Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Corporate Mitra Launch : छोट्या व्यावसायिकांची बल्ले-बल्ले! केंद्र सरकारकडू खास भेट; MSME क्षेत्राला मिळणार व्यावसायिक मदत

MSME Corporate Mitra Launch : देशातील सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांना MSME बळ देण्यासाठी आणि त्यांचा व्यवसाय अधिक सुलभ करण्यासाठी केंद्र सरकारने 'कॉर्पोरेट मित्र' या एका नव्या आणि महत्त्वपूर्ण उपक्रमाची सुरुवात केली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 06, 2026 | 08:01 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • छोट्या व्यावसायिकांची बल्ले-बल्ले!
  • केंद्र सरकारकडू खास भेट
  • MSME क्षेत्राला मिळणार व्यावसायिक मदत
Corporate Mitra Launch : केंद्र सरकारने छोट्या उद्योगांसाठी खास योजना आणली आहे. सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी MSME अनुपालन प्रक्रिया सुलभ करण्यासाठी एक खास उपक्रम लाँन्च केला आहे. या उपक्रमाचा उद्देश अनुपालन प्रक्रिया सोपी करणे आणि ज्ञान सर्वांसाठी सुलभ करणं हा आहे. त्यामुळे गोष्टींची भीती आणि गोष्टींमधील कमतरता दूर होईल. कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या सहसचिव अनिता शाह अकेला यांनी सांगितले की, अनुपालनाला एक ओझे न मानता, विश्वास, पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि सुव्यवस्थित विकासाचे साधन बनवणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. नेमका काय आहे आहे? ( Corporate Mitra Launch ) 

Social Security Fund : डिलिव्हरी बॉईज, ड्रायव्हर्सना सरकारकडून संरक्षण? PF, विमा अन् Pension चा मिळणार लाभ; काय आहे योजना ?

सरकारकडून बजेटची घोषणा

२०२६-२७ मध्ये ‘कॉर्पोरेट मित्र’ उपक्रमाची घोषणा केली. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (MSMEs) व्यवसाय आणि नियामक अनुपालनामध्ये मदत करू शकतील अशा प्रशिक्षित आणि प्रमाणित अर्ध-व्यावसायिकांचा एक गट तयार करणे, हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. या कार्यक्रमात ICAI, ICSI आणि ICOAI यांच्या व्यावसायिक कौशल्यासोबतच आयआयटी मद्रास, आयआयटी मद्रास प्रवर्तक आणि स्वयं प्लस यांचे तांत्रिक व शैक्षणिक पाठबळही आहे.

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया ICAI, इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया ICSI आणि इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया ICOAI यांनी ‘कॉर्पोरेट मित्र’ कोर्स सुरू केला असून, पहिल्या बॅचसाठी २,८७९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

किफायतशीर व्यावसायिक सहाय्य प्रदान

कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या मते, ‘कॉर्पोरेट मित्र लर्निंग मॅनेजमेंट सिस्टम’ LMS च्या शुभारंभाने या कार्यक्रमाच्या संरचित शिक्षण आणि क्षमता-बांधणी टप्प्याची सुरुवात झाली आहे. या अभ्यासक्रमाचे उद्दिष्ट प्रमाणित अर्ध-व्यावसायिकांचा एक कुशल गट तयार करणे आहे, जे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना MSMEs किफायतशीर व्यावसायिक सहाय्य प्रदान करू शकतील, आणि त्याद्वारे व्यवसाय सुलभता, रोजगार निर्मिती आणि सर्वसमावेशक आर्थिक वाढीस चालना देतील.

हा अभ्यासक्रम १२ महिन्यांचा

‘कॉर्पोरेट मित्र’ अभ्यासक्रमाचा एकूण कालावधी १२ महिन्यांचा असून, तो दोन टप्प्यांमध्ये विभागलेला आहे. पहिल्या सहा महिन्यांमध्ये रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओ लेक्चर्सद्वारे सुमारे १५० तासांचे संरचित शैक्षणिक शिक्षण दिले जाते. यानंतर, ICAI, ICSI आणि ICOAI च्या सदस्यांच्या मालकीच्या व्यावसायिक कंपन्यांमध्ये सहा महिन्यांचे प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण (ऑन-द-जॉब ट्रेनिंग) दिले जाईल, ज्यामुळे विद्यार्थ्यांना व्यावहारिक अनुभव मिळेल.

Old Monk प्रेमींना मोठा धक्का! महाराष्ट्रातील विक्रीवरील Ban कायम; Bombay High Court चा थेट नकार

Web Title: Central govt launches corporate mitra initiative for msme business support marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2026 | 08:01 PM

Topics:  

  • central goverment
  • MSME

संबंधित बातम्या

काय सांगता… Electricity Bill येणार Zero! फक्त ‘हे’ एक काम करा; AC, कूलर, पंखे, मनसोक्त वापरा
1

काय सांगता… Electricity Bill येणार Zero! फक्त ‘हे’ एक काम करा; AC, कूलर, पंखे, मनसोक्त वापरा

Govt New Sugar Rules : साखरेबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय! भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी उचललं पाऊल
2

Govt New Sugar Rules : साखरेबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय! भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी उचललं पाऊल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.