Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Business Loan : सरकारचा महत्त्वाचा निर्णय! MSME ला मिळणार मोठा निधी! ग्रामीण भागात सहज कर्ज होणार उपलब्ध

Business Loan : देशातील सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांना MSME आर्थिक बळ देण्यासाठी केंद्र सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. भारतीय लघु उद्योग विकास बँकेला केंद्र सरकारने नवीन निर्देश दिले आहेत. आता ग्रामीण भाग आणि लहान शहरांमधील उद्योजकांपर्यंत सहज कर्ज पोहोचवले जाणार आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 26, 2026 | 06:08 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • सरकारचा महत्त्वाच निर्णय!
  • MSME ला मिळणार मोठा निधी!
  • ग्रामीण भागात सहज कर्ज होणार उपलब्ध
Business Loan : देशाच्या आर्थिक विकासाला आणखी वेग देण्यासाठी सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. GDP मध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना आता मोठा निधी मिळणार आहे. या क्षेत्राना अधिक कर्ज मिळवून देण्याचे प्रयोजन करण्यात आलं आहे. यामुळे उत्पादन क्षेत्राला चालना मिळेल आणि देशाच्या आर्थिक प्रगतीला गती मिळेल. देशाच्या जीडीपीमध्ये MSME चे योगदान अंदाजे ३१ टक्के आहे. त्यामुळे निर्णय देशासाठी बराच मोठा ठरणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागात आता सहज कर्ज उपलब्ध होणार आहे. नेमका कोणाला काय फायदा होणार आहे? सविस्तर समजून घेऊयात. ( Business Loan )

Chicken Price Hike : आधी भाजीपाला, मग अंडी अन् नंतर चिकनचा नंबर? श्रावण महिना संपताच खवय्यांच्या खिशाला बसणार मोठा झटका!

केंद्र सरकारने स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाला म्हणजेच SIDBI ला देशभरातील ग्रामीण आणि निमशहरी भागांतील MSME ना अधिक कर्ज देण्यासाठी प्रयोजन करण्यास सांगितलं आहे. त्यासाठी आपल्या कार्याचा विस्तार करण्याचे आदेश दिले आहेत. बुधवारी जारी केलेल्या एका अधिकृत निवेदनानुसार, लहान व्यवसाय आणि उद्योजकांना प्रभावीपणे आर्थिक सहाय्य देण्यासाठी प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या विस्तृत जाळ्याचा उपयोग केला जाणार आहे.

SIDBI आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांना एकत्र येण्याची गरज

SIDBI आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांना एकत्र येण्याची गरज असल्याचं व्यक्त करण्यात आली आहे. सिडबी आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत, वित्तीय सेवा विभागाचे सचिव, संजय लोहिया यांनी हे स्पष्ट केलं. सिडबी आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांची ताकद एकत्र करण्याची गरज असल्याच त्यांनी सांगितलं.

हे सांगताना ते म्हणाले की, सिडबीला एमएसएमई क्षेत्राच्या आर्थिक गरजांची सखोल माहिती आहे. प्रादेशिक ग्रामीण बँका देशभरातील लहान शहरे, गावे आणि खेड्यापाड्यांत पोहोचू शकतात. त्यामुळे, या दोन संस्थांमधील सहकार्य फार गरजेचं आहे. ग्रामीण आणि निमशहरी भागांतील लहान उद्योगांसाठी पतपुरवठा वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.

काय होणार फायदे?

या उपक्रमामुळे प्रादेशिक ग्रामीण बँकांना त्यांच्या कर्ज पोर्टफोलिओमध्ये विविधता आणता येईल. केवळ कृषी कर्जांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून राहण्याऐवजी, एमएसएमई क्षेत्राला कर्ज दिल्याने त्यांच्या व्यावसायिक कार्यांना मजबुती मिळणार आहे. नियमांवर आधारित डिजिटल अंडररायटिंग प्रणालीच्या वापरामुळे मालमत्तेची गुणवत्ता उत्तम राखण्यासही मदत होईल.

Food Safety Action : चिकन खाणं पडलं महागात, कॅफेच्या निष्काळजीपणामुळे महिला आजारी! कोर्टाने ठोठावला मोठा दंड

Web Title: Business loan sidbi to provide more loans to msmes government big directive

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2026 | 06:01 PM

Topics:  

  • Business
  • Central government
  • Loan
  • MSME

संबंधित बातम्या

CJP Protest Warning To Central Govt: केंद्र सरकारने विश्वासघात केला! सीजेपीचा पुन्हा देशव्यापी आंदोलनाचा इशारा
1

CJP Protest Warning To Central Govt: केंद्र सरकारने विश्वासघात केला! सीजेपीचा पुन्हा देशव्यापी आंदोलनाचा इशारा

Gold Loan Business : सोन्यावर कर्ज देण्याच्या धंद्यात एवढी कमाई? टाटा, गोदरेज, बिर्ला… समुहांची धडाधड एन्ट्री, नेमका काय प्लॅन?
2

Gold Loan Business : सोन्यावर कर्ज देण्याच्या धंद्यात एवढी कमाई? टाटा, गोदरेज, बिर्ला… समुहांची धडाधड एन्ट्री, नेमका काय प्लॅन?

सुट्टीत Rapido चालवून बेंगळुरूच्या विद्यार्थ्याने कमावले पैसे! गिग इकॉनॉमीचे सांगितले असे अनुभव की वाचून थक्क व्हाल!
3

सुट्टीत Rapido चालवून बेंगळुरूच्या विद्यार्थ्याने कमावले पैसे! गिग इकॉनॉमीचे सांगितले असे अनुभव की वाचून थक्क व्हाल!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.