Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Central Government Festive Bonus : कर्मचाऱ्यांना लॉटरी… दिवाळीपूर्वी मिळणार तब्बल 60 दिवसांचा घसघशीत बोनस; कोणाला होणार फायदा?

Central Government Festive Bonus : आगामी सणासुदीच्या काळात केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांनंतर आता केंद्र सरकारच्या इतर महत्त्वाच्या विभागांतील कर्मचाऱ्यांना ६० दिवसांचा 'प्रॉडक्टिव्हिटी लिंक बोनस' मंजूर करण्यात आला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Oct 17, 2026 | 02:21 PM
दिवाळीपूर्वी मिळणार तब्बल 60 दिवसांचा घसघशीत बोनस ( सौजन्य - Chagpt )

दिवाळीपूर्वी मिळणार तब्बल 60 दिवसांचा घसघशीत बोनस ( सौजन्य - Chagpt )

Follow Us
Follow Us:
  • कर्मचाऱ्यांना लागली लॉटरी…
  • दिवाळीपूर्वी मिळणार तब्बल 60 दिवसांचा घसघशीत बोनस
  • पाहा नेमका कोणाला होणार फायदा?
Central Government Festive Bonus : सणासुदीच्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांची बल्ले बल्ले पाहायला मिळत आहेत. कारणही अगदी तसंच आहे. सरकारकडून कर्मचाऱ्यांना चांगला घसघशीत बोनस दिला जात आहे. नुकतंच केंद्र सरकारने भारतीय रेल्वेच्या ११.४ लाख कर्मचाऱ्यांसाठी ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा केली आहे. त्यानंतर आता आणखी एका विभागातील कर्मचाऱ्यांना ही लॉटरी लागणार आहे. कोणत्या कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे सविस्तर जाणून घेऊयात. ( Central Government Festive Bonus )

Sugar Price Festive Season : सरकारचा मोठा निर्णय! सणासुदीच्या काळात साखरेच्या दराचं काय? सामान्यांचं टेन्शन वाढणार?

आताच सरकारने इंडिया पोस्टसाठी ही घोषणा केली आहे. इंडिया पोस्टने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी ६० दिवसांच्या पगाराएवढा बोनस देण्याचे जाहीर केले आहे. इंडिया पोस्टच्या कोणत्या कर्मचाऱ्यांना हा बोनस मिळणार आणि त्याचा लाभ कधी मिळणार सगळं सविस्तर जाणून घेऊयात.

नेमकी काय करण्यात आली घोषणा?

पोस्ट विभागाच्या आदेशानुसार, पात्र नियमित कर्मचाऱ्यांना आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी ६० दिवसांच्या वेतनाइतका उत्पादकता-आधारित बोनस म्हणजेच PLB दिला जाणार आहे. याव्यतिरिक्त, नियमित ग्रामीण डाक सेवकांना GDS एक्स-ग्रेशिया बोनस मिळेल आणि पात्र फुल टाइम कॅज्युअल कर्मचाऱ्यांना एडहॉक बोनस मिळणार आहे. पण बोनसची गणना विहित वेतन श्रेणी, कामाचे दिवस आणि कर्मचाऱ्याच्या प्रवर्गाच्या आधारावर केली जाणार आहे.

इंडिया पोस्ट बोनससाठी कोण पात्र?

आदेशानुसार, हा बोनस तीन प्रवर्गातील कर्मचाऱ्यांना लागू होतो: नियमित कर्मचारी, ग्रामीण डाक सेवक आणि कॅज्युअल कर्मचारी

नियमित कर्मचारी: मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS), गट C आणि नॉन-गजेटेड ग्रुप B

ग्रामीण डाक सेवक: नियमितपणे कार्यरत असलेल्या जीडीएसना एक्स-ग्रेशिया बोनस दिला जाईल.

कॅज्युअल कर्मचारी: पात्र फुल टाइम कॅज्युअल कर्मचारी आणि तात्पुरत्या स्वरूपातील कॅज्युअल कर्मचारी एडहॉक बोनस मिळेल.

बोनसचा फॉर्म्युला काय आहे?

नियमित पोस्ट कर्मचाऱ्यांसाठी बोनसची गणना ६० दिवसांच्या आधारावर केली जाईल. सरासरी मासिक पगाराला बोनस दिवसांच्या संख्येने गुणून ३०.४ ने भागले जाईल. पण, बोनसची गणना करण्यासाठी कमाल मासिक पगार ₹७,००० निश्चित करण्यात आला आहे. याचा अर्थ असा की, जरी कर्मचाऱ्याचा पात्र मासिक पगार ₹७,००० पेक्षा जास्त असला तरी, बोनसची गणना केवळ ₹७,००० पर्यंतच केली जाईल. हाच नियम ग्रामीण डाक सेवकांनाही लागू होईल.

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठीही मोठी घोषणा

सरकारने ११.४ लाख रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी ७८ दिवसांच्या उत्पादकतेवर आधारित बोनसची घोषणा केली आहे. यासाठी २,००९.६१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याला ७८ दिवसांसाठी कमाल १७,९५१ रुपये बोनस दिला जाईल. रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये ट्रॅक मेंटेनर्स, लोको पायलट्स, ट्रेन मॅनेजर्स, स्टेशन मास्टर्स, सुपरवायझर्स, टेक्निशियन्स, टेक्निशियन हेल्पर्स, पॉइंट्समन, मंत्रालयीन कर्मचारी आणि इतर गट ‘क’ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. हा बोनस वार्षिक दिला जातो.

US Russia Oil Tariff Decision : हुश्श…! 100% टॅरिफला ब्रेक, अमेरिकेचा मोठा युटर्न! भारत-चीनवरील कारवाई तात्पुरती स्थगित

Web Title: 60 days bonus announced for central government employees after railways marathi ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2026 | 02:21 PM

Topics:  

  • central goverment
  • Indian Railway
  • post office

संबंधित बातम्या

Railway Recruitment 2026: रेल्वेत नोकरीची मोठी संधी! ‘इतक्या’ पदांसाठी मेगा भरती; असा कराल अर्ज
1

Railway Recruitment 2026: रेल्वेत नोकरीची मोठी संधी! ‘इतक्या’ पदांसाठी मेगा भरती; असा कराल अर्ज

Mumbai News: काश्मिरी सफरचंद आता अवघ्या ३० तासांत मुंबईत! वाहतूक खर्चात ६०% कपात, रस्ते मार्गाऐवजी रेल्वे स्वस्त
2

Mumbai News: काश्मिरी सफरचंद आता अवघ्या ३० तासांत मुंबईत! वाहतूक खर्चात ६०% कपात, रस्ते मार्गाऐवजी रेल्वे स्वस्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.