दोन बँकांमध्ये खाते असल्यास दंड ठोठावला जाणार? वाचा... आरबीआयचा नियम काय?
आजच्या तारखेला जवळपास सर्वच नागरिकांचे बँकेत खाते आहे. केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी बँक खाते असणे आवश्यक आहे. नोकरदार व्यक्तींचे अनेकदा दोन बँकेत खाते असतात. तसेच व्यापाऱ्यांचे सुद्धा दोन किंवा त्यापेक्षा अधिक बँकेत खाते असतात. दरम्यान, सोशल मीडियात एक मेसेज व्हायरल होत आहे की, भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच आरबीआयच्या नव्या नियमांनुसार एकापेक्षा जास्त बँकांमध्ये खाते असल्यास दंड ठोठावला जाईल.
सोशल मीडियात व्हायरल होणाऱ्या या मेसेजमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. यावर आता केंद्र सरकारकडून प्रतिक्रिया समोर आली आहे.
काय आहे व्हायरल मेसेज?
सोशल मीडियात व्हायरल होणाऱ्या मेसेजमध्ये लिहिले आङे की, दोन बँकांमध्ये खाते असल्यास तुम्हाला कठोर दंड ठोठावला जाईल. या संदर्भात आरबीआयने आपल्या नवीन गाईडलाईन्स जाहीर केल्या आहेत.
⚠️ Fake News Alert
कुछ आर्टिकल में यह भ्रम फैलाया जा रहा है कि भारतीय रिजर्व बैंक की नई गाइडलाइंस के अनुसार, अब एक से अधिक बैंक में खाता रखने पर जुर्माना लगाया जाएगा।#PIBFactCheck
▶️ @RBI ने ऐसी कोई गाइडलाइन जारी नहीं की है।
▶️ ऐसे फर्जी खबरों से सावधान रहें! pic.twitter.com/I5xC1yiaPy
— PIB Fact Check (@PIBFactCheck) August 3, 2024
‘या’ आठवड्यात 6 आयपीओ गुंतवणुकीसाठी खुले होणार; बक्कळ नफा मिळवण्यासाठी पैसे तयार ठेवा!
व्हायरल मेसेज मागचे तथ्य काय?
भारत सरकारच्या प्रेस एजन्सी प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो किंवा पीआयबीने व्हायरल मेसेजचे सत्य सर्वांसमोर आले आहे. व्हायरल होणारा मेसेज खोटा असल्याचे पीआयबीने म्हटले आहे. या संदर्भात काही महिन्यांपूर्वी पीआयबीने ट्वीट करत म्हले होते की, “काही मेसेजेस, न्यूजमध्ये हा गैरसमज पसरवला जात आहे की, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नवीन मार्गदर्शक तत्वांनुसार आता एकापेक्षा जास्त बँकांमध्ये खाती असल्यास दंड आकारला जाईल.”
पीआयबीने हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे म्हटले आहे. पीआयबीने म्हटले की, भारतीय रिझर्व्ह बँकेने अशा प्रकारच्या कोणत्याही नव्या गाईडलाईन्स किंवा मार्गदर्शक सूचना जाहीर केलेल्या नाहीयेत.
दिशाभूल करणाऱ्या मेसेजची तक्रार
अशा प्रकारच्या बातम्या किंवा सरकारच्या संबंधित कोणतीही दिशाभूल करणारी बातमी व्हायरल होत असेल तर त्याची सत्यता तपासण्यासाठी तुम्ही पीआयबी फॅक्ट चेकची मदत घेऊ शकतात. तसेच पीआयबीच्या फॅक्ट चेकला दिशाभूल कऱणार्या बातमीचा स्क्रीनशॉट, ट्वीट, फेसबूक पोस्ट factcheck@pib.gov.in यावर ईमेल करु शकतात.