Avadhut Sathe यांना 546 कोटी रुपये परत करण्याचे SEBI कडून आदेश ( सौजन्य - सोशल मीडिया )
सेबीला असे आढळून आले की, कंपनी आणि तिचे संस्थापक आवश्यक नोंदणीशिवाय गुंतवणूक सल्लागार आणि संशोधन विश्लेषक म्हणून कार्यरत करत होते. सेबीने अंतिम आदेशात अवधूत साठे आणि त्यांच्या कंपनीवर दोन वर्षांसाठी किंवा पैसे परत करण्याच्या निर्देशांचं पालन होईपर्यंत जो कालावधी जास्त आहे त्या काळापर्यंत बाजारातून संपूर्ण बंदी घातली आहे. कंपनीचे संचालक, अवधूत साठे यांना तर सहा महिन्यांसाठी बाजारापासून दूर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सेबीने कंपनी आणि अवधूत साठे यांना आदेश दिल्यापासून पुढील पाच महिन्यांच्या आत ₹५४६.१७ कोटींची ही संपूर्ण रक्कम एका निर्दिष्ट बँक खात्यात जमा करण्याचे निर्देश देण्याक आले आहेत. तसेच, त्यांनी ३० दिवसांच्या आत इंग्रजी, हिंदी आणि मोठ्या प्रमाणावर प्रसारित होणाऱ्या स्थानिक भाषेतील वृत्तपत्रात जाहिराती प्रसिद्ध करून गुंतवणूकदारांना परतावा प्रक्रियेबद्दल माहिती देणं देखील आवश्यक असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
नियामकाने स्पष्ट केले आहे की, पेमेंटची संपूर्ण नोंद आणि लाभार्थ्यांची ओळख ठरणवण्यासाठी, गुंतवणूकदारांना परतावा केवळ इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर किंवा इतर बँकिंग चॅनेलद्वारेच दिला जाईल. सर्व दावेदारांना पैसे दिल्यानंतर काही निधी शिल्लक राहिल्यास, तो सेबीकडे सुपूर्द केला जाईल. ही रक्कम एका वर्षासाठी एस्क्रो खात्यात ठेवली जाईल, जेणेकरून पात्र गुंतवणूकदार आणि तक्रारदारांना त्यांचे पैसे दिले जाऊ शकतील. या कालावधीनंतरही काही निधी शिल्लक राहिल्यास, तो गुंतवणूकदार संरक्षण आणि शिक्षण निधी म्हणजेच IPEF मध्ये हस्तांतरित केला जाणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.
सेबीने कंपनी, अवधूत साठे आणि गौरी साठे यांच्यावर एकूण ११.५ कोटी रुपयांचा दंड लावला आहे. यामध्ये कंपनीवर ६ कोटी रुपये, अवधूत साठे यांच्यावर ४ कोटी रुपये आणि गौरी साठे यांच्यावर १.५ कोटी रुपयांच्या दंडाचा समावेश आहे. ही रक्कम आदेश मिळाल्यापासून ४५ दिवसांच्या आत जमा करणे आवश्यक असल्याचं सेबीने स्पष्ट केलं आहे. सेबीने आपल्या आदेशात म्हटले आहे की, जोपर्यंत संपूर्ण रक्कम जमा होत नाही, तोपर्यंत संबंधित पक्षांच्या बँक खात्यांमधील डेबिट व्यवहार गोठवलेलेच राहतील.
सेबीच्या तपासात असे आढळून आले की, ASTPL आणि तिचे संस्थापक केवळ शेअर बाजाराचे शिक्षण देण्यापुरते मर्यादित नव्हते, तर ते गुंतवणूकदारांना विशिष्ट शेअर्सच्या खरेदी-विक्रीबाबतही सल्ला देत होते. या तपासात असे उघड झाले की, आवश्यक नियामक नोंदणी नसतानाही, ही कंपनी कथितरित्या एंट्री आणि एक्झिट लेव्हल्स, स्टॉप लॉस आणि शेअरच्या किमतीच्या दिशेबाबत सल्ला देत होती.
Ans: सेबीने अवधूत साठे आणि त्यांच्या संस्थेला बेकायदेशीर सल्लागाराच्या माध्यमातून वसूल केलेले ₹५४६ कोटी रुपये गुंतवणूकदारांना परत करण्याचे निर्देश दिले आहेत.
Ans: सेबीच्या नियमांनुसार वित्तीय सल्ला किंवा ट्रेडिंग टिप्स देण्यासाठी आवश्यक असणारी अधिकृत नोंदणी न करता, मोठे परतावे मिळवून देण्याचे दावे करून ट्रेडिंग क्लासेस चालवणे आणि अनधिकृत सल्ला देणे, हे मुख्य कारण आहे.
Ans: गुंतवणूकदारांनी केवळ SEBI Registered संशोधन विश्लेषक किंवा गुंतवणूक सल्लागारांचीच मदत घ्यावी आणि रातोरात श्रीमंत होण्याचे दावे करणाऱ्या अनधिकृत संस्थांपासून सावध राहावे.






