Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bank Of India ची ऐतिहासिक झेप! वार्षिक निव्वळ नफा 10 हजार कोटींच्या पार

बँक ऑफ इंडियाने आर्थिक वर्ष २०२५-२०२६ मधील आपल्या आर्थिक कामगिरीची आकडेवारी जाहीर केली असून आर्थिक वर्ष २०२६ मध्ये निव्वळ नफा वार्षिक १४.१९ टक्के वाढून १०,५२७ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: May 12, 2026 | 04:35 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • Bank Of India ची ऐतिहासिक झेप!
  • वार्षिक निव्वळ नफा १० हजार कोटींच्या पार
  • 2026 मध्ये वार्षिक १४.१९ टक्क्यांनी वाढला
Bank Of India Result : बँक ऑफ इंडियाने आर्थिक वर्ष २०२५-२०२६ मधील आपल्या आर्थिक कामगिरीची आकडेवारी जाहीर केली असून आर्थिक वर्ष २०२६ मध्ये निव्वळ नफा वार्षिक १४.१९ टक्के वाढून १०,५२७ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. आर्थिक वर्ष २०२६ तील चौथ्या तिमाहीत निव्वळ नफा वार्षिक १४.८५ टक्के वाढून ३,०१६ कोटी रुपयांवर झेपावला आहे. बँकेचा ROA आणि ROE आर्थिक वर्ष २०२६ च्या चौथ्या तिमाहीसाठी अनुक्रमे १.०१ टक्के आणि १६.३६ टक्क्यांपर्यंत वाढला आहे.

LPG सबसिडीबाबत सरकारचा मोठा निर्णय? आता ‘इतकं’ उत्पन्न असणाऱ्यांना स्वस्त Cylinder मिळणार नाही?

कार्यात्मक नफ्यातही वाढ होऊन ५,०२६ कोटी रुपयांवर

बँकेचा आर्थिक वर्ष २०२६ साठीचा कार्यात्मक नफा वाढून १७,०४९ कोटी रुपये झाला, तर आर्थिक वर्ष २०२६ च्या चौथ्या तिमाहीसाठीतील कार्यात्मक नफ्यातही वाढ होऊन तो ५,०२६ कोटी रुपयांवर झेपावला आहे. बँकेच्या जागतिक पातळीवरील व्यवसायात वार्षिक १४.५७ टक्के वाढ नोंदवली गेली आहे आणि तो १६.९८ लाख कोटी रुपयचांवर पोहचला आहे. जागतिक ठेवी वार्षिक १३.५६ टक्क्यांनी वाढून ९.२७ लाख कोटी रुपयांच्या पुढे गेल्या आहेत. जागतिक कर्जवाटप वार्षिक १५.८२ टक्क्याने वाढून ७.७१ लाख कोटी रुपयांवर पोहचले आहे. विदेशातील कर्जवाटपाने वार्षिक १४.२५ टक्के वाढ नोंदवली आणि ते १.१७ लाख कोटी रुपयांवर पोहोचले.

RAM Advances वाटा ५८.७४ टक्क्यांपर्यंत

किरकोळ कर्जवाटप वार्षिक २१.१९ टक्क्याने वाढले आहे, तर एमएसएमई क्षेत्रासाठीचे कर्जवाटप वार्षिक १७.६८ टक्क्यांनी वाढले आहे. कृषी कर्जवाटप वार्षिक १७.६० टक्क्याने आणि कॉर्पोरेट कर्जवाटप वार्षिक १२.०८ टक्क्याने वाढले. RAM Advances वाटा ५८.७४ टक्क्यांपर्यंत वाढला. ३१ मार्च २०२६ रोजी बँकेच्या कासा ठेवींमध्ये वार्षिक ७.३० टक्क्यांनी वाढ झाली तर कासा गुणोत्तर ३७.६४ टक्के होते.

संभाव्य बुडीत कर्जासाठीच्या तरतूदीत वाढ

एकूण एनपीए गुणोत्तर वार्षिक १.२९ टक्क्यांनी म्हणजेच १२९ बेसिस पॉइंट्सने वाढून १.९८ टक्क्यांवर पोहचले आहे. निव्वळ एनपीए गुणोत्तर ०.५६ टक्क्यांवर पोहचले असून ते वार्षिक ०.२६ टक्क्यांनी म्हणजेच २६ बेसिस पॉइंट्सने वाढले आहे. आर्थिक वर्ष २०२६ साठी संभाव्य बुडीत कर्जासाठीच्या तरतूदीत वार्षिक ०.२८ टक्क्यांनी म्हणजेच २८ बेसिस पॉइंट्सने वाढ झाली असून ती ०.४८ टक्के झाली आहे.

३१ मार्च २०२६ अखेर भांडवल पर्याप्तता गुणोत्तर १८.०१ टक्के इतके राहिले आहे.डिजिटल आणि पर्यायी माध्यमांच्या पातळीवर, आर्थिक वर्ष २०२६ मध्ये ५१ लाखांहून अधिक ग्राहक बँकेशी जोडले गेले आणि त्यामुळे एकूण युपीआय ग्राहकांची संख्या २७१ लाखांहून अधिक झाली आहे. पर्यायी वितरण माध्यमांद्वारे होणाऱ्या व्यवहारांची संख्या ७.६ अब्ज झाली असून त्यात वार्षिक २२ टक्के वाढ दिसून आली आहे.

6 लाख कोटी रुपये पाण्यात, Share Market मध्ये विक्रीचा सपाटा थांबेना, गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण

Web Title: Bank of india fy26 annual results net profit rises 10527 crore see more detials

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2026 | 04:35 PM

Topics:  

  • BOI
  • Business News
  • Central Bank of India
  • Marathi News

संबंधित बातम्या

World News : चांगलंच महाग पडलं Googleला ;आयर्लंडकडून तब्बल 403 दशलक्ष युरोचा दंड
1

World News : चांगलंच महाग पडलं Googleला ;आयर्लंडकडून तब्बल 403 दशलक्ष युरोचा दंड

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद
2

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद

World Politics :नेतन्याहू यांना अटक? बंद करतो तुम्हाला मिळणारा पैसा फुकट
3

World Politics :नेतन्याहू यांना अटक? बंद करतो तुम्हाला मिळणारा पैसा फुकट

world news : अमेरिकेला स्वर्ग नकोच आहे का ? पलाऊवर संकट
4

world news : अमेरिकेला स्वर्ग नकोच आहे का ? पलाऊवर संकट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.