अर्थसंकल्पात रेल्वेसाठी मोठी घोषणा होणार (फोटो -सोशल मीडिया)
निर्मला सीतारमण सादर करणार 9 व्यां दा अर्थसंकल्प
रेल्वेसाठी खास पॅकेज जाहीर केले जाण्याचा अंदाज
नागरिकांच्या प्रतीक्षा लवकरच संपणार
Indian Railway 2026: उद्या भारताचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण या सलग 9 व्यां दा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. दरम्यान यंदाच्या बजेटमध्ये रेल्वेसाठी खास पॅकेज असण्याची शक्यता आहे. निर्मला सीतारमण रेल्वेसाठी 2.70 लाख कोटी ते 2.80 लाख कोटींचा निधी जाहीर करण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. रेल्वेची सुविधा आधुनिक व आरामदायी करण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करताना दिसून येत आहे.
यंदाच्या अर्थसंकल्पात रेल्वेला सर्वाधिक निधी मिळण्याचा अंदाज आहे. भारत सरकार रेल्वेसाठी 2.70 लाख कोटी ते 2.80 लाख कोटींचा निधी जाहीर करू शकते. रेल्वे मार्गांचा विस्तार, नवीन रेल्वेची निर्मिती, आधुनिकता यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. प्रवाशांचा प्रवास आरामदायी होण्यासाठी भारत सरकार वंदे भारत स्लीपर ट्रेन आणणार आहे.
Budget 2026: हलवा सेरेमनी आज, तोंड गोड करून ‘बंदिस्त’ होणार अधिकारी आणि कर्मचारी
भारत सरकार जून महिन्यांपर्यंत 8 वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची शक्यता आहे. पूर्ण आर्थिक वर्षात भारताला 12 आधुनिक वंदे भारत स्लीपर ट्रेन मिळणार आहेत. या ट्रेन विशेष असे रात्रीच्या प्रवासासाठी निर्माण करण्यात आली आहे. मध्यम वर्गांसाठी अमृत भारत रेल्वेचा विस्तार केला जाणार आहे.
मार्च महिन्यापर्यन्त अमृत भारत रेल्वेचा विस्तार केला जाणार आहे. याचे नवीन व्हर्जन सुरू केले जाणार आहे. यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला जाणार आहे. यामुळे प्रवाशांचा प्रवास आरामदायी आणि सुरक्षित होण्यास मदत होणार आहे. तसेच पुढील दोन वर्षांत वेटिंग लिस्टची अडचण दूर करण्याचा प्रयत्न सरकार करणार आहे.अतिरिक्त डबे आणि नवीन पिढीची रेल्वे तयार केली जाणार आहे. या सर्व गोष्टी उद्या बजेटमध्ये समाविष्ट केल्या जाणार आहेत.
Budget 2026 : बजेटनंतर सोन्याची किंमत होणार स्वस्त? सरकारच्या या घोषणांमुळे गोल्ड शॉपिंग होणार सोयीची
तोंड गोड करून ‘बंदिस्त’ होणार अधिकारी आणि कर्मचारी
केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ च्या सादरीकरणाची उलटी गिनती सुरू झाली आहे. आज, २७ जानेवारी रोजी, दिल्लीतील नॉर्थ ब्लॉक येथील अर्थ मंत्रालयात पारंपारिक “हलवा समारंभ” आयोजित केला जात आहे. या समारंभात, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प तयार करण्यात सहभागी असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मिठाई देऊन अर्थसंकल्पाच्या छपाईला सुरुवात करतील. भारतीय परंपरेनुसार, कोणत्याही मोठ्या कार्यक्रमापूर्वी मिठाई खाणे शुभ मानले जाते, परंतु प्रशासकीय दृष्टिकोनातून, या समारंभाचे खूप खोल महत्त्व आहे. हलवा समारंभ हा केवळ एक विधी नसून अर्थसंकल्पाच्या गुप्ततेच्या सुरुवातीचा अधिकृत संकेत आहे. हलवा समारंभानंतर लगेचच, अर्थसंकल्प तयार करण्यात थेट सहभागी असलेले सुमारे ६० ते ७० अधिकारी आणि कर्मचारी “लॉक-इन” कालावधीत प्रवेश करतात.






