Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नोकरी टिकवण्याचं मोठं आव्हान! Tech कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना मोठा दणका, आकडा भयंकर; कपात शर्यतीत भारत दुसऱ्या क्रमांकावर

AI मुळे जगभरातील टेक आणि कॉर्पोरेट क्षेत्रात मोठे फेरबदल होत आहेत. याचा सर्वाधिक फटका नोकऱ्यांवर बसत आहे. गेल्या अवघ्या ६ महिन्यांत जगभरात १.२८ लाखांहून अधिक नोकऱ्या गेल्या असून, कर्मचारी कपात करण्यात आली आहे. कर्मचारी कपातीमध्ये भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 05, 2026 | 04:40 PM
(फोटो सौजन्य: chatgpt)

(फोटो सौजन्य: chatgpt)

Follow Us
Follow Us:
  • नोकरी टिकवण्याचं मोठं आव्हान!
  • Tech कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना मोठा दणका,
  • आकडा भयंकर; कपात शर्यतीत भारत दुसऱ्या क्रमांकावर
AI तंत्रज्ञान सगळ्याच क्षेत्रात मोठा बदल घडवत आहे. त्याच्यापासून उद्योग क्षेत्रही काही वाचलं नाही. AI ने उद्योगात वेगाने बदल घडवले आहे आणि त्याच्या वेग बराच वाढला आहे. यासगळ्याचा परिणाम मात्र नोकऱ्यांवर मोठा झाला आहे. जगभरातील कंपन्या उत्पादकता वाढवण्यासाठी आणि खर्च कमी करण्यासाठी AI चा आक्रमकपणे वापर करत आहेत. यामुळेच AI नोकऱ्यांसाठी एक धोका बनला आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील नोकऱ्यांचा अभ्यास करणारी Layoffs.fyi या प्लॅटफॉर्मवरील नवीन आकडेवारी समोर आली आहे. नोकरीच्या बाजारपेठेत AI मुळे निर्माण झालेला व्यत्यय यात थेट आणि उघडपणे दिसत आहेत.सध्याची परिस्थिती आता इथपर्यंत पोहोचली आहे की २०२६ च्या पहिल्या सहा महिन्यांतच, २०२५ या संपूर्ण वर्षापेक्षा जास्त कर्मचारी कपात झाली आहे. हा आकडा बराच धक्कादायक आहे. त्यामुळे पुढे काय होणार याची भिती कर्मचारी वर्गाला लागून राहिली आहे.

आता गावागावांत नवे उद्योजक घडणार, MACCIA चा ऐतिहासिक निर्णय! काय आहे हब-अँड-स्पोक मॉडेल?

१ जुलै २०२६ पर्यंत, AI मुळे नोकरी गमावणाऱ्या जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची संख्या १,२८,००० पेक्षा जास्त झालेली असेल. संपूर्ण वर्ष २०२५ मध्ये एकूण १,२५,००० आयटी व्यावसायिकांना कामावरून कमी करण्यात आले. ज्या वेगाने कंपन्या ऑटोमेशन आणि नवीन AI साधने स्वीकारत आहेत, त्यावरून हे स्पष्टपणे दिसून येते की हा ट्रेंड थांबणार नाही. पुढा हा धोका आणखीनच वाढण्याची शक्यता आहे.

कपातीमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर

संपूर्ण जगाच्या आकडेवारीचा विचार करता भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जानेवारी 2020 पासून जुलै 2026 पर्यंत्या आकडेवारीचा विचार केला असता AI वर आधारित टेक-ले ऑफमध्ये अमेरिका जास्त प्रभावित आहे. आतापर्यंत ज्या कर्मचाऱ्यांना हातात नारळ दिला आहे त्यात अमेरिकेचे कर्मचारी 71.33 % इतके आहेत. भारतात नोकरी गमावणारे कर्मचारी 7.16 टक्के इतके आहेत. भारतानंतर जर्मनीचा नंबर लागतो. ज्याचा 3.43 % इतका रेट आहे आणि त्यानंतर ब्रिटनचा नंबर लागतो ज्याचा रेट 2.64% इतका आहे.

एज्युकेशन, फायनान्स सेक्टरमध्ये जास्त प्रभाव

भारतातील AI चा प्रभाव सर्व क्षेत्रांमध्ये एकसारखा राहिलेला नाही. या तंत्रज्ञानाचा काही विशिष्ट क्षेत्रांतील मनुष्यबळावर सर्वाधिक परिणाम झाला आहे. AI मुळे ज्या क्षेत्रांमध्ये सर्वाधिक नोकऱ्या गेल्या आहेत, त्यांमध्ये खालील क्षेत्रांचा समावेश आहे:

एजुकेशन सेक्टर : या क्षेत्राला सर्वाधिक फटका बसला असून, एकूण नोकऱ्यांच्या नुकसानीपैकी २१.६७% नुकसान या क्षेत्रात झाले आहे.
फाइनेंस सेक्टर: बँकिंग आणि वित्तीय सेवा क्षेत्रात १४.७३% नोकऱ्या होत्या.
फूड इंडस्ट्री: फूड टेक आणि डिलिव्हरी क्षेत्रात १२.२६% नोकऱ्या गेल्या.
ट्रांसपोर्ट आणि कंज्यूमर बिजनेस: या दोन क्षेत्रांमधील सुमारे ११% कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले.

२०२० पासून नोकरकपात

इतिहासाप्रमाणेच, AI मुळे निर्माण झालेले नोकरीचे संकट दरवर्षी अधिकच गडद होत आहे. २०२० मध्ये, अंदाजे ८१,००० कर्मचाऱ्यांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या, हा आकडा २०२२ मध्ये वाढून १,६५,००० झाला. २०२३ मध्ये, नोकरकपातीने २,६६,००० चा आतापर्यंतचा उच्चांक गाठला. २०२४ आणि २०२५ मध्ये काहीसा दिलासा मिळाला असला तरी, २०२६ च्या पहिल्या सहा महिन्यांतच मागील वर्षाचा विक्रम मोडला गेला आहे.

Adani Group चा मोठा निर्णय! कोलकात्यात 2,000 बेडचं सुपर हॉस्पिटल; 1,000 बेड गरीब रुग्णांसाठी राहणार कायम राखीव

Web Title: Challenge to job security ai impact on jobs layoffs india ranks second marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2026 | 04:40 PM

Topics:  

  • ai
  • Artificial intelligence
  • Business News
  • layoffs
  • Marathi News

संबंधित बातम्या

Raigad News: उरणमध्ये पाणीटंचाईचे संकट? रानसई धरणाचा पाणीसाठा घटला; नोव्हेंबरपासून कपातीची शक्यता
1

Raigad News: उरणमध्ये पाणीटंचाईचे संकट? रानसई धरणाचा पाणीसाठा घटला; नोव्हेंबरपासून कपातीची शक्यता

Sangli News: “दुष्काळ जाहीर झाला पण शेतमजुरांचे काय?”, राष्ट्रीय कृषी कामगार महासंघाचा सवाल
2

Sangli News: “दुष्काळ जाहीर झाला पण शेतमजुरांचे काय?”, राष्ट्रीय कृषी कामगार महासंघाचा सवाल

Pune: प्रकाश आंबेडकरांचा भाजप-RSS वर हल्लाबोल! तरुणांना केलं रस्त्यावर उतरण्याचं आवाहन!
3

Pune: प्रकाश आंबेडकरांचा भाजप-RSS वर हल्लाबोल! तरुणांना केलं रस्त्यावर उतरण्याचं आवाहन!

Madhuri Dixit: फास्टेस्ट फिंगर फर्स्टचा निकाल लागताच स्टेजवर धुमाकूळ! माधुरींच्या चाहत्याने केला भन्नाट डान्स
4

Madhuri Dixit: फास्टेस्ट फिंगर फर्स्टचा निकाल लागताच स्टेजवर धुमाकूळ! माधुरींच्या चाहत्याने केला भन्नाट डान्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.