Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

DHL Rakhi Express 2026: राखीचा गोडवा आता सीमापार! DHLची ‘राखी एक्सप्रेस’मध्ये ५० टक्क्यांची सूट

DHL Rakhi Express 2026: रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर परदेशात राहणाऱ्या भावंडांसाठी DHL Expressने ‘राखी एक्सप्रेस’ ऑफर पुन्हा आणली आहे. या ऑफरअंतर्गत भारतातून परदेशात राखी किंवा भेटवस्तू पाठवताना ग्राहकांना ५० टक्के फ्लॅट डिस्काउंट मिळणार आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 22, 2026 | 05:25 PM
DHL Rakhi Express 2026: राखीचा गोडवा आता सीमापार! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

DHL Rakhi Express 2026: राखीचा गोडवा आता सीमापार! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • DHLची ‘राखी एक्सप्रेस’ ऑफर पुन्हा सुरू
  • आंतरराष्ट्रीय शिपमेंटवर ५०% फ्लॅट डिस्काउंट
  • परदेशात राखी आणि भेटवस्तू पाठवणे होणार स्वस्त
Rakhi Delivery Abroad: रक्षाबंधन जवळ आलं की परदेशात राहणाऱ्या भाऊ-बहिणींची आठवण आणखी तीव्र होते. भाऊ किंवा बहीण कितीही दूर असली, तरी राखीच्या निमित्ताने प्रेमाची छोटीशी खूण त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची इच्छा असते. हीच भावना लक्षात घेऊन DHL Expressने यंदा पुन्हा ‘राखी एक्सप्रेस’ ऑफर आणली आहे.

या ऑफरअंतर्गत भारतातून परदेशात राखी किंवा भेटवस्तू पाठवताना ग्राहकांना ५० टक्के फ्लॅट डिस्काउंट मिळणार आहे. त्यामुळे परदेशात राहणाऱ्या भावाला किंवा बहिणीला राखी पाठवणं तुलनेने स्वस्त होऊ शकतं.

ऑफर कधीपर्यंत?

ही विशेष सवलत २८ ऑगस्ट २०२६ पर्यंत उपलब्ध आहे. ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना DHLRAKHI50 हा प्रोमो कोड वापरावा लागेल. DHL Rakhi Express 2026:

राखी किंवा गिफ्ट पाठवण्यासाठी ग्राहक जवळच्या DHL Express किंवा Blue Dart Retail Service Pointवर जाऊ शकतात. याशिवाय MyDHL+च्या माध्यमातून ऑनलाइन बुकिंग करता येईल. ग्राहक सेवा विभागामार्फतही शिपमेंटची नोंद करता येणार आहे.

फक्त राखीच नाही, भेटवस्तूही पाठवता येणार

रक्षाबंधनासाठी केवळ राखी पाठवण्याची गरज नाही. भाऊ किंवा बहिणीसाठी एखादी छोटी भेट, शुभेच्छा किंवा सणाची आठवण म्हणून वस्तूही पाठवता येऊ शकते. परदेशात राहणाऱ्या आपल्या व्यक्तीपर्यंत भारतातून पाठवलेलं छोटंसं पार्सलही त्यांच्यासाठी खास ठरू शकतं.

DHL Expressचे भारतातील नेटवर्क २२० हून अधिक देश आणि प्रदेशांशी जोडलेले आहे. शिपमेंट कुठे पोहोचलं आहे, याची माहिती ट्रॅकिंगद्वारे मिळते. SMS आणि ईमेल अपडेट्स तसेच On Demand Deliveryसारख्या सुविधाही ग्राहकांना उपलब्ध आहेत.

DHL Expressचे व्हाइस प्रेसिडेंट (कमर्शियल), भारत, संदीप जुनेजा यांनी सांगितलं की, रक्षाबंधनाच्या काळात अंतर जास्त जाणवतं. अशा वेळी राखी किंवा भेटवस्तूच्या माध्यमातून नातं जवळ आणण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे ही प्रक्रिया सोपी आणि कमी खर्चाची करण्यासाठी ‘राखी एक्सप्रेस’ सुरू करण्यात आली आहे.

बुकिंग कसं करायचं?

ऑफरची अधिक माहिती घेण्यासाठी ग्राहक DHLच्या ग्राहक सेवा क्रमांकावर संपर्क करू शकतात. 1800 30 345 या टोल-फ्री क्रमांकावर चौकशी करता येईल. तसेच MyDHL+वरून शिपमेंटचा खर्च जाणून घेऊन थेट बुकिंग करण्याचा पर्यायही उपलब्ध आहे.

Cheque Book Rules Change: चेकबुकबाबत मोठी बातमी! जुने चेकबुक होणार बंद? खातेदारांना करावा लागणार ‘हा’ बदल

मात्र, आंतरराष्ट्रीय पार्सल पाठवताना वस्तूंच्या प्रकारानुसार काही नियम आणि अटी लागू होऊ शकतात. त्यामुळे बुकिंग करण्यापूर्वी संबंधित अटी तपासणं महत्त्वाचं आहे.

Credit Card Rule Change: कार्ड स्वाइप करण्याआधी सावध! 28 ऑगस्टपासून बदलणार क्रेडिट कार्डचे ‘हे’ ४ नियम

रक्षाबंधनाच्या निमित्ताने परदेशात असलेल्या आपल्या भावाला किंवा बहिणीला काहीतरी खास पाठवण्याचा विचार असेल, तर २८ ऑगस्टपूर्वी ‘राखी एक्सप्रेस’च्या ५०% सवलतीचा लाभ घेता येऊ शकतो.

Web Title: Dhl rakhi express 2026 get 50 off on international rakhi shipments

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2026 | 05:25 PM

Topics:  

  • Business News
  • Marathi News

संबंधित बातम्या

Avadhoot Gupte: अवधूत गुप्तेंची ‘सारेगमप’मध्ये दमदार कमबॅक! नव्या पिढीच्या सुरांचा घेणार वेध
1

Avadhoot Gupte: अवधूत गुप्तेंची ‘सारेगमप’मध्ये दमदार कमबॅक! नव्या पिढीच्या सुरांचा घेणार वेध

Cheque Book Rules Change: चेकबुकबाबत मोठी बातमी! जुने चेकबुक होणार बंद? खातेदारांना करावा लागणार ‘हा’ बदल
2

Cheque Book Rules Change: चेकबुकबाबत मोठी बातमी! जुने चेकबुक होणार बंद? खातेदारांना करावा लागणार ‘हा’ बदल

Chandrapur News: चंद्रपूरमध्ये पावसाचा लपंडाव; ५०२ मिमी पावसाची नोंद, खरीप पिकांना दमदार सरींची प्रतीक्षा
3

Chandrapur News: चंद्रपूरमध्ये पावसाचा लपंडाव; ५०२ मिमी पावसाची नोंद, खरीप पिकांना दमदार सरींची प्रतीक्षा

Raigad News: पनवेलमध्ये देशातील पहिली ‘खारघर हिल महापौर मॅरेथॉन’; ७ हजारांहून अधिक धावपटू सहभागी होणार!
4

Raigad News: पनवेलमध्ये देशातील पहिली ‘खारघर हिल महापौर मॅरेथॉन’; ७ हजारांहून अधिक धावपटू सहभागी होणार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.