
क्लीनमॅक्सचा नफा ४.४ पटीने वाढला! (Photo Credit- X)
कंपनीचा EBITDA देखील 28 टक्क्यांनी वाढून 1,295 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीने 31 मार्च 2026 अखेरपर्यंत 5.7 GW क्षमतेचा करारित नवीकरणीय ऊर्जा वीजविक्री पोर्टफोलिओ उभारला असून आर्थिक वर्षात सुमारे 1.4 GW क्षमता कार्यान्वित केली आहे.
डेटा सेंटर आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्र कंपनीसाठी मोठा वाढीचा स्रोत ठरत असून या विभागाचा कंपनीच्या एकूण करारित पोर्टफोलिओमध्ये 42 टक्के वाटा आहे. राजस्थानातील बिकानेर येथे कंपनीने 525 MWp क्षमतेचा CTU-connected प्रकल्प सुरू केला आहे.
कंपनीने Apple सोबत 150 MW नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पासाठी सुमारे 104 कोटी रुपयांची धोरणात्मक भागीदारी केली आहे. तसेच STT Global Data Centers, Iron Mountain Data Centers आणि Princeton Digital Group यांसारख्या आघाडीच्या डेटा सेंटर कंपन्यांबरोबरही दीर्घकालीन करार केले आहेत. कंपनीने FY2026-27 मध्ये 1.5 GW पेक्षा अधिक क्षमतेचे प्रकल्प कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.