Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Budget 2026 : अर्थसंकल्पाकडे शेतकऱ्यांचे लक्ष; PM किसान सन्मान योजनेची रक्कम वाढणार?

संपूर्ण देशाचे लक्ष 1 फेब्रुवारीला जाहीर होणाऱ्या अर्थ संकल्पाकडे लागलेले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण नवव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 31, 2026 | 03:54 PM
अर्थसंकल्पाकडे शेतकऱ्यांचे लक्ष; PM किसान सन्मान योजनेची रक्कम वाढणार?

अर्थसंकल्पाकडे शेतकऱ्यांचे लक्ष; PM किसान सन्मान योजनेची रक्कम वाढणार?

Follow Us
Close
Follow Us:
  • अर्थसंकल्पाकडे शेतकऱ्यांचे लक्ष
  • निर्मला सीतारमण नवव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार
  • पीएम किसान सन्मान योजनेची रक्कम वाढणार?
नवी दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. आता संपूर्ण देशाचे लक्ष 1 फेब्रुवारीला जाहीर होणाऱ्या अर्थ संकल्पाकडे लागलेले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण नवव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. नेहमीप्रमाणे, या अर्थसंकल्पाकडे शेतकऱ्यांचं लक्ष असणार आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची रक्कम अर्थसंकल्पात वाढेल का? हेही पाहणं महत्वाचं असणार आहे.

 

भारतातील शेतकऱ्यांचं लक्ष केंद्रीय अर्थसंकल्पाकडे लागलं आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून लाभार्थी शेतकऱ्यांना सध्या 6000 रुपये मिळतात, ती रक्कम वाढणार का याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये दिले जातात. ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये विभागून म्हणजेच प्रत्येक हप्त्यावेळी 2000 रुपये दिले जातात. सध्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम वर्ग केली जाते. सध्या शेतीचा खर्च वाढल्यामुळे पीएम किसान योजनेची रक्कम वाढेल का? ते पाहावे लागेल. पीएम किसान सन्मान निधी योजनेची सुरुवात डिसेंबर 2018 मध्ये करण्यात आली होती. आतापर्यंत पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या शेतकऱ्यांना 21 हप्त्यांची रक्कम देण्यात आली आहे.

पीएम किसान सन्मान निधी योजनेची रक्कम वाढवली तर शेतकऱ्यांना वाढत्या बी- बियाणे, खते, कीटकानशक, डिझेल, वीज, सिंचन यातील दरवाढीमुळं जो ताण पडतोय त्यातून थोडासा दिलासा मिळू शकतो. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढल्यास ग्रामीण भागात मागणी वाढू शकते. शेतकऱ्यांकडे खर्चासाठी पैसे अधिक असतील तेव्हा ग्रामीण भागातील बाजारात उलाढाल वाढेल.  आता पीएम सन्मान निधी योजनेच्या 22 व्या हप्त्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. दरम्यान शेतकऱ्यांना जरी पीएम किसानच्या हप्त्याची प्रतीक्षा असली तरी केंद्र सरकारकडून अद्याप रक्कम वाढी संदर्भात अधिकृत संकेत देण्यात आलेले नाहीत. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या रकमेत वाढ झाल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो.

हे सुद्धा वाचा : कंटाळवाणा नव्हे तर रेल्वेचा प्रवास सुखकर! Vande Bharat सुसाट, तब्बल ‘इतके’ कोटी…

सोन्याची किंमत होणार स्वस्त?

उद्या रविवार, १ फेब्रवारी २०२६ रोजी देशात नवीन अर्थसंकल्प सादर होणार आहे. केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांच्या हस्ते हे नवीन बजेट सादर केले जाणार असून याचा रोजच्या जीवनावर मोठा परिणाम होऊ शकतो. नव्या वर्षात तुम्हीही जर सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर नवे बजेट तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरु शकते. सोने, चांदी, प्लॅटिनम आणि रंगीत रत्ने यांसारख्या कच्च्या मालावरील आयात शुल्क कमी करण्याची मागणी सर्वात प्रमुख आहे. आयात शुल्क कमी केल्याने दागिन्यांच्या किमती कमी होऊ शकतात आणि निर्यात वाढू शकते. सरकारच्या धोरणात्मक निर्णयामुळे उद्योगालाच नाही तर ग्राहकांनाही सोनं खरेदी करणं सोईचं ठरेल.

Web Title: Farmers across the country are expecting an increase in the amount of pm kisan samman yojana

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 31, 2026 | 03:54 PM

Topics:  

  • budget 2026
  • Nirmala Sitaraman
  • PM Kisan Yojana

संबंधित बातम्या

Budget 2026: कंटाळवाणा नव्हे तर रेल्वेचा प्रवास सुखकर! Vande Bharat सुसाट, तब्बल ‘इतके’ कोटी…
1

Budget 2026: कंटाळवाणा नव्हे तर रेल्वेचा प्रवास सुखकर! Vande Bharat सुसाट, तब्बल ‘इतके’ कोटी…

Budget 2026: हलवा सेरेमनी आज, तोंड गोड करून ‘बंदिस्त’ होणार अधिकारी आणि कर्मचारी
2

Budget 2026: हलवा सेरेमनी आज, तोंड गोड करून ‘बंदिस्त’ होणार अधिकारी आणि कर्मचारी

Budget 2026: भारतीय इतिहासातील असा एकमेव अर्थसंकल्प जेव्हा नव्हता बनवला गेला हलवा; जाणून घ्या यामागील रंजक कारण
3

Budget 2026: भारतीय इतिहासातील असा एकमेव अर्थसंकल्प जेव्हा नव्हता बनवला गेला हलवा; जाणून घ्या यामागील रंजक कारण

Old Tax Regime : जुनी टॅक्स पद्धत रद्द होणार की नवीन टॅक्स प्रणालीमध्ये बदल होणार? काय आहे संपूर्ण योजना? जाणून घ्या सविस्तर बातमी
4

Old Tax Regime : जुनी टॅक्स पद्धत रद्द होणार की नवीन टॅक्स प्रणालीमध्ये बदल होणार? काय आहे संपूर्ण योजना? जाणून घ्या सविस्तर बातमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.