Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 25 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता कागदपत्रांशिवाय उघडणार खातं? 1 ऑगस्टपासून बदलणार KYC चा नियम! येतोय CKYC 2.0, काय आहे प्रकार?

1 ऑगस्टपासून देशात KYC च्या नियमांमध्ये मोठा बदल होणार असून CKYC 2.0 यंत्रणा लागू केली जात आहे. या नवीन प्रणालीमुळे ग्राहकांना नवीन बँक खाते, म्युच्युअल फंड किंवा विमा पॉलिसी घेण्यासाठी वारंवार कागदपत्रे सादर करण्याची गरज भासणार नाही.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 25, 2026 | 07:01 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • आता कागदपत्रांशिवाय उघडणार खाती?
  • 1 ऑगस्टपासून बदलणार KYC चा नियम!
  • येतोय CKYC 2.0, काय आहे प्रकार?
KYC बाबत महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. भारतीय बँका आणि विमा कंपन्या ऑगस्टमध्ये एक कॉमन कस्टमर आयडेंटीफिकेशन सिस्टिम सुरु करणार आहेत. ज्यात नंतर मालमत्ता व्यवस्थापकांचाही समावेश केला जाणार आहे. यामुळे ग्राहकांना आपली वेगवेगळी बरीच ओळखपत्र सादर करण्याची गरज भासणार नाही त्याशिवाय फायनानशियल प्रोडक्ट्सचा फायदा मिळू शकतो. नेमका काय आहे हा प्रकार समजून घेऊयात.

Ambuja Cement: नोकरी सोडली अन् सुरू केला स्वतःचा व्यवसाय! अंबुजा सिमेंटच्या साथीने पालघरच्या कंत्राटदाराची भरारी

CKYC म्हणजे काय?

न्यूज एजन्सी रॉयटर्स यांच्या सूत्रांच्या हवाल्याने हे सांगण्यात आलं आहे. या नवीन प्रणालीला ‘सेंट्रल नो-युवर-कस्टमर २.०’ म्हणजेच CKYC म्हटलं गेलं आहे. या प्रणालीअंतर्गत, खाते उघडताना किंवा ग्राहकांची माहिती अद्ययावत करताना, केंद्रीय नोंदणीमध्ये संग्रहित केलेला डेटा मिळवण्यासाठी या संस्थांना केवळ त्यांच्या संमतीची आवश्यकता असणार आहे.

भारत गेल्या दशकापासून सिंगापूर आणि अनेक युरोपीय देशांसारखी प्रणाली उभारण्याचा प्रयत्नात आहे. ज्यामध्ये डिजिटल ओळख प्रणाली ग्राहकांना एका समान पडताळणी प्रक्रियेद्वारे विविध आर्थिक उत्पादनांचा लाभ घेण्याची परवानगी देत असेल.

फसवणूक रोखण्यासाठी मदत मिळेल

नियामक सूत्रांनी सांगितले की, यामुळे सुलभ देखरेखीद्वारे फसवणूक रोखण्यासही मदत होईल. त्यांनी सांगितले की, म्युच्युअल फंड आणि ब्रोकरेज कंपन्यांसह भांडवली बाजारातील कंपन्याही या वर्षाच्या अखेरपर्यंत या प्रणालीचा वापर करतील अशी अपेक्षा आहे, कारण रेग्युलेटर सेक्टर विशिष्ट आवश्यकतांवर काम करत आहेत.
या प्रकल्पावर एकत्रितपणे काम करणाऱ्या भारतीय रिझर्व्ह बँक, भारतीय प्रतिभूति आणि विनिमय मंडळ म्हणजेच सेवी आणि विमा नियामक यांनी रॉयटर्सच्या ईमेलला तात्काळ प्रतिसाद दिला नाही. मूलभूत आर्थिक समावेश साध्य केल्यानंतर, भारत आर्थिक उत्पादनांमध्ये लोकांचा सहभाग वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवत असतानाच हे पाऊल उचलण्यात आले आहे.
जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार, २०२४ मध्ये सुमारे ८९% प्रौढांची बँक खाती होती, परंतु नियामक आकडेवारी दर्शवते की म्युच्युअल फंड, विमा आणि पेन्शनचा वाटा तुलनेने कमी राहिला आहे.

नेमका बदल काय होणार?

खरंतर भारतात अगोदरपासूनच एक सेंट्रल रजिस्ट्री आहे. ज्यामध्ये जवळजवळ 1.2 अरब ग्राहकांचे रेकॉर्ड आहेत. मात्र डेटाच्या क्लालिटीनुसार जसं की डुप्लीकेशन आणि अर्धवट माहितीसारख्या कारणांमुळे याला मोठा प्रमाणात वापरण्यात आलं नाही. RBI कडून रजिस्ट्रीतून घेतलेल्या रेकॉर्ड्सचा स्विकार केला नसल्यामुळे गुंतवणूकांना वेगळ्या फायनानशियल प्रोडक्ट्सचा लाभ घेण्यासाठी पुन्हा पुन्हा डॉक्युमेंट्स जमा करावे लागत होते. नव्या सिस्टीममध्ये रेकॉर्ड डेटाच्या अचूकतेवर कॉन्फिडेंस स्कोर असेल आणि हे देखील सांगण्यात येईल की कोणत्या फॉर्मने ही माहिती वेरिफाय केली आहे.

भारतातील सर्वात मोठी मालमत्ता व्यवस्थापन कंपनी असलेल्या SBI Funds Management संयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डी. पी. सिंग म्हणाले की, CKYC मुळे या उद्योगाचा गुंतवणूकदार वर्ग लक्षणीयरीत्या वाढू शकतो. “युनिव्हर्सल कस्टमर आयडेंटिफिकेशननंतर पात्र ग्राहकांपैकी अगदी थोड्या प्रमाणात जरी गुंतवणूक करण्यास सुरुवात केली, तरी त्याचा खूप मोठा फायदा होईल,” असे सिंग म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की, ही प्रणाली चार महिन्यांच्या आत संपूर्ण उद्योगात लागू केली जाऊ शकते.उदाहरणार्थ, स्टेट बँक ऑफ इंडिया, जी त्या फंड हाऊसची सर्वात मोठी भागधारक आणि मालमत्तेनुसार देशातील सर्वात मोठी बँक आहे, तिची ५० कोटी बँक खाती आहेत.

EPF Interest Rate: अजूनपर्यंत तुमच्या खात्यात PF व्याजाचे पैसे नाही आलेत? लगेच करा तक्रार; जाणून घ्या प्रोसेस

Web Title: Ckyc 2 0 rules change from 1 august open bank account without documents

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2026 | 07:01 PM

Topics:  

  • Bank
  • Business News
  • e-KYC
  • KYC
  • KYC News
  • Marathi News
  • SBI

संबंधित बातम्या

Dharmendra Pradhan तब्बल किती कोटींचे मालक? राजीनाम्यानंतर आता Networth चर्चेत, जाणून घ्या बँकांमध्ये किती शिल्लक?
1

Dharmendra Pradhan तब्बल किती कोटींचे मालक? राजीनाम्यानंतर आता Networth चर्चेत, जाणून घ्या बँकांमध्ये किती शिल्लक?

EPF Interest Rate: अजूनपर्यंत तुमच्या खात्यात PF व्याजाचे पैसे नाही आलेत? लगेच करा तक्रार; जाणून घ्या प्रोसेस
2

EPF Interest Rate: अजूनपर्यंत तुमच्या खात्यात PF व्याजाचे पैसे नाही आलेत? लगेच करा तक्रार; जाणून घ्या प्रोसेस

Ambuja Cement: नोकरी सोडली अन् सुरू केला स्वतःचा व्यवसाय! अंबुजा सिमेंटच्या साथीने पालघरच्या कंत्राटदाराची भरारी
3

Ambuja Cement: नोकरी सोडली अन् सुरू केला स्वतःचा व्यवसाय! अंबुजा सिमेंटच्या साथीने पालघरच्या कंत्राटदाराची भरारी

BOI Financial Results: बँक ऑफ इंडियाचा धमाका! Q1 मध्ये दमदार कामगिरी, पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 36% वाढून 3068 कोटींवर
4

BOI Financial Results: बँक ऑफ इंडियाचा धमाका! Q1 मध्ये दमदार कामगिरी, पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 36% वाढून 3068 कोटींवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.