
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
नवीन कर्मचारी अॅमेझॉनच्या सध्याच्या संपूर्ण भारतातील ऑपरेशन्स नेटवर्कमध्ये सामील होतील, जे सणासुदीच्या काळात वाढत्या मागणीला पाठिंबा देत ग्राहकांच्या ऑर्डर्स सुरक्षितपणे आणि विश्वासार्हपणे पिक-अप, पॅकिंग, शिपिंग आणि डिलिव्हर करण्यात मदत करतील. अॅमेझॉनने सणासुदीच्या तयारीसाठी यातील बहुतांश कर्मचाऱ्यांना आधीच ऑनबोर्ड केले आहे आणि त्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे.
आपल्या सहकाऱ्यांना पाठिंबा देण्याच्या अॅमेझॉनच्या कटिबद्धतेचा एक भाग म्हणून अगदी हंगामी कर्मचाऱ्यांनाही सुरक्षा आणि कल्याणकारी उपक्रम व लाभांचा लाभ मिळेल, जो इतर सहकाऱ्यांना मिळतो. यामध्ये सुरक्षित, सहाय्यक आणि सर्वसमावेशक कार्यस्थळ, सुरक्षितता, आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा यांसारख्या लाभांचा समावेश आहे. आपल्या समृद्धी उपक्रमाद्वारे अॅमेझॉन सणासुदीच्या आधी कंपनीच्या ऑपरेशन्स नेटवर्कमध्ये सामील होणाऱ्या सहकाऱ्यांना ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी आणि इतर सरकारी कल्याणकारी व सामाजिक सुरक्षा उपक्रमांचा लाभ घेण्यासाठी देखील मदत करेल.
“आम्ही या सणासुदीच्या काळात भारतातील प्रत्येक पिन-कोडवरील ग्राहकांना जलद आणि विश्वासार्ह वितरण (डिलिव्हरी) देण्यासाठी कटिबद्ध आहोत. ग्राहकांच्या अपेक्षित मागणीतील वाढ पूर्ण करण्यासाठी आम्ही आमच्या ऑपरेशन्स नेटवर्कमध्ये १.६ लाखांहून अधिक हंगामी रोजगार संधी निर्माण केल्या आहेत. भारतातील सर्वात मोठे, सुरक्षित, सर्वात जलद आणि अत्यंत विश्वासार्ह ऑपरेशन्स नेटवर्क तयार करण्यावर भर देत असताना आम्ही हजारो महिला कर्मचारी आणि दिव्यांगांसाठी संधी उपलब्ध करून देत एक सर्वसमावेशक कर्मचारीवर्ग निर्माण करण्यासाठी देखील कटिबद्ध आहोत.
हा विस्तारित कर्मचारीवर्ग आमची फुलफिलमेंट आणि लॉजिस्टिक्स क्षमता अधिक दृढ करण्यास मदत करेल आणि सणासुदीचा काळ आम्ही कोणत्याही अडथळ्याविना हाताळू शकू, याची खात्री करेल. यातील अनेक कर्मचारी सणासुदीच्या काळानंतरही अॅमेझॉनसोबत आपला प्रवास सुरू ठेवतात, तर इतर अनेक जण दरवर्षी आमच्यासोबत काम करण्यासाठी परत येतात,” असे अॅमेझॉन इंडिया, एपीएसी, मिडल ईस्ट, आफ्रिका आणि तुर्कीचे ऑपरेशन्सचे उपाध्यक्ष श्री. अभिनव सिंग म्हणाले.
अॅमेझॉन इंडियाने देशभरात प्रबळ फुलफिलमेंट आणि डिलिव्हरी नेटवर्क उभे केले आहे, जे १.७ दशलक्षहून अधिक विक्रेत्यांना देशभरातील ग्राहकांना सेवा प्रदान करण्यास मदत करत आहे. कंपनीकडे १५ राज्यांमध्ये पसरलेली फुलफिलमेंट सेंटर्स आहेत, जी विक्रेत्यांच्या इन्व्हेंटरीसाठी ४३ दशलक्ष घन फूटपेक्षा जास्त स्टोरेज जागा देतात; १९ राज्यांमध्ये सॉर्टेशन सेंटर्स आहेत; सोबत जवळपास २,००० अॅमेझॉन-संचालित आणि पार्टनर डिलिव्हरी स्टेशन्सचे नेटवर्क आहे. याशिवाय, २८,००० हब डिलिव्हरी सहयोगी आणि हजारो अॅमेझॉन फ्लेक्स पार्टनर्स आहेत, जे देशभरातील ग्राहकांना डिलिव्हरी करत आनंद देण्यासाठी सज्ज आहेत.
● सर्वसमावेशक कार्यस्थळ: अॅमेझॉन आपल्या ऑपरेशन्स नेटवर्कमध्ये कर्मचाऱ्यांना सुरक्षित, सहाय्यक आणि सर्वसमावेशक कार्यस्थळ प्रदान करण्यासाठी कटिबद्ध आहे. कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांचे कल्याण आणि विकासाला पाठिंबा देणाऱ्या सुविधा, कामकाजाच्या परिस्थिती आणि उपक्रमांमध्ये सतत गुंतवणूक करत आहे, तसेच महिला आणि दिव्यांग व्यक्तींना आपल्या कर्मचारीवर्गात सहभागी होण्याच्या संधी निर्माण करत आहे.
● सामाजिक सुरक्षा लाभ: अॅमेझॉनच्या ठिकाणी काम करणारे कर्मचारी लागू कायद्यांनुसार भविष्य निर्वाह निधी (पीएफ), कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ईएसआयसी) आणि ग्रॅच्युइटी लाभांसाठी पात्र आहेत.
अॅमेझॉन इमारतींच्या आत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध असलेले लाभ:
● उद्योगातील आघाडीच्या पायाभूत सुविधा आणि इतर सुविधा: कर्मचारी आणि सहकाऱ्यांसाठी सुरक्षित व सोयीस्कर कामाचे वातावरण सुनिश्चित करण्यासाठी डिझाइन केलेल्या अॅमेझॉनच्या सर्व सुविधांमध्ये पिण्याचे शुद्ध पाणी आणि स्वच्छ स्वच्छतागृहांची सोय उपलब्ध आहे. मोठ्या सुविधांमध्ये पुरेशा बैठकीच्या जागेसह वातानुकूलित कॅफेटेरिया आणि चहा, कॉफी, स्नॅक व्हेंडिंग मशीन, मायक्रोवेव्ह आणि बरेच काही यांसारख्या सुविधा आहेत.
● ऑनसाईट वैद्यकीय सुविधा: फुलफिलमेंट सेंटर्समधील ऑनसाईट प्रथमोपचार (अॅमकेअर) सुविधा त्वरित प्रथमोपचार किंवा विश्रांतीची गरज असलेल्या कोणासाठीही उपलब्ध आहेत. अस्वस्थ असलेल्या कर्मचाऱ्यांना बेड किंवा विश्रांतीची जागा, ओरल हायड्रेशन, हीटिंग पॅड्स आणि पात्र परिचारिकेची (नर्स) मदत मिळते. ज्यांना अधिक वैद्यकीय उपचारांची आवश्यकता असते त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये पाठवले जाते.
● आठवड्यातून ५ दिवस काम: अॅमेझॉनच्या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दरमहा आठवड्यातून दोन दिवस सुट्टी मिळते. याशिवाय, सर्व कर्मचारी कायद्यानुसार लागू असलेल्या अनिवार्य सुट्ट्या, ऐच्छिक सुट्ट्या, वार्षिक रजा, आजारपणाची रजा आणि नैमित्तिक रजेसाठी (कॅज्युअल लीव्ह) पात्र आहेत.
● आर्थिक स्थिरता: अर्ली अॅक्सेस टू पे (ईएटीपी) उपक्रम पात्र कर्मचाऱ्यांना दरमहा १ ते २० तारखेदरम्यान त्यांच्या उर्वरित मूळ पगाराच्या (बेसिक सॅलरी) ८० टक्क्यांपर्यंत रक्कम काढण्याची सुविधा देतो, ज्यामुळे अधिक आर्थिक स्थिरतेला प्रोत्साहन मिळते.
●डिलिव्हरी ड्रायव्हर्ससाठी लाभ: अॅमेझॉनने नुकतेच आपल्या लॉजिस्टिक्स नेटवर्कमधील हजारो डिलिव्हरी कर्मचाऱ्यांसाठी ‘सन्मान’ हा सर्वसमावेशक कल्याणकारी उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमामध्ये कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, सरकारी लाभ आणि आर्थिक समावेशन उपक्रमांचा लाभ मिळवून देणे, सर्वसमावेशक विमा संरक्षण, रस्ते सुरक्षेच्या उपाययोजना आणि बरेच काही समाविष्ट आहे.
● अपघात आणि दुखापतीपासून विमा संरक्षण: ईएसआयसीच्या किमान वैधानिक गरजेव्यतिरिक्त अॅमेझॉनच्या ठिकाणी काम करणारे सर्व कर्मचारी आणि डिलिव्हरी सहयोगी ग्रुप मेडिक्लेम इन्शुरन्स आणि ग्रुप पर्सनल अॅक्सिडेंट इन्शुरन्स अंतर्गत समाविष्ट आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला, अॅमेझॉनने भारतातील आपल्या ऑपरेशन्स नेटवर्कमधील जवळपास ९०,००० डिलिव्हरी कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य आणि विमा लाभांचा विस्तार केला.
हे लाभ नेहमीच्या वैद्यकीय खर्चासाठी ओपीडी कव्हरेज, हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याच्या उपचारांसाठी मदत आणि तात्पुरत्या किंवा कायमस्वरूपी अपंगत्वासाठी भरपाई प्रदान करतात, ज्यामुळे तात्काळ वैद्यकीय गरजा आणि दुखापतीमुळे होणारे उत्पन्नाचे नुकसान दोन्ही समाविष्ट केले जाते. हे लाभ अॅमेझॉनच्या सर्व लास्ट-माईल उपक्रमांमधील कर्मचाऱ्यांना दिले जातात.
● आश्रय – वातानुकूलित विश्रामगृहे: आश्रय केंद्रे डिलिव्हरी ड्रायव्हर्सकरिता, ज्यामध्ये अॅमेझॉन नेटवर्कच्या बाहेरील ड्रायव्हर्सचाही समावेश आहे, डिलिव्हरीसाठी बाहेर असताना विश्रांती घेण्यासाठी आणि पुन्हा सज्ज होण्यासाठी वातानुकूलित विश्रामगृहे आहेत. दिल्ली-एनसीआर, मुंबई, बेंगळुरू आणि चेन्नईमधील सध्याच्या नेटवर्कचा विस्तार करत २०२६ च्या अखेरपर्यंत हे नेटवर्क २५० केंद्रांपर्यंत वाढवण्याची अॅमेझॉनची योजना आहे.
कंपनीने मोबाईल आश्रय व्हॅन्स देखील सुरू केल्या आहेत, ज्या डिलिव्हरी ड्रायव्हर्सना विश्रांतीच्या सुविधा सहज उपलब्ध करून देण्यासाठी जास्त वर्दळीच्या ठिकाणी उभ्या केलेल्या वातानुकूलित मोबाईल रेस्ट युनिट्स आहेत. मोबाईल आश्रय व्हॅन्स सध्या दिल्ली, मुंबई आणि बेंगळुरू येथे कार्यरत असून या वर्षी अधिक शहरांमध्ये त्यांचा विस्तार करण्याची योजना आहे.
Petrol-Diesel चे दर वाढणार? कच्च्या तेलाचे किमती कडाडले, सरकारकडून कर वाढ