Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुरंदर, बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा; नीरा–कऱ्हा नदीजोड प्रकल्पाला अर्थसंकल्पात मंजुरी

नीरा–कऱ्हा नदीजोड प्रकल्पाला राज्याच्या अर्थसंकल्पात मंजुरी मिळाल्यामुळे नीरा खोऱ्यातून पावसाळ्यात वाहून जाणारे अतिरिक्त पाणी भविष्यात पुरंदर आणि बारामती तालुक्यातील शेतीसाठी उपलब्ध होणार आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 07, 2026 | 05:04 PM
पुरंदर, बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा; नीरा–कऱ्हा नदीजोड प्रकल्पाला अर्थसंकल्पात मंजुरी

पुरंदर, बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा; नीरा–कऱ्हा नदीजोड प्रकल्पाला अर्थसंकल्पात मंजुरी

Follow Us
Follow Us:
  • पुरंदर, बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा
  • नीरा–कऱ्हा नदीजोड प्रकल्पाला अर्थसंकल्पात मंजुरी
  • पुरंदर-हवेलीचे आमदार विजय शिवतारे यांनी दिली माहिती
पुणे : नीरा–कऱ्हा नदीजोड प्रकल्पाला राज्याच्या अर्थसंकल्पात मंजुरी मिळाल्यामुळे नीरा खोऱ्यातून पावसाळ्यात वाहून जाणारे अतिरिक्त पाणी भविष्यात पुरंदर आणि बारामती तालुक्यातील शेतीसाठी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याची माहिती पुरंदर-हवेलीचे आमदार विजय शिवतारे यांनी दिली.

 

या प्रकल्पासाठी आमदार शिवतारे यांनी यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सासवड येथील पालखीतळ मैदानावर झालेल्या कार्यक्रमात जाहीर सभेत तसेच लेखी स्वरूपात मागणी केली होती. सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाल्याचे त्यांनी सांगितले. पुरंदर तालुक्यातील वीर धरणातून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी नीरा नदीमार्गे पुढे वाहून जाते. या पाण्याचे योग्य नियोजन करून ते कऱ्हा नदीच्या परिसरात वळविण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. हा प्रकल्प प्रत्यक्षात आल्यास पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील राजुरी, रिसे, पिसे, नायगाव, पांडेश्वर, रोमनवाडी यांसारख्या दुष्काळी गावांसह बारामती तालुक्यातील जिरायत पट्ट्यातील अनेक गावांच्या सिंचनाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटण्याची शक्यता आहे.

पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार

आमदार शिवतारे म्हणाले की, कऱ्हा नदी ही हंगामी स्वरूपाची असून ती केवळ तीन ते चार महिनेच प्रवाहित राहते. त्यामुळे उर्वरित काळात परिसरातील गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. नीरा–कऱ्हा नदीजोड प्रकल्प राबविल्यास सिंचनाबरोबरच या भागातील पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागू शकतो.

हे सुद्धा वाचा : बारामतीत लॉजवर सुरू होता भलताच प्रकार; पोलिसांनी छापा टाकला अन्…

मल्टीस्पेशालिटी शासकीय हॉस्पिटलची उभारणी करावी – शिवतारे

सासवड ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर करण्यास मान्यता मिळूनही अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. मतदारसंघात ट्रॉमा सेंटर उभारणी संदर्भात तातडीने निर्णय व्हावा, फुरसुंगी येथे १०० खाटांचे महिलांसाठी स्वतंत्र रुग्णालय उभारण्याबाबत बैठकीत चर्चा झाली असून, यावर सकारात्मक निर्णय व्हावा, तसेच पुणे शहर झपाट्याने विस्तारत असून आपल्या मतदारसंघालगत लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे ससूनच्या धर्तीवर पुरंदर येथे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी कार्यवाहीचा उल्लेख केला होता; मात्र अद्याप ठोस प्रगती झालेली नाही. तरी याबाबत शासनाने तातडीने निर्णय घ्यावेत, अशी मागणी पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांनी अधिवेशनात केली आहे.

Web Title: Farmers have received relief as the neera karha river linking project has been approved in the budget

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 05:04 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Neera News
  • vijay shivtare

संबंधित बातम्या

मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी मोठी अपडेट; उप अग्निशमन अधिकारी चिपाडेंवर निलंबनाची टांगती तलवार
1

मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी मोठी अपडेट; उप अग्निशमन अधिकारी चिपाडेंवर निलंबनाची टांगती तलवार

घाटी परिसरातून महिलेचे अपहरण; पत्र्याच्या शेडमध्ये नेऊन सलग दोन दिवस अत्याचार
2

घाटी परिसरातून महिलेचे अपहरण; पत्र्याच्या शेडमध्ये नेऊन सलग दोन दिवस अत्याचार

भीमाशंकर मार्ग पहिल्याच पावसात उखडला, साडेतीन कोटी रुपये खर्चुनही रस्त्याची दुरवस्था; अधिकाऱ्यांवर आरोप
3

भीमाशंकर मार्ग पहिल्याच पावसात उखडला, साडेतीन कोटी रुपये खर्चुनही रस्त्याची दुरवस्था; अधिकाऱ्यांवर आरोप

मुलींवर अत्याचार व लाठीचार्ज करण्यापर्यंत पोलीसांची मजल, देवाभाऊ म्हणवून घेणाऱ्याची कृती मात्र…; सपकाळांचा हल्लाबोल
4

मुलींवर अत्याचार व लाठीचार्ज करण्यापर्यंत पोलीसांची मजल, देवाभाऊ म्हणवून घेणाऱ्याची कृती मात्र…; सपकाळांचा हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.