Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amazon India चा 90000 डिलिव्हरी पार्टनर्सना मोठा दिलासा! Health Insurance आणि OPD सुविधेत मोठी वाढ

मेडिक्लेम कव्‍हरेज वाढवून १.५ लाख रूपयांपर्यंत करण्यात आले आहे, तर १०,००० रूपयांपर्यंतचा ओपीडी खर्च देखील कव्हर केला जाईल. ग्रुप पर्सनल अॅक्सिडेंट कव्हरेज वाढवून आता १० लाख रूपयांपर्यंत करण्यात आले आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: May 12, 2026 | 05:25 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ९०,००० डिलिव्हरी पार्टनर्ससाठी आरोग्य विमा कव्‍हरेज
  • विमा कव्‍हरेजमध्‍ये वाढ, १.५ लाख रूपयांपर्यंत मेडिक्लेम
  • वेलनेस फायद्यांमध्‍ये वाढ
Amazon India Expands Health And Insurance : अॅमेझॉन इंडियाने आज आपल्या भारतातील ऑपरेशन्स नेटवर्कमधील अंदाजे ९०,००० डिलिव्हरी पार्टनर्ससाठी आरोग्य आणि विमा लाभांच्या विस्ताराची घोषणा केली. हे लाभ दैनंदिन वैद्यकीय खर्चासाठी बाह्यरूग्‍ण विभाग (ओपीडी) कव्हरेज, हॉस्पिटलमध्‍ये दाखल झाल्यानंतरचा खर्च आणि तात्पुरत्या किंवा कायमस्वरूपी अपंगत्वासाठी भरपाई प्रदान करतात. यामुळे तात्कालिक वैद्यकीय गरजा आणि दुखापतीमुळे होणारे उत्पन्नाचे नुकसान या दोन्ही गोष्टींची काळजी घेतली जाईल. हे लाभ सर्व लास्ट-माईल प्रोग्राम्समध्ये असोसिएट्सकरिता लागू केले जातील. यामध्ये मेडिक्लेम कव्‍हरेज वाढवून १.५ लाख रूपयांपर्यंत करण्यात आले आहे, तर १०,००० रूपयांपर्यंतचा ओपीडी खर्च देखील कव्हर केला जाईल. ग्रुप पर्सनल अॅक्सिडेंट कव्हरेज वाढवून आता १० लाख रूपयांपर्यंत करण्यात आले आहे. नेमकं यात कोणत्या गोष्टींचं कव्हरेज मिळणार आहे? समजून घेऊयात

Bank Of India ची ऐतिहासिक झेप! वार्षिक निव्वळ नफा 10 हजार कोटींच्या पार

आरोग्यविषयक लाभांमध्ये यांचा समावेश

आरोग्यविषयक लाभांमध्ये डिलिव्हरी पार्टनर्स आणि त्यांच्या कुटुंबातील तीन सदस्यांचा समावेश आहे, यामध्ये अमर्याद बहुभाषिक ऑनलाइन डॉक्टरी सल्ला आणि दरवर्षी प्रति कुटुंब दोन मोफत वैयक्तिक ओपीडी भेटींचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, डायग्नोस्टिक्स, फार्मसी, दंत आणि डोळ्यांच्या उपचारांवर सवलत, तसेच प्रतिबंधात्मक आरोग्य आणि फिटनेसला प्रोत्साहन देणारी साधने देखील उपलब्ध करून दिली आहेत.
अॅमेझॉनने एका तृतीय-पक्ष विमा कंपनीच्या सहयोगाने देशव्यापी आरोग्य शिबिरांचेही आयोजन केले आहे, ज्याद्वारे हजारो डिलिव्हरी पार्टनर्सना विनामूल्य आरोग्य तपासणी उपलब्ध करून दिली जाईल. या वैद्यकीय शिबिरांमध्ये डोळ्यांची तपासणी, दातांची तपासणी, बीएमआय मूल्यमापन आणि जनरल फिजिशियन कन्सल्टेशन यांसारख्या आवश्यक आरोग्य सेवा दिल्या जातील. डिलिव्हरी पार्टनर्स भारतातील अॅमेझॉनच्या कोणत्याही लास्ट-माईल डिलिव्हरी स्टेशनवर उभारलेल्या शिबिरांमध्ये सरकारी ओळखपत्र दाखवून या सेवांचा लाभ घेऊ शकतात.हे सर्व उपक्रम अॅमेझॉनने अलीकडेच जाहीर केलेल्या २,८०० कोटी रुपयांहून अधिक (सुमारे ३०० दशलक्ष डॉलर्स) गुंतवणुकीचा भाग आहेत. ही गुंतवणूक असोसिएट्सची सुरक्षा, आरोग्य आणि आर्थिक कल्याण अधिक प्रबळ करण्यासाठी, तसेच देशातील सर्वात सुरक्षित, वेगवान आणि विश्वासार्ह लॉजिस्टिक नेटवर्कचा विस्तार सुरू ठेवण्यासाठी केली जात आहे.

ऑपरेशनचे डायरेक्टर काय म्हणाले?

अॅमेझॉन इंडियाचे ऑपरेशन्सचे डायरेक्टर सलीम मेमन म्हणाले, “आम्ही भारतभरातील आमचे ऑपरेशन्स नेटवर्क, पायाभूत सुविधा आणि फ्रंटलाईन वर्कफोर्समध्ये गुंतवणूक करत असताना आम्‍ही आमच्या डिलिव्हरी पार्टनर्सची सुरक्षा आणि आरोग्‍याला सर्वोच्‍च प्राधान्य देत आहोत. अधिक व्यापक आधार देण्यासाठी आम्ही ओपीडी, हॉस्पिटलायझेशन आणि अपघात विमा कव्‍हरेज वाढवत आहोत. तसेच मोफत तपासणी आणि प्रतिबंधात्मक काळजी प्रदान करण्यासाठी देशव्यापी आरोग्य शिबिरे देखील राबवत आहोत. हे उपक्रम आमच्या २,८०० कोटी रुपयांच्या अलीकडील गुंतवणुकीचा भाग आहेत, याद्वारे आमचा असोसिएट्सचे स्‍वास्‍थ्‍य अधिक प्रबळ करण्‍याचा आणि देशभर आमच्या ऑपरेशन्स पायाभूत सुविधांचा विस्तार करण्‍याचा मनसुबा आहे.”
आरोग्य आणि सुरक्षिततेवर लक्ष केंद्रित करत असताना अॅमेझॉन आपल्या ऑपरेशन्स वर्कफोर्ससाठी विशेष उपक्रमांमध्ये गुंतवणूक करणे सुरू ठेवत आहे. या वर्षासाठी मार्चमध्ये सुरू झालेली आरोग्य शिबिरे आतापर्यंत सहा शहरांमधील डिलिव्हरी स्टेशन्सवर आयोजित करण्यात आली आहेत, जी मेट्रो आणि द्वितीय श्रेणीच्‍या शहरांमध्येही सुरू राहतील. ही शिबिरे प्रामुख्याने डिलिव्हरी पार्टनर्सची आरोग्य तपासणी आणि विशेषतः उन्हाळ्याच्या महिन्यांत उष्णतेमुळे होणाऱ्या धोक्यांना ओळखण्‍यावर लक्ष केंद्रित करतात, ज्‍यामुळे कर्मचारी निरोगी राहतील. याव्यतिरिक्त, हे आरोग्य आणि विमा लाभ डिलिव्हरी पार्टनर्सना आरोग्यसेवा आणि आर्थिक संरक्षण या दोन्ही बाबतीत आधार देण्यासाठी डिझाइन केलेले आहेत.

डिलिव्हरी पार्टनर्ससाठी कशा प्रकारे मदत?

सुरक्षा आणि आरोग्‍यामध्‍ये गुंतवणूक:

अॅमेझॉन इंडियाने नुकतेच घोषणा केली आहे की, कंपनी असोसिएट्सची सुरक्षा, आरोग्य आणि आर्थिक कल्याणाचे उपाय अधिक दृढ करण्यासाठी २,८०० कोटी रुपयांहून अधिक (सुमारे ३०० दशलक्ष डॉलर्स) गुंतवणूक करणार आहे. ही गुंतवणूक करत असताना देशातील सर्वात सुरक्षित, वेगवान आणि विश्वासार्ह लॉजिस्टिक नेटवर्कचा विस्तारही केला जाईल. ही गुंतवणूक २०२३ पर्यंत भारतात ३५ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक करण्याच्या कंपनीच्या व्यापक कटिबद्धतेचा भाग आहे. ज्यामध्ये व्यवसायाचा विस्तार, तसेच एआय-आधारित डिजिटायझेशन, निर्यातीतील वाढ आणि रोजगार निर्मिती या तीन धोरणात्मक स्तंभांवर लक्ष केंद्रित केले आहे. अॅमेझॉन आपल्या कोअर आणि क्विक कॉमर्स दोन्ही क्षेत्रांचा विस्तार करत राहील, ज्‍यामुळे संपूर्ण भारतातील ग्राहकांना मिनिटांत, तासांत आणि दिवसांत सेवा दिली जाईल.

डिलिव्हरी पार्टनर्ससाठी खास विश्रांती केंद्रे

उद्योगातील अद्वितीय उपक्रम आश्रय सेंटर्स हे जास्त रहदारी असलेल्या ठिकाणी डिलिव्हरी पार्टनर्ससाठी खास विश्रांती केंद्रे आहेत. ही केंद्रे कोणत्याही कंपनीसाठी काम करणाऱ्या सर्व डिलिव्हरी पार्टनर्ससाठी विनामूल्य आहेत. या विश्रांती केंद्रांमध्ये डिलिव्‍हरी असोसिएट्सकरिता वातानुकूलित बसण्याची व्यवस्था, पिण्याचे पाणी, इलेक्ट्रोलाइट्स, स्वच्छतागृहे, चार्जिंग स्टेशन्स आणि प्रथमोपचार किट यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत. अॅमेझॉनने गेल्या आठवड्यात जाहीर केले की, सध्या असलेल्या १०० केंद्रांच्या नेटवर्कचा विस्तार करून २०२६ मध्ये आश्रय केंद्रांची संख्या २५० पर्यंत नेली जाईल. या विस्ताराचा भाग म्हणून मे महिन्याच्या अखेरीस ५० नवीन केंद्रे सुरू करण्याची कंपनीची योजना आहे.

रुग्णवाहिका सेवा, आपत्कालीन सहाय्य आणि असोसिएट सुरक्षा

अॅमेझॉन इंडिया डिलिव्हरी पार्टनर्सना २४/७ सुरक्षा सहाय्य प्रदान करते. यामध्ये ७३० पेक्षा जास्त शहरांमध्ये डायल ४२४२ सोबत सहयोगाने विनामूल्य रुग्णवाहिका सेवा (बेसिक आणि अॅडव्हान्स्ड लाइफ सपोर्टसह), समर्पित हेल्पलाइन आणि आपत्कालीन मदतीचा समावेश आहे. याला प्रतिबंधात्मक आरोग्य मोहिमा, प्रवासापूर्वी वाहनाची अनिवार्य तपासणी आणि रिअल-टाइम हवामान सूचनांची जोड दिली जाते. यामुळे पावसाळ्यात सुरक्षित ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण आणि अति उष्णतेच्या काळात अतिरिक्त विश्रांती यांसारख्या उपाययोजना करणे शक्य होते.

डिलिव्हरी पार्टनर्ससाठी रस्ते सुरक्षा प्रशिक्षण

राष्ट्रीय रस्ते सुरक्षा महिन्याचे औचित्य साधून, या वर्षाच्या सुरुवातीला अॅमेझॉनने देशव्यापी रस्ते सुरक्षा जागरूकता आणि प्रशिक्षण कार्यक्रम राबवला. या उपक्रमांतर्गत लास्ट-माईल आणि मिडल-माईल ऑपरेशन्समधील लाखो डिलिव्हरी पार्टनर्स, भागीदार आणि ट्रक ड्रायव्हर्सपर्यंत पोहोचण्यात आले. अनिवार्य ऑन-ग्राउंड प्रशिक्षण आणि संवादात्मक सत्रांच्या माध्यमातून सुरक्षित ड्रायव्हिंग आणि रायडिंगच्या पद्धतींवर अधिक भर देण्यात आला. या उपक्रमात रोजच्या रस्ते सुरक्षेच्या महत्त्वाच्या पैलूंवर लक्ष केंद्रित करण्यात आले, ज्यामध्ये हेल्मेट आणि सीटबेल्टचा वापर, वेगाचे व्यवस्थापन, लक्ष विचलित होण्यापासून रोखणे, आपत्कालीन सज्जता आणि वाहनांची सुरक्षित हाताळणी यांचा समावेश होता.

प्रतीधी शिष्यवृत्ती उपक्रम

प्रतीधी हा अॅमेझॉन इंडियाचा एक प्रमुख शिष्यवृत्ती उपक्रम आहे. या उपक्रमाचा डिलिव्हरी पार्टनर्स आणि भागीदारांच्या मुलांसाठी शिक्षणाच्या संधी विस्तारण्‍याचा मनसुबा आहे. उच्‍च शिक्षणासाठी आर्थिक मदत देऊन प्रतीधी पात्र विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांत पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेण्यास सक्षम करते. यामुळे आर्थिक अडथळे दूर होऊन प्रगतीचा मार्ग मोकळा होतो. प्रतीधीच्या माध्यमातून अॅमेझॉन भारताच्या भावी पिढीतील प्रतिभेत गुंतवणूक करून फ्रंटलाईन डिलिव्हरी पार्टनर्सच्या निष्ठेचा गौरव करते, ज्‍यासह उपजीविका आणि समाजाच्या उत्थानाप्रती असलेली त्यांची दीर्घकालीन कटिबद्धता अधिक दृढ होत आहे.

समावेशक धोरणे

अॅमेझॉन आपल्या फुलफिलमेंट सेंटर्सवर मासिक पाळीची रजा, ऑनसाइट वैद्यकीय आणि विश्रांती सुविधा, तसेच सॅनिटरी पॅड डिस्पेंसिंग मशीन्स उपलब्ध करून देऊन महिलांच्या आरोग्याची आणि सन्मानाची काळजी घेते. नोकरी करणाऱ्या मातांसाठी डेकेअर सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, ज्यामुळे त्या आत्मविश्वासाने आणि कामाचा समतोल राखून आपले करिअर सुरू ठेवू शकतात. तसेच, अॅमेझॉन अपस्किलिंगच्या संधींमध्ये गुंतवणूक करते, ज्यामुळे असोसिएट्सना त्यांच्या आवडीनुसार कंपनीतील अंतर्गत पदे मिळवण्यासाठी सक्षम केले जाते.

8th Pay Commission: कर्मचारी संघटनांची मोठी मागणी, वेतन निश्चितीच्या सूत्रात होणार बदल? पगारवाढ आणखी मोठी?

Web Title: Amazon india expands health and insurance benefits for 90 000 delivery associates see more details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2026 | 05:25 PM

Topics:  

  • Amezon Prime
  • Business News
  • Marathi News

संबंधित बातम्या

National Award: योगेश देशपांडेला मिळाला सर्वोत्कृष्ट पटकथेचा राष्ट्रीय पुरस्कार, ‘स्वर्गंधर्व सुधीर फडके’साठी सन्मान
1

National Award: योगेश देशपांडेला मिळाला सर्वोत्कृष्ट पटकथेचा राष्ट्रीय पुरस्कार, ‘स्वर्गंधर्व सुधीर फडके’साठी सन्मान

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
2

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
3

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

भारतातील Data Center विस्तारामुळे रोजगाराची मोठी संधी! 1 लाख इंजिनिअरिंग नोकऱ्या अन् 300 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक
4

भारतातील Data Center विस्तारामुळे रोजगाराची मोठी संधी! 1 लाख इंजिनिअरिंग नोकऱ्या अन् 300 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.