
फोटो सौजन्य सोशल मीडिया
फक्त २८ लाख लोकसंख्या असलेल्या या देशात सगळी तरुण पिढी देशातील वाढता भ्रष्टाचार आणि बेरोजगारी याला कंटाळून रस्त्यावर आली आहे . त्याच्यात पंतप्रधांनानी राजीनामा देणार नसल्याचे सांगताच तरुण अजूनच भडकले आणि त्यांनी थेट सुप्रीम कोर्टाची ऑफिसे फुकायला सुरवात केली . आणि ऑफिस पेटवले सुद्धा . आता या घटनेने देशातील वातावरण चांगलेच तापले असून सरकार विरोधात असंतोष आता रस्त्यावर उघडपणे हिंसेच्या माध्यमातून दिसू लागला आहे .
Gaza News : पैसा नाही ,मदत कशी करणार? संयुक्त राष्ट्राकडे पैसे नाहीत ;५ लाख पॅलेस्टानी उपाशी मारणार
अल्बानियामध्ये सुरु झालेल्या आंदोलनात विद्यार्थी आणि तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत . सरकारी कारभारातील कथित भ्रष्टाचार , विद्यापीठांमधील चांगल्या सुविधांचा अभाव , महाग झालेले शिक्षण आणि शिक्षण पूर्ण केल्यानंतरही रोजगाराच्या संधी मिळत नसल्याने आलेले नैराश्य या मुद्यांवरून अल्बानियातील तरुण मंडळी नाराज आहे .
पंतप्रधान एडी रामा यांच्या राजीनाम्याची मागणीही आंदोलनकर्त्यांकडून केली गेली आहे . सुरवातीला विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर केंद्रित असलेल्या या आंदोलनाचे स्वरूप आता व्यापक सरकारविरोधी आंदोलनात झाले आहे . या सगळ्या प्रकारामुळे सगळया देशात कमालीचा तणाव पसरला आहे .
अल्बानियाची राजधानी तिराना येथे आंदोलनादरम्यान परिस्थिती हाताबाहेर गेली . आंदोलकांनी सरकारी इमारतींना टार्गेट केले तर सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यालयांनाही आग लावण्यात आली आहे . यामुळे परिसरात धुराचे लोट पसरले आहेत . घटनास्थळी अग्निशमन दलाला घटनास्थळी धाव घ्यावी लागली . याअगोदर मंत्रालयाच्या इमारतीला आणि बँकांच्या शाखांनाही आगीच्या हवाली करण्यात आले आहे . पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या , पाण्याचे फवारे आणि रबराच्या गोळ्यांचा तूफान वापर केला आहे . तरीसुद्धा आंदोलक मागे हटायला तयार नसल्याचे दिसत आहे .
या आंदोलनादरम्यान १६७ जणांना अटक करण्यात आली असून १३२ पोलीस सुद्धा जखमी झाले आहेत . दुसरीकडे पंतप्रधान एडी रामा यांनी राजीनामा देण्यास स्पष्ट नकार दिला आहे . आंदोलन करण्याचा अधिकार मान्य असला , तरी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि हिंसाचार खपवून घेतला जाणार नाही अशी भूमिका त्यांनी मांडली आहे . त्यामुळे सरकार आणि आंदोलक यांच्यातील संघर्ष अजूनच तीव्र होण्याची शक्यता आहे .