Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एका क्लिकवर गमावू शकता कष्टाची कमाई! Digital Assets मध्ये गुंतवणूक करताना भामट्यांपासून सावध राहण्यासाठी या टिप्स फॉलो करा

Digital Assets Investment Cyber Fraud : डिजिटल इंडिया उपक्रमामुळे देशात 'डिजिटल ॲसेट्स' हा गुंतवणुकीचा नवा पर्याय लोकप्रिय ठरत असला, तरी या क्षेत्रातील वाढत्या सायबर गुन्ह्यांमुळे गुंतवणूकदारांनी अत्यंत सावध राहणे गरजेचे आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Oct 09, 2026 | 06:35 PM
डिजिटल गुंतवणुकीतील फसवणूक कशी ओळखायची? ( सौजन्य - सोशल मीडिया )

डिजिटल गुंतवणुकीतील फसवणूक कशी ओळखायची? ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • एका क्लिकवर गमावू शकता कष्टाची कमाई!
  • Digital Assets मध्ये गुंतवणूक करताना भामट्यांपासून सावध राहा
  • फॉलो करा हे 5 टिप्स ज्यामुळे होईल फायदा
Digital Assets Investment Cyber Fraud : भारत सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ उपक्रमामुळे आणि वाढत्या तंत्रज्ञानामुळे आज देशातील आर्थिक क्षेत्र वेगाने बदलत आहे. या डिजिटल फायनान्सच्या युगात ‘डिजिटल ॲसेट्स’ (डिजिटल मालमत्ता) हा गुंतवणुकीचा एक नवा आणि महत्त्वाचा पर्याय म्हणून समोर येत आहे. अनेक तरुण आणि नवे गुंतवणूकदार या क्षेत्रातील संधी शोधत आहेत. मात्र, जसजसा या क्षेत्रातील लोकांचा सहभाग वाढत आहे, तसतशी ऑनलाईन फसवणूक आणि सायबर गुन्ह्यांची संख्याही चिंताजनक रीतीने वाढत आहे. याबाबतचं मार्गदर्शन कॉईनडीसीएक्सचे सह-संस्थापक लेखक सुमित गुप्ता यांनी केलं. ( Digital Assets Investment Cyber Fraud ) 

Kitchen Budget Inflation : महागाईच्या झळा आणखीनच तीव्र… कांदा, तेल LPG सगळंच कडाडलं! घरचा स्वयंपाक 10 टक्क्यांनी महागला

आजचे भामटे आणि घोटाळेबाज केवळ बनावट फोन कॉलपुरते मर्यादित राहिलेले नाहीत. ते सोशल मीडिया संदेश, टेलिग्राम ग्रुप्स, व्हॉट्सॲप मेसेज, आकर्षक मोबाईल ॲप्स किंवा अगदी हुबेहूब खऱ्या दिसणाऱ्या संकेतस्थळांच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना आपल्या जाळ्यात ओढतात.

विशेषतः डिजिटल मालमत्ता क्षेत्रात नव्याने पाऊल ठेवणाऱ्या गुंतवणूकदारांनी कोणत्याही अमिषाला बळी न पडता सावध राहणे अत्यंत गरजेचे आहे. फसवणूक टाळण्यासाठी प्रत्येक गुंतवणूकदाराने ओळखले पाहिजेत असे ५ प्रमुख धोक्याचे इशारे खालीलप्रमाणे आहेत:

१. ‘सहज आणि जलद नफ्या’चे अवाजवी दावे:

कमी किंवा कोणताही धोका न पत्करता निश्चित नफा किंवा अत्यंत अल्प कालावधीत अवाजवी परताव्याचे आश्वासन दिले जात असेल, तर तो पहिला आणि सर्वात मोठा धोक्याचा इशारा आहे. हे नेहमी लक्षात ठेवा की, इतर कोणत्याही बाजार-संलग्न गुंतवणुकीप्रमाणेच डिजिटल मालमत्तांमध्येही चढ-उतार होतात आणि त्यात जोखीम असते. घोटाळेबाज बहुदा लोकांना विचार न करता तातडीने पैसे ट्रान्सफर करण्यास प्रवृत्त करण्यासाठी अशा नफ्याचे अमिष दाखवतात. कोणत्याही आकर्षक दाव्यांवर डोळे झाकून विश्वास ठेवण्याऐवजी ती योजना काय आहे, ती देणारी संस्था कोणती आहे आणि तिची अधिकृतता पडताळता येते का, याचा सखोल अभ्यास करा.

२. अनपेक्षित आणि अनोळखी गुंतवणुकीच्या ऑफर्स:

जर तुम्हाला व्हॉट्सॲप, टेलिग्राम, सोशल मीडिया किंवा ईमेलवर अनोळखी व्यक्तीकडून गुंतवणुकीची थेट ऑफर आली, तर त्वरित सावध व्हा. स्वतःला ‘गुंतवणूक तज्ज्ञ’ किंवा नामांकित कंपनीचा ‘प्रतिनिधी’ सांगून लोक तुमचे लक्ष वेधून घेतात. अनेकदा प्रस्थापित ब्रँड्सच्या नावाचा किंवा लोगोचा गैरवापर करून बनावट प्रोफाईल तयार केले जातात. अशा कोणत्याही अनपेक्षित संदेशांमधील संपर्क क्रमांकावर किंवा लिंकवर विश्वास न ठेवता, संबंधित कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून माहितीची पडताळणी करा.

३. हुबेहूब दिसणारी संशयास्पद संकेतस्थळे आणि ॲप्लिकेशन्स:

एखादे संकेतस्थळ किंवा मोबाईल ॲप अत्यंत व्यावसायिक आणि आकर्षक दिसत असले, तरी ते अधिकृत असेलच असे नाही. गुन्हेगार कायदेशीर आणि नामांकित आर्थिक सेवांशी जुळणाऱ्या बनावट ॲप्स आणि वेबसाईट तयार करतात. काही बनावट ॲप्स तर सुरुवातीला गुंतवणूकदाराचा विश्वास जिंकण्यासाठी आभासी नफा दाखवतात आणि लहान रकमा काढण्याची परवानगी देतात. एकदा युजरचा विश्वास बसला की त्याला मोठी रक्कम जमा करायला लावून पसार होतात. त्यामुळे कोणत्याही ॲपला डाऊनलोड करताना केवळ ‘गूगल प्ले स्टोअर’ किंवा ‘ॲपल ॲप स्टोअर’ सारख्या अधिकृत स्त्रोतांचाच वापर करा आणि वेबसाईटची युआरएल काळजीपूर्वक तपासा.

४. ओटीपी, पासवर्ड किंवा गोपनीय माहितीची मागणी:

पासवर्ड, ओटीपी (वन टाईम पासवर्ड), प्रायव्हेट की किंवा वॉलेटचा तपशील मागणे हा एक अत्यंत गंभीर धोक्याचा इशारा आहे. घोटाळेबाज बहुदा ‘कस्टमर सपोर्ट प्रतिनिधी’ असल्याचे भासवतात. तुमचे खाते ब्लॉक झाले आहे, ब्लॉक काढण्यासाठी किंवा व्यवहार पूर्ण करण्यासाठी OTP ची गरज आहे, असे सांगून तुमची फसवणूक करतात. कोणतीही अधिकृत संस्था किंवा प्लॅटफॉर्म कधीही तुमच्याकडे गोपनीय माहिती मागत नाही. त्यामुळे कोणीही कितीही मोठा दावा केला, तरी आपली संवेदनशील माहिती कोणासोबतही शेअर करू नका.

५. घाईघाईने निर्णय घेण्यासाठी आणला जाणारा ‘दबाव’:

आर्थिक फसवणूक करताना घोटाळेबाजांचे मुख्य हत्यार म्हणजे ‘तात्कालिकता’ (Urgency) निर्माण करणे हे असते. “लगेच गुंतवणूक करा नाहीतर ही संधी हुकेल”, “पैसे काढण्यासाठी आताच अतिरिक्त कर भरा”, किंवा “सवलत संपण्यापूर्वी निर्णय घ्या”, अशा प्रकारचा दबाव तुमच्यावर आणला जातो. जेव्हा जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला विचार करण्यासाठी वेळ न देता लगेच निर्णय घेण्यास भाग पाडते, तेव्हा तिथे फसवणुकीची शक्यता सर्वाधिक असते.

‘या’ शेतकऱ्यांना मिळणार 4-4 हजार रुपये; PM Kisan योजनेच्या हप्त्यापूर्वी मोठी बातमी! असे तपासा ताजे अपडेट

Web Title: Digital assets investment fraud 5 red flags sumit gupta coindcx ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2026 | 06:35 PM

Topics:  

  • digital
  • online fraud

संबंधित बातम्या

DIKSHA Portal: डिजिटल शिक्षणाचे वरदान! पंतप्रधान मोदींनी सांगितले, ‘या’ प्लॅटफॉर्मचे शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्व’
1

DIKSHA Portal: डिजिटल शिक्षणाचे वरदान! पंतप्रधान मोदींनी सांगितले, ‘या’ प्लॅटफॉर्मचे शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्व’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.