Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Latur District Budget 2026: अर्थसंकल्पात लातूरच्या विकासाकडे दुर्लक्ष करून पदरी ‘वाटाण्याच्या अक्षता’? 

२०२६ च्या अर्थसंकल्पात लातूर जिल्ह्याच्या भौगोलिक, शैक्षणिक, वैद्यकीय, पर्यटन व औषधी संशोधनाच्या संभावनांकडे दुर्लक्ष करत जिल्ह्याच्या पदरी 'वाटाण्याच्या अक्षता'च पडल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.

  • By Priti Hingane
Updated On: Feb 02, 2026 | 04:57 PM
Latur Municipal corporation: अजेंडातील त्रुटींवरून लातूर मनपात तणाव; सत्ताधारी-विरोधकांचा प्रशासनावर हल्लाबोल

Latur Municipal corporation: अजेंडातील त्रुटींवरून लातूर मनपात तणाव; सत्ताधारी-विरोधकांचा प्रशासनावर हल्लाबोल

Follow Us
Follow Us:
  • अर्थसंकल्पात लातूरच्या विकासाकडे दुर्लक्ष
  • पूरप्रवण ठिकाणी संरक्षक उपाययोजनांकडे कानाडोळा
  • ऐतिहासिक व धार्मिक पर्यटनस्थळांसाठी स्वतंत्र तरतूद नाही
 

Latur District Budget 2026: शैक्षणिक व वैद्यकीय हब म्हणून ओळखला जाणारा लातूर जिल्हा विदर्भ, कर्नाटक व आंध्रप्रदेशच्या सीमाभागांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. लातूर जिल्ह्याच्या भौगोलिक, शैक्षणिक, वैद्यकीय, पर्यटन व औषधी संशोधनाच्या संभावनांकडे दुर्लक्ष करत जिल्ह्याच्या पदरी ‘वाटाण्याच्या अक्षता’च पडल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. अनेक राष्ट्रीय महामार्ग लातूर जिल्ह्यातून जातात. मात्र या महामार्गावरील अनेक पुलांची उंची कमी असल्याने यंदाच्या अतिवृष्टीत राज्य मार्गांसह गावांतर्गत रस्ते आणि राष्ट्रीय महामार्गावरील पुलांवरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते.

Sector Budget 2026: उत्पादन क्षेत्रावर सरकारचा मोठा भर! औषधनिर्माण, कापड उद्योग ते सायन उद्योगापर्यंत मिळणार चालना

परिणामी अनेक वेळा वाहतूक पूर्णतः बंद करावी लागली. काही ठिकाणी पूरपाण्यात वाहून गेल्याने नागरिकांना जीवही गमवावा लागला. या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थसंकल्पात महामार्गांसाठी तरतुदीची अपेक्षा होती. पुलांची उंची वाढवणे, पूरप्रवण ठिकाणी संरक्षक उपाययोजना करणे. याबाबत ठोस उल्लेख दिसत नाही. मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीत वंदे भारतच्या डब्यांची निर्मिती लवकरच सुरू होणार असली, तरी त्यातून लातूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र आर्थिक नियोजन जाणवत नाही.

जिल्ह्यात औसा येथील किल्ला, उदगीरचा किल्ला, निलंगा व रेणापूर तालुक्यातील धार्मिक स्थळे अशी अनेक ऐतिहासिक व धार्मिक पर्यटनस्थळे असूनही अर्थसंकल्पात पर्यटन विकासासाठी कोणतीही विशेष तरतूद करण्यात आलेली नाही. तसेच वडवळ नागनाथ येथील वनस्पती बेट हे वनौषधीसाठी देशविदेशात प्रसिद्ध असून दुर्धर आजारांवर उपचार व सशोधनासाठी येथे मोठ्या प्रमाणावर नागरिक येतात. मात्र या क्षेत्राच्या विकासासाठीही अर्थसंकल्पात कोणतीही ठोस योजना नसल्याचे स्पष्ट होत आहे.

Union Budget 2026 : संसदेचे वातावरण तापणार! अर्थसंकल्पावरुन विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरणार

लातूर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावरील कमी उंचीचे पूल असल्याने पूर व अपघातांचा धोका कायम असतो. त्यामुळे अतिवृष्टीत वारंवार वाहतूक बंद करावी लागते. कधी जीवितहानीची घटनाही होते. मात्र, यावर कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. ऐतिहासिक व धार्मिक पर्यटनस्थळांसाठी स्वतंत्र तरतूद नाही. वडवळ नागनाथ वनौषधी बेटाच्या संशोधन व विकासासाठी योजना नाही. शैक्षणिक वैद्यकीय हब असूनही भविष्योन्मुख आर्थिक नियोजनाचा अभाव असल्याने मुलांचे नुकसान होत आहे. या सगळ्या गोष्टींना दुर्लक्षित केल्याने लातूरचा विकास खुंटला आहे.

Web Title: Latur district feels ignored despite strategic and development potential

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2026 | 04:57 PM

Topics:  

  • budget 2026
  • Budget 2026-2027
  • Budget Session 2026
  • Latur
  • Nirmala Sitaraman

संबंधित बातम्या

Latur Crime: आधी प्रेमसंबंध, मग मालमत्तेचा वाद… शेवटी तोंडावर उकळते तेल; उदगीरच्या घटनेने खळबळ
1

Latur Crime: आधी प्रेमसंबंध, मग मालमत्तेचा वाद… शेवटी तोंडावर उकळते तेल; उदगीरच्या घटनेने खळबळ

MLC Election Result 2026 : उस्मानाबाद-लातूर-बीड विधान परिषदेत भाजपचा दणदणीत विजय; बसवराज पाटील 719 मतांनी विजयी
2

MLC Election Result 2026 : उस्मानाबाद-लातूर-बीड विधान परिषदेत भाजपचा दणदणीत विजय; बसवराज पाटील 719 मतांनी विजयी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.