वर्ष अखेरीस शेअर बाजारात 'या' आयपीओचा धुमाकूळ; गुंतवणूकदारांना दिलाय दुप्पट नफा!
गेल्या महिन्यात अनेक आयपीओ शेअर बाजारात दाखल झाले होते. त्यानंतर आता या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सहा कंपन्यांचे आयपीओ गुंतवणुकीसाठी खुले होणार आहे. या आयपीओंना सेबीकडून मंजुरी देखील मिळाली आहे. त्यामुळे आता गुंतवणूकदारांसाठी ही मोठी संधी असणार आहे. यामध्ये 3 कंपन्यांचे आयपीओ आधीपासून खुले असून, आणि तीन कंपन्यांचे आयपीओ चालू आठवड्यात बाजारात दाखल होणार आहेत.
1. अग्रवाल टफनेड ग्लास इंडिया लिमिटेड आयपीओ
अग्रवाल टफनेड ग्लास इंडिया लिमिटेड कंपनीचा आयपीओ 28 नोव्हेंबर रोजी उघडला असून तो 2 डिसेंबरपर्यंत खुला राहणार आहे. या आयपीओचा आकार 62.64 कोटी रुपये असून कंपनी 58 लाख नवीन शेअर्स जारी करणार आहे. या आयपीओची किंमत 105 रुपये ते 108 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली असून सध्या कंपनीचा जीएमपी 9 रुपये प्रति शेअर आहे.
(फोटो सौजन्य – istock)
2. गणेश इन्फ्रावर्ल्ड आयपीओ (एनएसई, एसएमई)
गणेश इन्फ्रावर्ल्ड लिमिटेड आयपीओचा आकार 98.58 कोटी असून हा आयपीओ पूर्णपणे नवीन शेअर्सवर आधारित असेल. आयपीओ 29 डिसेंबर रोजी उघडला. तो 3 डिसेंबरपर्यंत गुंतवणुकीसाठी खुला राहील. आयपीओची किंमत 78 रुपये ते 83 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली आहे.
3- सुरक्षा क्लिनिक अँड डायग्नोस्टिक आयपीओ
सुरक्षा क्लिनिक अँड डायग्नोस्टिक लिमिटेड हा मेनबोर्ड असून कंपनीच्या आयपीओचा आकार 846.25 कोटी आहे. कंपनी आयपीओद्वारे ऑफर फॉर सेल अंतर्गत 1.92 कोटी शेअर जारी करेल. तसेच बोली लावण्यासाठी 420 ते 441 रुपयांचा किंमत पट्टा निश्चित करण्यात आला आहे. हा आयपीओ 29 नोव्हेंबर ते 3 डिसेंबरपर्यंत खुला राहील.
4 – प्रॉपर्टी शेअरचा आयपीओ
प्रॉपर्टी शेअर कंपनीच्या आयपीओचा आकार 352.91 कोटी रुपये असून हा आयपीओ 2 डिसेंबर रोजी उघडेल. कंपनीचा आयपीओ 4 डिसेंबरपर्यंत खुला राहील. कंपनीने अद्याप प्राइस बँड जाहीर केलेला नाही.
5- निसस फायनान्स सर्व्हिसेसचा आयपीओ
निसस फायनान्स सर्व्हिसेस कंपनीचा आयपीओ 4 डिसेंबरला उघडेल. कंपनीचा आयपीओ 6 डिसेंबरपर्यंत खुला राहील. कंपनी आयपीओच्या माध्यमातून 114.24 कोटी रुपये उभारण्याचा प्रयत्न करणार आहे. आयपीओचा किंमतपट्टा 170 ते 180 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला असून सध्या हा IPO ग्रे मार्केटमध्ये 50 रुपयांच्या प्रीमियमवर ट्रेडिंग करत आहे.
6- एमराल्ड टायर मॅन्युफॅक्चरर्सचा आयपीओ
एमराल्ड टायर मॅन्युफॅक्चरर्स या एसएमई कंपनीचा आयपीओ 90 ते 95 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला आहे. कंपनीने 1200 शेअर्सचा एक लॉट बनवला आहे. हा आयपीओ 5 डिसेंबर ते 9 डिसेंबरपर्यंत गुंतवणूकीसाठी खुला राहील.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)