Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crypto बाजारात भूकंप! 8 महिन्यांत किंमत झाली अर्धी; गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण, आता काय होणार?

जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी असलेल्या 'बिटकॉइन'ची किंमत ऑक्टोबर २०२४ नंतर पहिल्यांदाच इतकी घाली घसरली आहे. तब्बल ६०,००० डॉलर्सच्या पातळीच्या खाली घसरली असून, त्यामुळे त्याच्या मूल्यातील घसरण अधिकच तीव्र झाली आहे. ऑक्टोबरमध्ये १,२६,००० डॉलर्सहून अधिकचा उच्चांक गाठल्यानंतर, गेल्या 8 महिन्यांत बिटकॉइनचं मुल्य निम्म झालं आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jun 06, 2026 | 06:30 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी असलेल्या ‘बिटकॉइन’ची किंमत ऑक्टोबर २०२४ नंतर पहिल्यांदाच इतकी घाली घसरली आहे. तब्बल ६०,००० डॉलर्सच्या पातळीच्या खाली घसरली असून, त्यामुळे त्याच्या मूल्यातील घसरण अधिकच तीव्र झाली आहे. ऑक्टोबरमध्ये १,२६,००० डॉलर्सहून अधिकचा उच्चांक गाठल्यानंतर, गेल्या आठ महिन्यांत बिटकॉइनने आपल्या मूल्यापैकी निम्म्याहून अधिक मूल्यांवर आली आहे.

पुन्हा झटका… 5 रुपयांनी महागणार पेट्रोल-डिझेल? तेल कंपन्यांना होणाऱ्या तोट्यामुळे तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त

किती झाली घसरण?

शनिवारी सकाळी बिटकॉइनच्या किमतीत जवळपास 7 टक्क्यांची घसरण होऊन ती ५९,१०१ डॉलर्सवर आली. त्यानंतर त्याची ट्रेडिंग ५९,७४३.२१ डॉलर्सच्या आसपास होत असल्याचे दिसून आले. बाजार तज्ज्ञांच्या मते, बिटकॉइनवरील या दबावामागे लिक्विडिटीमधील बदल, आणि विशेषतः संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून होणाऱ्या गुंतवणुकीत झालेली घट, हे प्रमुख कारण आहे.

कुठे गुंतवणूक करताहेत लोकं?

गुंतवणूकदारांचा ओढा आता AI, डिफेन्स, ऊर्जा आणि पायाभूत सुविधा यांसारख्या क्षेत्रांकडे वळत आहेत. ज्यामुळे क्रिप्टोकरन्सी बाजारातून निधी काढून घेतले जात आहे. विश्लेषकांच्या मते, सोने आणि AI-संबंधित शेअर्समधील वाढत्या स्वारस्याचाही क्रिप्टोकरन्सीच्या मागणीवर परिणाम झाला आहे. याव्यतिरिक्त, अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात कपात होण्याची शक्यता आणि त्याबाबत गुंतवणूकदारांच्या बदलत्या दृष्टिकोनाचाही क्रिप्टो बाजारावर परिणाम होताना दिसत आहे.

गुंतवणूकदारांचा विश्वास परत येईल?

बाजारातील तज्ज्ञांच्या मते, बिटकॉइन ६०,००० ते ६२,००० डॉलर्सची महत्त्वाची support level टिकवून ठेवू शकते का, याकडे गुंतवणूकदार आता बारकाईने लक्ष देतील. जर ही पातळी टिकून राहिली, तर बाजारातील गुंतवणूकदारांचा विश्वास पुन्हा निर्माण होऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते, एक्सचेंज-ट्रेडेड फंड्स (ETFs) मधील गुंतवणुकीचा ओघ, संस्थात्मक सहभाग, जागतिक आर्थिक घडामोडी आणि भू-राजकीय परिस्थिती हे घटक नजीकच्या काळात बिटकॉइनची वाटचाल निश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील.

ट्रम्प यांच्या निवडणुकीतील विजयानंतर झाली वाढ

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय झाल्यानंतर बिटकॉइन गुंतवणूकदारांची पसंतीची निवड बनली होती आणि त्याची किंमत विक्रमी पातळीवर पोहोचली होती. मात्र, जागतिक आर्थिक अनिश्चितता, संस्थात्मक गुंतवणुकीतील घट आणि गुंतवणुकीच्या बदलत्या प्राधान्यक्रमांमुळे या प्रमुख क्रिप्टोकरन्सीला आता सततच्या दबावाचा सामना करावा लागत आहे.

Tech क्षेत्रातील सुवर्णकाळ संपला! अवघ्या 5 महिन्यांत 1 लाख IT कर्मचाऱ्यांची हकालपट्टी! कोणत्या कंपन्यांनी दिला झटका?

Web Title: Bitcoin price crash down by fifty percent investors withdrawing money marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2026 | 06:30 PM

Topics:  

  • Bitcoin
  • Business News
  • Cryptocurrency
  • Donald Trump
  • Marathi News

संबंधित बातम्या

Sangli : जात प्रमाणपत्र देता की जाता? कोळी समाजाची आक्रमक भूमिका
1

Sangli : जात प्रमाणपत्र देता की जाता? कोळी समाजाची आक्रमक भूमिका

Anshuman Vichare New House: अंशुमन विचारेचं स्वप्नातील घर पाहिलंत का? VIDEO शेअर करत पहिल्यांदाच दाखवली सुंदर झलक
2

Anshuman Vichare New House: अंशुमन विचारेचं स्वप्नातील घर पाहिलंत का? VIDEO शेअर करत पहिल्यांदाच दाखवली सुंदर झलक

ASUS इंडियाचा मोठा निर्णय! MSME क्षेत्रासाठी राजीव तलरेजा यांची ‘Mentor’ म्हणून नियुक्ती
3

ASUS इंडियाचा मोठा निर्णय! MSME क्षेत्रासाठी राजीव तलरेजा यांची ‘Mentor’ म्हणून नियुक्ती

Entrainment News: कॉन्सर्टच्या काही तास आधीच काळाचा घाला; ४४ वर्षीय भारतीय गायकाचा दुबईत मृत्यू
4

Entrainment News: कॉन्सर्टच्या काही तास आधीच काळाचा घाला; ४४ वर्षीय भारतीय गायकाचा दुबईत मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.