Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Petrol-Diesel चे दर वाढणार? कच्च्या तेलाचे किमती कडाडले, सरकारकडून कर वाढ

Petrol Diesel Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि दुसऱ्या बाजूला सरकारने इंधनावरील करात केलेली वाढ यामुळे वाहनधारकांनाही आता मोठा झटका बसतो का असा प्रश्न उभा राहिला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 02, 2026 | 02:10 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • कच्च्या तेलाचा भडका
  • पेट्रोल-डिझेलवर सरकारकडून कर वाढ
  • खिशावर किती पडणार भार?
Petrol Diesel Rate : इराण आणि अमेरिकेतील वाढत्या युद्धाचा थेट परिणाम आता जागतिक स्तरावर दिसून येत आहे. त्यातील महत्त्वाचा घटक म्हणजे इंधन बाजार आणि अर्थव्यवस्थेला जाणवत आहे. आखाती देशांमधील वाढता तणाव आणि पुरवठा साखळीत येत असलेला व्यत्यय पाहता आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका उडाला आहे. ब्रेंट क्रूडने पुन्हा एकदा प्रति बॅरल १०० डॉलरचा धोकादायक स्तर गाठला आहे. एका बाजूला कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडल्या असताना दुसऱ्या बाजूला सरकारने इंधावरील टॅक्समध्ये वाढ केली आहे. भारत सरकारने पेट्रोलियम कंपन्यांवरील आपली पकड घट्ट केली आहे त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या निर्यातीवरील ‘विंडफॉल टॅक्स’ वाढवला आहे. नेमका या टॅक्स काय आहे? या दरवाढीमुळे वाहनधारकांना फटका बसणार का? ( Petrol Diesel Rate )

August GST Collection : GDP च्या मजबूत आकडेवारीनंतर GST कलेक्शनमध्येही मोठी झेप! ऑगस्टमध्ये जमा झाले लाखो कोटी

पेट्रोल – डिझेलवरील विंडफॉल टॅक्समध्ये वाढ

तेल कंपन्यांनी वाढत्या आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमतींचा गैरफायदा घेऊन अनावश्यक नफा कमवू नये आणि देशांतर्गत बाजारात तेलाचा पुरेसा पुरवठा होत राहावा यासाठी सरकराने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे सरकारने १ सप्टेंबर २०२६ पासून विंडफॉल टॅक्समध्ये म्हणजेच Special Additional Excise Duty – SAED यात महत्त्वपूर्ण बदल केले आहेत.

किती केली वाढ?

सरकारने पेट्रोलवरील निर्यात कर ₹0 वरून ₹1.50 प्रति लिटरपर्यंत वाढवला आहे. डिझेलवरील निर्यात शुल्क ₹1 ने वाढवून ₹24 वरून ₹25 प्रति लिटर करण्यात आले आहे. एव्हिएशन टर्बाइन फ्युएल ATF वरील निर्यात कर 50 पैशांनी कमी करून ₹19.50 वरून ₹19 प्रति लिटर करण्यात आला आहे.
सर्वसामान्यांसाठी एक दिलासादायक बाब म्हणजे विंडफॉल टॅक्सचा परिणाम थेट वाहनधारकांवर होणार नाही याचा प्रभाव फक्त कॉर्पोरेट निर्यातीवर होतो. देशांतर्गत पेट्रोल पंपांवरील पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमती अपरिवर्तित राहिल्या आहेत.

कच्च्या तेलाच्या किमती का वाढताहेत?

कच्च्या तेलाच्या किमतींमधील या नाट्यमय वाढीमागे सर्वात मोठे कारण म्हणजे मध्य-पूर्वेतील गंभीर संकट. या तीव्र संघर्षामुळे जगातील सर्वात महत्त्वाचा तेल व्यापार मार्ग असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी जहाजवाहतूकीवर झालेला परिणाम आहे. सध्या तिथले परिस्थिती अत्यंत बिकट आहे वाहतूक पूर्णपणे थांबली आहे. इराक, कुवेत आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) यांसारख्या प्रमुख तेल-उत्पादक देशांमधील जहाजवाहतूक क्षमतेवर परिणाम झाला आहे. साठवण टाक्या पूर्ण भरल्यामुळे, या देशांना त्यांचे उत्पादन कमी करण्यास भाग पडले आहे, ज्यामुळे बाजारात कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात अचानक घट झाली आहे.

पुरवठ्याच्या कमतरतेची शक्यता आणि तणावात आणखी वाढ झाल्यामुळे, जागतिक बाजारात ब्रेंट क्रूड आणि डब्ल्यूटीआय (WTI) दोन्ही तेलांच्या किमती प्रति बॅरल १०० डॉलरची मानसिक पातळी गाठू शकतात.

भविष्यात याचे काय परिणाम होतील?

जर आखाती देशांमधील परिस्थिती लवकर सुधारली नाही आणि कच्च्या तेलाच्या किमती १०० डॉलरचा टप्पा ओलांडतील, तर जगभरात महागाईच्या एका नव्या पर्वाची सुरुवात होऊ शकते.

चीनला बसणार मोठा धक्का! India चा Brazil सोबत 30 अब्ज डॉलरचा Business Plan ; ‘या’ 5 क्षेत्रांना होणार मोठा फायदा

Web Title: Crude oil rises govt increases tax on petrol diesel check new rates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2026 | 02:09 PM

Topics:  

  • Crude Oil Prices
  • Petrol diesel price
  • Rate Hike

संबंधित बातम्या

Shipping Charge Hike : ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्यांना झटका! पार्सल डिलिव्हरीच्या दरात वाढ; ‘या’ कंपनीने घेतला मोठा निर्णय
1

Shipping Charge Hike : ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्यांना झटका! पार्सल डिलिव्हरीच्या दरात वाढ; ‘या’ कंपनीने घेतला मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.