Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Union Budget 2026: ‘रविवार’चा अर्थसंकल्प गुंतवणूकदारांसाठी ठरला काळा दिवस; सोने-चांदीही कोसळली

रविवारी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ वर बाजारांनी तीव्र प्रतिक्रिया दिली, ज्यामुळे सेन्सेक्स २०००हून अधिक अंकांनी कोसळला, निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली. एफ अँड ओ व्यवहारांवरील एसटीटी वाढीमुळे सोने-चांदीचे दर घसरले

  • By Priti Hingane
Updated On: Feb 01, 2026 | 06:56 PM
Today's Share Market: इराण-इस्रायल तणावाचा फटका! शेअर बाजारात मोठी पडझड; सेन्सेक्स १,८६२ अंकांनी घसरला  (फोटो-सोशल मीडिया)

Today's Share Market: इराण-इस्रायल तणावाचा फटका! शेअर बाजारात मोठी पडझड; सेन्सेक्स १,८६२ अंकांनी घसरला  (फोटो-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • लाईव्ह बजेटमध्येच बाजार कोसळला
  • सेन्सेक्स २००० अंकांनी घसरला 
  • शेअर्ससोबत सोने-चांदीही आपटली 
 

Union Budget 2026: रविवार, १ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. हे अर्थसंकल्प ऐतिहासिक होते कारण, पहिल्यांदाच देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प रविवारी सादर करण्यात आला. या निमित्ताने शेअर बाजारातील बीएसई, एनएसई आणि एमसीएक्स विशेष व्यवहारांसाठी खुले राहिले. तथापि, रविवारचा अर्थसंकल्प मात्र गुंतवणूकदारांसाठी अशुभ ठरला.

अर्थमंत्र्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान सेन्सेक्स एकदम २००० अंकांनी घसरला. एनएसई निफ्टीमध्येही लक्षणीय घसरण दिसून आली. राष्ट्रीय अर्थसंकल्पाचे सादरीकरण आणि सुट्टीच्या दिवशी शेअर बाजारात व्यवहार करण्याचा निर्णय अशुभ असल्याचे म्हटले जात असून हा शेअर बाजारातील ‘काळा’ दिवस मानला जात आहे.

Bio-Pharma Budget 2026: अर्थसंकल्पात जाहीर केली ‘बायो फार्मा शक्ती’ योजना! भारत बनणार जागतिक बायो-फार्मा हब 

२०२६ च्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या सुरुवातीला निफ्टी ५० निर्देशांक २५,३३३.७५ वर उघडला, ज्यामध्ये १३.१० अंकांनी किंवा ०.०५ टक्के किरकोळ वाढ झाली. बीएसई सेन्सेक्स १७६.१९ अंकांनी किंवा ०.२१ टक्क्यांनी वाढून ८२,४४५.९७ वर उघडला. तथापि, २०२६ च्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या मध्यात भारतीय शेअर बाजारात लक्षणीय घसरण दिसून आली. सेन्सेक्स २००० अंकांनी मोठ्या प्रमाणात घसरला, ज्यामुळे शेअर बाजारात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान फ्युचर्स ट्रेड्सवरील एसटीटी ०.०२ टक्क्यांवरून ०.०५ टक्क्यांपर्यंत वाढवला जाईल अशी घोषणा केली. शिवाय, अर्थमंत्र्यांनी ऑप्शन्स प्रीमियमवरील एसटीटी ०.१ टक्क्यांवरून ०.१५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव मांडला. याचा थेट शेअर बाजारावर नकारात्मक परिणाम झाला. व्यापक बाजारपेठांमध्येही घसरण झाली. निफ्टी मिडकॅप १०० २.७ टक्क्यांनी घसरला आणि निफ्टी स्मॉलकॅप १०० ३.४ टक्क्यांनी घसरला.

Defence budget 2026: संरक्षण क्षेत्रासाठी ७.८५ लाख कोटींची विक्रमी तरतूद; शस्त्रसामग्रीसाठी २.१९ लाख कोटी

या पूर्वी अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान सेन्सेक्स ८०० पेक्षा जास्त अंकांनी घसरून ८१,४२० वर पोहोचला. निर्देशांक दिवसाच्या उच्चांकापेक्षा १,२०० पेक्षा जास्त अंकांनी खाली आला. दरम्यान, निफ्टी ३०० अंकांनी घसरून २५,०१८ वर पोहोचला. बँक निफ्टी देखील ७०० पेक्षा जास्त अंकांनी घसरला. निर्देशांक दिवसाच्या उच्चांकापेक्षा ९०० पेक्षा जास्त अंकांनी खाली आला. तथापि, काही वेळातच मात्र पूर्ण बाजार कोसळला.

बजेटच्या दिवशी, शेअर बाजारासह कमोडिटी मार्केट एमसीएक्सवर व्यवहार सुरू राहिले. बाजार उघडताच चांदीच्या किमतींना सर्वात मोठा धक्का बसला. १ किलो चांदीची किंमत अचानक २७,००० रुपयांपर्यंत घसरली, ज्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. या घसरणीपासून सोने देखील वाचले नाही, किंमती १३,००० पेक्षा जास्त घसरल्या. २०२६-२७ च्या केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी ट्रेडिंगमध्ये सोने आणि चांदीच्या किमती ९ टक्क्यांपर्यंत घसरल्या.

Web Title: Sunday budget turns unlucky sensex crashes 2000 points during budget 2026 speech

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 06:56 PM

Topics:  

  • budget 2026
  • Budget 2026-2027
  • Budget Session 2026
  • Gold-Silver Rate
  • Nifty
  • sensex
  • share market

संबंधित बातम्या

Stock Market Crash: गुंतवणूकदारांना मोठा झटका! 12 फायनान्शियल कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये ₹1.12 लाख कोटींची घट
1

Stock Market Crash: गुंतवणूकदारांना मोठा झटका! 12 फायनान्शियल कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये ₹1.12 लाख कोटींची घट

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरात किंचित घसरण, चांदी मात्र स्थिर; जाणून घ्या आजचा भाव
2

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरात किंचित घसरण, चांदी मात्र स्थिर; जाणून घ्या आजचा भाव

IPO Listingलाच मोठा धक्का! बाजारात एन्ट्री करताच शेअरला Lower Circuit
3

IPO Listingलाच मोठा धक्का! बाजारात एन्ट्री करताच शेअरला Lower Circuit

Share Market Today: शेअर बाजारात आज काय घडणार? काय म्हणाले तज्ज्ञ? ‘या’ शेअर्सवर ठेवा नजर
4

Share Market Today: शेअर बाजारात आज काय घडणार? काय म्हणाले तज्ज्ञ? ‘या’ शेअर्सवर ठेवा नजर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.