(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
तक्रार करण्यापूर्वी, तुम्ही तुमचे EPF पासबुक नक्की तपासून घ्या. कारण व्याजाची रक्कम जमा झाली आहे. असे होऊ शकते की काही सदस्यांना हा मॅसेज आलेला नसेल.त्यामुळे तुम्ही तुमचे EPF पासबुक तपासलेच पाहिजे. चला जाणून घेऊया की तुम्ही तुमचे EPF पासबुक कसे तपासू शकता आणि व्याजाची रक्कम जमा झाली नसल्यास तुम्ही तक्रार कशी दाखल करू शकता.
तुम्ही तुमचे EPF पासबुक तीन प्रकारे तपासू शकता: SMS, कॉल आणि EPFO पोर्टल किंवा UMAN APP द्वारे.जर तुम्ही UAN साइटवर नोंदणीकृत असाल, तर तुम्ही तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून 011-22901406 या क्रमांकावर मिस कॉल देऊन माहिती मिळवू शकता. तुमच्या बँक खात्याचा तपशील, आधार आणि पॅन कार्ड तुमच्या UAN शी जोडलेले असल्याची खात्री करा. तुम्ही तुमच्या employer देखील ते तुमच्यासाठी जोडण्याची विनंती करू शकता. या सेवेसाठी कोणत्याही प्रकारची फी आकरली जात नाही.
तुम्ही 7738299899 या क्रमांकावर SMS पाठवून तुमची PF शिल्लक रक्कम देखील मिळवू शकता. तुम्हाला हा संदेश पाठवावा लागेल: EPFOHO UAN ENG. तुमच्या पसंतीच्या भाषेची पहिली तीन अक्षरे ‘ENG’ आहेत. त्यामुळे, मराठीत संदेश मिळवण्यासाठी, EPFOHO UAN MAR असे टाईप करा.
तसेच, तुम्ही थेट EPFO पोर्टलवर जाऊन, ‘मेंबर पासबुक’ पर्यायावर क्लिक करून लॉग इन करू शकता. तुमचे PF पासबुक दिसेल. तुम्ही UMANG ॲपद्वारे देखील तुमचे PF पासबुक पाहू शकता.
तुमच्या पासबुकमध्ये तुमची PF जमा झाला नसेल, तर तुम्ही तक्रार करू शकता. तुम्ही दोन प्रकारे तक्रार दाखल करू शकता: हेल्पलाइन क्रमांकाद्वारे आणि ईपीएफओ पोर्टलला भेट देऊन.
तुम्ही EPFO च्या हेल्पलाइन क्रमांक 14470 किंवा 1800-118-005 वर संपर्क साधून तुमची तक्रार नोंदवू शकता. याव्यतिरिक्त, तुम्ही EPFO पोर्टलद्वारे तक्रार दाखल करू शकता.
सर्वप्रथम, EPFO च्या अधिकृत तक्रार पोर्टल, epfigms.gov.in वर जा.
त्यानंतर तक्रारी नोंदवा हा पर्याय निवडा.
तक्रारी या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला आणखी एका पर्यायासह तीन पर्याय दिसतील.
इतर या पर्यायावर क्लिक करा.
इतर या पर्यायावर क्लिक केल्यावर एक फॉर्म समोर येईल. तुम्ही हा फॉर्म भरून तुमची तक्रार नोंदवू शकता.






