
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
ही भाडेवाढ १ सप्टेंबरपासून होणार आहे. ऑटो, रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्यामुळे ऑटो-रिक्षाचे किमान भाडे आता ₹२६ वरून ₹२७ पर्यंत पोहोचणार आहे. त्यानंतर, प्रति किलोमीटर भाडे ₹१७.१४ वरून ₹१८.२२ प्रति किलोमीटर इतकं वाढवण्यात आलं आहे. काळ्या-पिवळ्या टॅक्सींसाठी, सुरुवातीचे भाडे म्हणजे पहिल्या 1.5 किमीसाठी ₹३१ इतकं होतं. ते आता ₹३३ करण्यात आले आहे. याशिवाय, लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी प्रति किलोमीटर भाडे ₹२०.६६ वरून ₹२१.९० करण्यात आले आहे.
भाड्यामध्ये झालेली सुधारण सुरवातीला शुल्लक किंवा कमी वाटू शकते. ऑटोसाठी फक्त १ रुपये आणि टॅक्ससाठी २ रुपये अशी आहे. पण जर तुम्ही रोज प्रवास करत असाल तर ही रक्कम तुमच्या महिन्याच्या खर्चावर बराच परिणाम दाखवू शकते. त्याचबरोबर तुम्ही ऑटो किंवा टॅक्सीने लांबचा पल्ला गाठण्याचा विचार करत असाल तर त्याचा परिणाम थेट तुमच्या खिशावर दिसून येणार आहे.
महाराष्ट्राची राजधानी मुंबईत हे दर लागू होणार आहेत. नवीन दर 1 सप्टेंबरपासून लागू होणार असले तरीही चालकांना त्यांच्या वाहनांचे इलेक्ट्रॉनिक मीटर पुन्हा कॅलिब्रेट केल्यानंतरच हे नवं भाडं आकरता येणार आहे. मीटरचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी RTO ने नोव्हेंबरअखेरपर्यंतचा काळ दिला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत एखाद्या वाहनचालकाने मीटर दुरुस्त न केल्यास त्याला नवीन भाडे आकारता येणार नाही. त्याचा फटकाही बसू शकतो या कालावधीपर्यंत मीटर दुरुस्त केला गेला नाही तर त्यासाठी तुम्हाला दंडही होऊ शकतो.
खटुआ पॅनलच्या शिफारशींनंतर मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणा म्हणजेच MMRTA ने हे भाडे मंजूर केले आहे. यापूर्वी फेब्रुवारी 2025 मध्ये भाडे वाढवण्यात आले होते. सध्या मुंबईत 4.5 लाखांहून अधिक ऑटो आणि 50,000 हून अधिक टॅक्सी आहेत, त्यापैकी बहुतांश CNG वर चालतात.