्या बँक खात्याचा तपशील मिळवण्यासाठी असे संदेश पाठवतात. अशा फाईल्स डाउनलोड केल्याने तुमच्या फोनमध्ये मालवेअर इन्स्टॉल होऊ शकतो, जो तुमचा वैयक्तिक डेटा, बँक खात्याचा तपशील आणि OTPs सहजपणे चोरू शकतो आणि काही मिनिटांत तुमचे बँक खाते रिकामे करू शकतो.
PF पेमेंट करणं झालं सोपं! IDFC FIRST Bank ला EPFO ची मान्यता; पाहा कशी आहे ऑनलाईन प्रक्रिया