Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Anil Ambani च्या अडचणीत वाढ! आधी अटक… आता कंपनीच्या माजी MD ची रवानगी पोलिस कोठडीत; काय नेमकं प्रकरण?

अनिल अंबानींच्या अडचणी कमी होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. ईडीचा दणका रिलायन्स ग्रुपला सुरुच आहे. ईडीने आपली कारवाई सुरूच ठेवली. गेल्या शुक्रवारीच, ईडीने अनिल अंबानींचे निकटचे सहकारी आणि रिलायन्स ग्रुपचे माजी ग्रुप मॅनेजिंग डायरेक्टर तसेच रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे व्हाईस चेअरमन सतीश सेठ यांना मुंबईत अटक केली. प्रकरण काय?

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jun 14, 2026 | 01:30 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Anil Ambani Tension: अनिल अंबानींच्या अडचणी कमी होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. ईडीचा दणका रिलायन्स ग्रुपला सुरुच आहे. ईडीने आपली कारवाई सुरूच ठेवली आहे. गेल्या शुक्रवारीच, ईडीने अनिल अंबानींचे निकटचे सहकारी आणि रिलायन्स ग्रुपचे माजी ग्रुप मॅनेजिंग डायरेक्टर तसेच रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे व्हाईस चेअरमन सतीश सेठ यांना मुंबईत अटक केली. पण नेमकं प्रकरण काय?

खुशखबर! भारतात Petrol-Diesel च्या किंमती उतरल्या, दरात तब्बल 3.1% ची घट, सरकारने स्पष्ट केलं संपूर्ण गणित

सहा दिवसांची ईडी कोठडी

अटकेनंतर, सतीश सेठ यांना स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे ईडीला ट्रान्झिट रिमांड मिळाला आहे. त्यांना आता दिल्लीला आणले जात आहे. एका वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, अधिकाऱ्यांनी सांगितले की, ईडीने शुक्रवारी मुंबईत रिलायन्स अनिल अंबानी ग्रुपच्या दोन माजी अधिकाऱ्यांना मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत अटक केली. दिल्लीतील द्वारका न्यायालयाने त्यांना सहा दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे.

न्यायालयाकडून काय विधान?

अहवालानुसार, खटल्याची सुनावणी केल्यानंतर, द्वारका न्यायालयाने रिलायन्स अनिल अंबानी ग्रुपचे माजी ग्रुप एमडी सतीश सेठ यांना सहा दिवसांची कोठडी सुनावली. कथित मनी लाँडरिंग प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सेठ यांच्यावर, हिऱ्यांच्या आयातीची फुगवलेली रक्कम दाखवणारी बनावट बिले तयार करून हवालामार्फत परदेशात पैसे पाठवल्याचा आरोप आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, गुन्ह्यातून मिळालेल्या पैशांचे खरे लाभार्थी कोण आहेत हे ओळखण्यासाठी आणि पैशांच्या संपूर्ण व्यवहाराचा माग काढण्यासाठी कोठडीतील चौकशी आवश्यक आहे. सतीश सेठ हे अनिल अंबानी यांचे दीर्घकाळापासून जवळचे आणि विश्वासू सहकारी मानले जातात, त्यांनी रिलायन्स ग्रुपचे ग्रुप मॅनेजिंग डायरेक्टर आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे व्हाईस चेअरमन म्हणून काम पाहिले आहे.

ईडीला तपासात काय आढळलं?

ईडीने स्पष्ट केलंय की, PMLA अंतर्गत केलेल्या तपासात असे उघड झाले आहे की, दोन NHAI रस्ते बांधकाम प्रकल्पांमधून सार्वजनिक निधीच्या पद्धतशीर हस्तांतरणाशी संबंधित मोठ्या आर्थिक घोटाळ्यात अनिल अंबानींची रिलायन्स ही एक प्रमुख लाभार्थी होती. असा आरोप आहे की, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ही परदेशात निधी हस्तांतरित करण्यासाठी शेल कंपन्यांचा वापर करणाऱ्या कॉर्पोरेट संस्थांपैकी एक होती. ईडीचा आरोप आहे की, आरआयएलने ९२ कोटी रुपये परदेशात हस्तांतरित केले.

CBI ने मार्चमध्ये केलाय गुन्हा दाखल

CBI ने मार्च २०२६ मध्ये अनिल अंबानी यांचे निकटचे सहकारी सतीश सेठ आणि गौतम दोशी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर, दोन्ही अधिकाऱ्यांच्या कार्यालयांवर आणि ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. या सीबीआयच्या तक्रारीच्या आधारे, ईडीने त्यांच्याविरुद्ध मनी लाँडरिंगच्या आरोपाखाली स्वतःचा तपास सुरू केला.

उद्या दिसणार शेअरवर परिणाम

अनिल अंबानींच्या निकटवर्तीयांविरुद्ध ईडीची कारवाई बऱ्याच काळापासून सुरू आहे आणि प्रत्येक नव्या घडामोडीचा त्यांच्या कंपन्यांच्या शेअर्सवर परिणाम झाला आहे. सतीश सेठ यांच्या सहा दिवसांच्या रिमांडच्या बातमीनंतरही, अनिल अंबानींच्या रिलायन्स इन्फ्रा आणि रिलायन्स पॉवर या कंपन्यांचे शेअर्स चर्चेत आहेत आणि आठवड्याच्या पहिल्या ट्रेडिंग दिवशी, सोमवारी बाजार उघडताच त्यांच्यावर परिणाम होऊ शकतो.

गेल्या शुक्रवारी, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे शेअर्स ४.९९% वाढीसह ₹८५.८४ वर बंद झाले. दरम्यान, अनिल अंबानींची दुसरी कंपनी, रिलायन्स पॉवर, ३.३८% वाढीसह ₹२६.५९ वर बंद झाली.

(टीप: शेअर बाजारात कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या बाजार तज्ञांचा सल्ला घ्या.)

दारूच्या बाजारपेठेत भारताचा दबदबा! आंतरराष्ट्रीय स्तरावर विक्री घटत असताना भारतीय लिकर इंडस्ट्रीने घेतली मोठी भरारी

Web Title: Anil ambani tension reliance capital former md arrested police remand marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2026 | 01:30 PM

Topics:  

  • anil ambani
  • Business News
  • Marathi News

संबंधित बातम्या

Breaking News :युरोपमधील सुपरमार्केटच्या फ्रिजवर सायबर हल्ला ;अन्नसाठा झाला पूर्ण खराब
1

Breaking News :युरोपमधील सुपरमार्केटच्या फ्रिजवर सायबर हल्ला ;अन्नसाठा झाला पूर्ण खराब

Trump News : तिसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होण्याची ट्रम्प यांची इच्छा; मात्र कायदेशीर अडचणींचीही कबुली
2

Trump News : तिसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होण्याची ट्रम्प यांची इच्छा; मात्र कायदेशीर अडचणींचीही कबुली

Mumbai News : दुष्काळग्रस्त महिलांना स्वयंरोजगारासाठी मदत; शिलाई मशीनसाठी १५ लाखांचा धनादेश
3

Mumbai News : दुष्काळग्रस्त महिलांना स्वयंरोजगारासाठी मदत; शिलाई मशीनसाठी १५ लाखांचा धनादेश

‘हर भक्त श्री राम तक’! अंध भक्तांसाठी उभारणार श्रद्धेचा पूल; ITC Mangaldeep चा अनोखा डिजिटल उपक्रम
4

‘हर भक्त श्री राम तक’! अंध भक्तांसाठी उभारणार श्रद्धेचा पूल; ITC Mangaldeep चा अनोखा डिजिटल उपक्रम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.