फोटो सौजन्य: X.com
हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात वेगळे झाले आहेत. मात्र, त्यांचा मुलगा अगस्त्यच्या आनंदाच्या बाबतीत ते अजूनही तडजोड करत नाहीत. ही गोष्ट आज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
अलिकडेच मुंबईत या नात्याची एक अतिशय सुंदर झलक पाहायला मिळाली. हार्दिक पांड्याने त्याचा मुलगा अगस्त्य आणि नताशाला एक अतिशय आलिशान Land Rover Defender भेट दिली. जेव्हा या आलिशान कारच्या डिलिव्हरीचे फोटो सोशल मीडियावर समोर आले तेव्हा चाहते हार्दिकच्या या कृतीचे कौतुक करण्यापासून स्वतःला रोखू शकले नाहीत.
Hardik Pandya’ heartwarming Gesture : – Hardik Pandya has reportedly gifted a brand new Land Rover Defender to his son, Agastya, and his ex wife, Natasa Stankovic. – Despite their public separation, this gesture highlights Hardik’s commitment to ensuring his son and Natasa are… pic.twitter.com/WxcKehjnnR — CricPal (@AnupPalAgt) February 22, 2026
‘या’ कंपनीचा मोठा निर्णय, 2.80 कोटींची किंमत असणाऱ्या ‘या’ Luxury Car ला बोलावले परत
शोरूमकडून शेअर करण्यात आलेल्या छायाचित्रांमध्ये अगस्त्य आपल्या नव्या काळ्या रंगाच्या मोठ्या कारकडे पाहून खूप उत्साहित दिसत होता. कधी तो कारच्या आत डोकावून पाहत होता, तर कधी तिला स्पर्श करून तिची ओळख करून घेत होता. दरम्यान, नताशा डीलरशिपच्या कर्मचाऱ्यांकडून गिफ्ट हॅम्पर स्वीकारताना आनंदात दिसली. शोरूमने आपल्या पोस्टमध्ये नमूद केले की हार्दिकने पुन्हा एकदा विश्वास आणि मजबुतीची निवड केली आहे. पती-पत्नी म्हणून त्यांचे मार्ग वेगळे झाले असले, तरी पालक म्हणून ते आजही एकमेकांचा सन्मान राखत असल्याचे या प्रसंगातून दिसून आले.
नवीन Tata Punch EV 2026 मध्ये असे कोणते बदल झाले आहेत? रेंज तर वाढलीच मात्र सेफ्टी…
या ‘बाहुबली’ एसयूव्हीबद्दल बोलायचे झाले, तर Land Rover Defender ही केवळ एक कार नसून ती एक स्टेटस सिम्बॉल मानली जाते. रस्त्यावर तिची दमदार उपस्थिती जाणवते आणि कामगिरीही तितकीच प्रभावी आहे. सर्वात शक्तिशाली ‘ऑक्टा’ व्हेरिएंटमध्ये BMW चे इंजिन देण्यात आले असून ते तब्बल 635 bhp पॉवर निर्माण करते. ही मोठी आणि दमदार एसयूव्ही अवघ्या 3.8 सेकंदांत 0 ते 100 किमी प्रतितास वेग गाठू शकते. याची एक्स-शोरूम किंमत सुमारे 1.26 कोटी रुपयांपासून सुरू होऊन टॉप मॉडेलसाठी 2.59 कोटी रुपयांपर्यंत जाते.






