
differance
MBA vs PGDM Difference: व्यवसाय आणि व्यवस्थापन क्षेत्रात उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर वारंवार एक महत्त्वाचा प्रश्न येतो— एमबीए (MBA) करावे की पीजीडीएम (PGDM)? दोन्ही कोर्सेस व्यवस्थापनाशी संबंधित असले आणि त्यांच्या करिअरच्या संधींमध्ये फारसा फरक नसला, तरी त्यांच्यामध्ये काही बारीक सारिक बाबींमध्ये फरक दिसून येतो. या दोन्ही कोर्सेसची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.
एमबीए (MBA): हा एक ‘डिग्री कोर्स’ आहे, जो सहसा विद्यापीठांद्वारे चालवला जातो. डिग्री कोर्स असल्यामुळे कॉर्पोरेट जगतात याला पारंपारिक आणि मोठी मान्यता मिळते.
पीजीडीएम (PGDM): हा एक ‘डिफरंट डिप्लोमा कोर्स’ आहे, जो बहुतांश वेळा स्वायत्त बी-स्कूल्सद्वारे (उदा. IIMs, XLRI, SP Jain) चालवला जातो. जरी हा डिप्लोमा असला, तरी देशातील टॉप व्यवस्थापन संस्था याच कोर्सेससाठी ओळखल्या जातात. त्यामुळे याची व्यावसायिक किंमत एमबीएएवढीच किंवा काही बाबतींत अधिक असते.
एमबीए: विद्यापीठाशी संलग्न असल्यामुळे एमबीएचा अभ्यासक्रम अधिक सैद्धांतिक आणि पारंपारिक असतो. बऱ्याचदा विद्यापीठांचे सिलिबस जुन्या पद्धतीचे असतात आणि ते बदलण्यासाठी काही वर्षे लागतात.
पीजीडीएम: पीजीडीएमचा अभ्यासक्रम इंडस्ट्रीच्या (उद्योग क्षेत्राच्या) ताज्या गरजांनुसार प्रत्येक वर्षी अपडेट केला जातो. यात पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रॅक्टिकल ज्ञान, इंडस्ट्री प्रोजेक्ट्स आणि मॅनेजमेंट स्किल्स विकसित करण्यावर अधिक भर दिला जातो. उद्योजक बनू इच्छिणाऱ्या किंवा कॉर्पोरेट जगतात झटपट जुळवून घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा उत्तम पर्याय ठरू शकतो.
Army Doctor : भारतीय सैन्यात डॉक्टर कसे बनतात? जाणून घ्या परीक्षा, पात्रता आणि सॅलरी पॅकेज..
दोन्ही कोर्सेससाठी प्रवेशाचे मार्ग जवळपास सारखेच आहेत. CAT, XAT, MAT, ATMA, CMAT, MAH-CET यांसारख्या राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांच्या आधारावरच दोन्ही कोर्सेसमध्ये प्रवेश दिला जातो.
एमबीए: सरकारी किंवा विद्यापीठ-संलग्न महाविद्यालयांतून एमबीए करत असताना, शासनाकडून अनुदान मिळत असल्यामुळे याची फी तुलनेने कमी असते.
पीजीडीएम: स्वायत्त बी-स्कूल्स चालवत असल्यामुळे पीजीडीएमची फी सहसा जास्त असते, कारण विद्यार्थ्यांना संपूर्ण खर्चाचा ताळमेळ स्वतः करावा लागतो. मात्र, काही टॉप एमबीए महाविद्यालयांची फी देखील पीजीडीएमइतकीच किंवा जास्त असू शकते.
थोडक्यात सांगायचे तर जर तुम्हाला पारंपरिक विद्यापीठाची डिग्री आणि बजेटमध्ये शिक्षण हवे असेल, तर एमबीए योग्य ठरते. परंतु, जर तुम्हाला इंडस्ट्री-ओरिएंटेड प्रॅक्टिकल शिक्षण, अद्ययावत सिलिबस आणि टॉप बी-स्कूल्समधून शिकायचे असेल, तर पीजीडीएम हा उत्तम पर्याय ठरू शकतो.