Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एंजल वनची ऐतिहासिक कामगिरी! चौथ्या तिमाहीत नफ्यात १९% वाढ; १,४६७ कोटींचा महसूल आणि ३२० कोटींचा नफा

एंजल वन लिमिटेडने चौथ्या तिमाहीत १९.२% नफा वाढीसह ३२० कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. कंपनीचा महसूल १,४६७ कोटींवर पोहोचला असून वेल्थ मॅनेजमेंटमध्ये मोठी वाढ झाली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 20, 2026 | 05:49 PM
एंजल वनची ऐतिहासिक कामगिरी! चौथ्या तिमाहीत नफ्यात १९% वाढ (Photo Credit- X)

एंजल वनची ऐतिहासिक कामगिरी! चौथ्या तिमाहीत नफ्यात १९% वाढ (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • एंजल वनची ऐतिहासिक कामगिरी!
  • चौथ्या तिमाहीत नफ्यात १९% वाढ
  • १,४६७ कोटींचा महसूल आणि ३२० कोटींचा नफा
मुंबई, एप्रिल १७, २०२६: एंजल वन लिमिटेड (एनएसई: एंजनवन, बीएसई: ५४३२३५) या आघाडीच्‍या फिनटेक प्‍लॅटफॉर्मने ३१ मार्च २०२६ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी लेखापरीक्षित केलेले एकत्रित आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. कंपनीने सर्व प्रमुख आर्थिक आणि ऑपरेटिंग निकषांवर सातत्यपूर्ण वाढ नोंदवली आहे.

एंजल वनने आर्थिक वर्ष २०२६ च्या चौथ्या तिमाहीत दमदार कामगिरी केली आहे. कंपनीचा करोत्तर नफा (पीएटी) मागील तिमाहीच्या तुलनेत १९.२ टक्‍क्‍यांनी वाढून ३२० कोटी रूपयांवर पोहोचला आहे, तर महसूल ९.७ टक्‍क्‍यांनी वाढून १,४६७ कोटी रूपयांवर पोहोचला आहे. ईबीआयटीडीए १६.७ टक्‍यांनी वाढून ४७३ कोटी रूपयांवर पोहोचला आहे, तर मार्जिन ३९.४ टक्‍क्‍यांवरून ४१.७ टक्‍क्‍यांपर्यंत वाढले आहे. या कामगिरीमधून कंपनीची ऑपरेटिंग लाभक्षमता व सुधारित कार्यक्षमता दिसून येते.

या तिमाहीत प्लॅटफॉर्मवरील व्यवहारांमध्ये मोठी वाढ पाहायला मिळाली. एकूण ऑर्डर्सची संख्या ४३१ दशलक्षवर पोहोचली आहे, जो मागील सहा तिमाहींमधील उच्‍चांक आहे. यावरून प्लॅटफॉर्मवरील ग्राहकांचा वाढता सहभाग दिसून येतो. तसेच, सरासरी क्लायंट फंडिंग बुक ५,८५० कोटी रूपयांवर स्थिर राहिले आहे.

ब्रोकिंग व्‍यतिरिक्त एंजल वनने आपल्या वैविध्यपूर्ण प्लॅटफॉर्मवर गती कायम ठेवली आहे. या तिमाहीत एसआयपी नोंदणी २.१ दशलक्ष इतकी राहिली, तर संपत्ती व्‍यवस्‍थापन व्यवसायाने वाढीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली, ज्यामध्ये एयूएम मागील तिमाहीच्या तुलनेत २२.७ टक्‍यांनी वाढून १०,०८० कोटी रूपये झाले आहे. क्रेडिट (कर्ज), म्युच्युअल फंड आणि अॅसेट मॅनेजमेंट यांसारखे उदयोन्मुख व्यवसाय वेगाने विस्तारत आहेत, जे व्यवसायाचे विविधीकरण आणि ग्राहकांशी सखोल संबंध प्रस्थापित करण्यात मोलाचे योगदान देत आहेत.

Property Buying Tips: पत्नीच्या नावावर घर खरेदी करणं पडणार महाग? स्टॅम्प ड्युटी वाचवण्याच्या नादात याकडे दुर्लक्ष करु नका

दुसरीकडे, कंपनीने भविष्यातील वाढीला पाठबळ देण्यासाठी आणि आर्थिक स्थिरता वाढवण्यासाठी नॉन-कन्व्हर्टिबल डिबेंचर्स (एनसीडी)च्या माध्यमातून १,५०० कोटी रूपये उभे करण्याच्या योजनेला मंजूरी दिली आहे, तसेच आपली कर्ज घेण्याची मर्यादा २०,००० कोटी रूपयांपर्यंत वाढवली आहे.

या कामगिरीबाबत मत व्‍यक्त करत ग्रुप सीईओ श्री. अंबरीष केंघेम्हणाले, “आर्थिक वर्ष २०२६ ची चौथी तिमाही एकूण अत्यंत दमदार कामगिरीची ठरली. ग्राहकांच्या व्यवहारांमधील वाढीमुळे आमचे ईबीडीएटी मार्जिन जवळपास ४२ टक्‍क्‍यांपर्यंत विस्तारले आणि करोत्तर नफा ३.२ बिलियन रूपयांवर पोहोचला. मार्च २०२६ मध्ये सरासरी दैनिक ऑर्डर्सची संख्या ७.४ दशलक्षपर्यंत पोहोचली, ज्यामुळे या तिमाहीत एकूण ऑर्डर्सची संख्या ४३१ दशलक्ष झाली आहे, जो गेल्या सहा तिमाहींमधील उच्‍चांक आहे. आमचे क्रेडिट, म्युच्युअल फंड, वेल्थ आणि अॅसेट मॅनेजमेंट हे उदयोन्मुख व्यवसाय ग्राहकांच्या वाढत्या प्रतिसादामुळे सातत्याने विस्तारत आहेत. शिस्तबद्ध अंमलबजावणी, तंत्रज्ञानातील नेतृत्व आणि ग्राहकांना उत्तम अनुभव देणे यांवर आमचा भर कायम आहे.”

एंजल वन दीर्घकालीन शाश्वत प्रगती साधण्यासाठी आपल्या तंत्रज्ञान-आधारित प्लॅटफॉर्मला अधिक प्रबळ करण्यावर, ग्राहकांशी सखोल संबंध प्रस्थापित करण्यावर आणि आपल्या उदयोन्मुख व्यवसायांचा विस्तार करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे.

New Labour Code: तुमचा हातात येणारा पगार घटणार की वाढणार? नवीन नियमांमुळे कोणाला बसणार फटका?

Web Title: Angel one q4 results 2026 profit rises revenue growth fintech news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2026 | 05:49 PM

Topics:  

  • Angel One
  • Business News
  • Stock

संबंधित बातम्या

India-South Korea: भारत-दक्षिण कोरियामध्ये ऐतिहासिक ‘इलेक्ट्रॉनिक पेमेंट’ करार; दोन्ही देशांच्या पेमेंट सिस्टिम एकमेकांश जोडणार
1

India-South Korea: भारत-दक्षिण कोरियामध्ये ऐतिहासिक ‘इलेक्ट्रॉनिक पेमेंट’ करार; दोन्ही देशांच्या पेमेंट सिस्टिम एकमेकांश जोडणार

DA Hike: 2% वाढ, बेसिक पगाराच्या हिशेबाने हातात किती मिळणार पगार; केंद्र सरकारने दिले गिफ्ट
2

DA Hike: 2% वाढ, बेसिक पगाराच्या हिशेबाने हातात किती मिळणार पगार; केंद्र सरकारने दिले गिफ्ट

Property Buying Tips: पत्नीच्या नावावर घर खरेदी करणं पडणार महाग? स्टॅम्प ड्युटी वाचवण्याच्या नादात याकडे दुर्लक्ष करु नका
3

Property Buying Tips: पत्नीच्या नावावर घर खरेदी करणं पडणार महाग? स्टॅम्प ड्युटी वाचवण्याच्या नादात याकडे दुर्लक्ष करु नका

New Labour Code: तुमचा हातात येणारा पगार घटणार की वाढणार? नवीन नियमांमुळे कोणाला बसणार फटका?
4

New Labour Code: तुमचा हातात येणारा पगार घटणार की वाढणार? नवीन नियमांमुळे कोणाला बसणार फटका?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.