(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Mirae Asset Mutual Fund announces : मिरे अॅसेट म्युच्युअल फंड प्रस्तुत प्लॅटिनम एसआयएफने आज आपल्या प्लॅटिनम हायब्रिड लाँग-शॉर्ट फंडच्या लाँचची घोषणा केली. या फंडाची न्यू फंड ऑफर २० मे २०२६ ते ३ जून २०२६ या कालावधीत सबस्क्रिप्शनसाठी खुली असेल.एसआयएफ हा एक नवीन मालमत्ता वर्ग आहे, जो म्युच्युअल फंड आणि अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड यांच्या दरम्यान स्थित आहे. एसआयएफद्वारे ऑफर केलेल्या सर्व गुंतवणूक धोरणांमध्ये परमनण्ट अकाऊंट नंबर (‘पॅन’) स्तरावर किमान गुंतवणुकीची रक्कम १० लाख रुपये आहे.
“एसआयएफ गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंडाची सुरक्षितता आणि पारदर्शकतेसोबत विशेष धोरणांचा लाभ मिळवून देते,” असे मिरे अॅसेट इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडचे सीआयओ नीलेश सुराना म्हणाले. “हा फंड डेब्ट, इक्विटी आणि डेरिव्हेटिव्ह साधनांचे धोरण आणि वाटपामध्ये अधिक स्थिरता प्रदान करण्याचा प्रयत्न करेल.”
जोखीम-समायोजित परतावा देण्यासाठी हा फंड डिझाइन करण्यात आला आहे. या फंडचे बाजारपेठेतील सर्व टप्प्यांमध्ये परतावा मिळवून देण्याचे उद्दिष्ट आहे. हा फंड डेब्ट आणि आर्बिट्राजच्या माध्यमातून स्थिरता, तर कॉलर स्ट्रॅटेजी आणि स्पेशल सिच्युएशन्सच्या माध्यमातून अधिक परतावा मिळवण्याचा प्रयत्न करेल. हा फंड बाजारपेठेतील सर्व टप्प्यांदरम्यान जोखीम-समायोजित परतावा देण्यासाठी सज्ज आहे.
प्लॅटिनम हायब्रिड लाँग-शॉर्ट फंडाचे व्यवस्थापन इक्विटी इन्व्हेस्टमेंट्सचे एसव्हीपी गौरीक शाह यांच्याद्वारे केले जाईल. त्यांना सार्वजनिक बाजारपेठ आणि पर्यायी धोरणांमधील जवळपास दोन दशकांचा अनुभव आहे. ते क्वांटिटेटिव्ह इन्व्हेस्टिंग, मार्केट न्यूट्रल फ्रेमवर्क्स आणि ‘डरिव्हेटिव्ह-चालित पोर्टफोलिओ डिझाइनमध्ये तज्ज्ञ आहेत.
“प्लॅटिनम हायब्रिड लाँग-शॉर्ट फंडमध्ये ५-७० टक्यांदरम्यान नियंत्रित इक्विटी एक्स्पोजर असेल, ज्यामध्ये कॉलर स्ट्रॅटेजी आणि स्पेशल सिच्युएशन्सचा समावेश आहे. तसेच ५-७० टक्क्यांच्या श्रेणीत आर्बिट्राजद्वारे पूर्णपणे हेज्ड एक्स्पोजर आणि २५-३५ टक्क्यांच्या श्रेणीत उच्च-गुणवत्तेचे अॅक्रुअल डेब्ट एक्स्पोजर असेल,” असे मिरे अॅसेटचे इक्विटी इन्व्हेस्टमेंट्सचे एसव्हीपी गौरीक शाह म्हणाले. “ही त्रिस्तरीय रचना चपळता प्रदान करण्यासह अनहेज्ड डायरेक्शनल इक्विटी एक्स्पोजर असलेल्या हायब्रिड फंडांच्या तुलनेत कमी घसरणीची खात्री देते. ”
हा फंड पुराणमतवादी गुंतवणूकदारांसाठी योग्य आहे, जे १ ते २ वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी बाजारपेठेत गुंतवणूक करत आहेत आणि बाजाराच्या सर्व टप्प्यांत तुलनेने स्थिर परतावा शोधत आहेत. तसेच, ज्यांना डायरेक्शनल इक्विटी एक्स्पोजर असलेल्या हायब्रिड फंडांच्या तुलनेत घसरणीपासून अधिक संरक्षण पाहिजे त्यांच्यासाठीही हा फंड उपयुक्त आहे.
“प्लॅटिनम एसआयएफ रिटेल गुंतवणूकदार आणि हाय-नेटवर्थ गुंतवणूकदार यांच्यातील दरी भरून काढण्याच्या उद्देशाने लाँच केले जात आहे. पहिला फंड प्लॅटिनम हायब्रिड लाँग-शॉर्ट फंड कर-कार्यक्षम पद्धतीने निश्चित उत्पन्न स्वरूपाचा परतावा मिळवून देण्यासाठी डिझाइन केला आहे. सेबीचे नियम एसआयएफला डेरिव्हेटिव्ह्जचा स्मार्ट पद्धतीने वापर करण्याची परवानगी देतात, ज्यामुळे फंड हाउसेसना जोखीम अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करण्यात आणि नाविन्यपूर्ण उत्पादने ऑफर करण्यात मदत होते,” असे मिरे अॅसेट इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडचे प्रॉडक्ट्स, बिझनेस स्ट्रॅटेजी आणि इंटरनॅशनल बिझनेस हेड वैभव शाह म्हणाले.






