Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Egg Price Hike: दुष्काळात तेरावा महिना! अजून काय काय बघावं लागणार? साखर, कांद्यानंतर आता अंड्यांच्या दरात वाढ

Egg Price Hike: अरे बापरे... अजून काय काय बघावं लागणार आहे. साखर आणि कांद्याचे दर वाढ सुरुच असताना, आता अंड्यांच्याही दरात वाढ झाली आहे. एकंदरीत दुष्काळात तेरावा महिन्यासारखी परिस्थिती ओढावली आहे. साखर आणि कांद्याच्या वाढत्या किमतींनी आधीच सर्वसामान्यांचे बजेट बिघडले असताना आता अंड्यांच्या दरवाढीने आणखी एक झटका दिला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 27, 2026 | 11:18 AM
दुष्काळात तेरावा महिना! अजून काय काय बघावं लागणार? साखर, कांद्यानंतर आता अंड्यांच्या दरात वाढ

दुष्काळात तेरावा महिना! अजून काय काय बघावं लागणार? साखर, कांद्यानंतर आता अंड्यांच्या दरात वाढ

Follow Us
Follow Us:
  • अंड्यांच्या दरात 35 ते 40 टक्क्यांनी वाढ
  • कोंबड्यांचं खाद्य महागल्याने अंड्यांच्या दरात वाढ
  • किरकोळ बाजारात अंड्यासाठी 9 रुपये मोजावे लागणार
Egg Price Hike: महाराष्ट्रासह देशभरात साखर आणि कांद्याच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्यांचे बजेट आधीच कोलमडले आहे. त्यात आता अंड्यांच्या वाढलेल्या दराची भर पडली आहे. एकंदरीत दुष्काळात तेरावा महिना सुरु झाला आहे. महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून अजून काय काय बघावं लागणार आहे? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

गेल्या वर्षभरात अंड्यांच्या किमतीत सुमारे 35 ते 40 टक्क्यांची वाढ झाली असून किरकोळ बाजारात एका अंड्यासाठी ग्राहकांना 8.50 ते 9 रुपये मोजावे लागत आहेत. पोल्ट्री उद्योगाच्या म्हणण्यानुसार, मक्क्याचा इथेनॉल उत्पादनासाठी वाढलेला वापर आणि त्यामुळे महागलेले कोंबडी खाद्य हे अंड्यांच्या दरवाढीमागील प्रमुख कारणांपैकी एक आहे.

Chicken Price Hike : आधी भाजीपाला, मग अंडी अन् नंतर चिकनचा नंबर …

वर्षभरात अंडी 35 ते 40 टक्क्यांनी महाग

नॅशनल एग्ज कोऑर्डिनेशन कमिटीच्या (NECC) आकडेवारीनुसार, गेल्या एका वर्षात अंड्यांच्या किमतीत सुमारे 35 ते 40 टक्क्यांची वाढ झाली आहे. एका अंड्याचा आधारभूत दर सुमारे 7 रुपयांपर्यंत पोहोचला असून किरकोळ बाजारात ग्राहकांना एका अंड्यासाठी 8.50 ते 9 रुपये मोजावे लागत आहेत. पोल्ट्री उद्योगाच्या मते, सध्याच्या परिस्थितीत अंड्यांच्या किमती लगेच कमी होण्याची शक्यता कमी आहे. त्यातच थंडीच्या दिवसांत अंड्यांची मागणी वाढत असल्याने आगामी काळात दरावर आणखी दबाव निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

इथेनॉल आणि अंड्यांच्या किमतीचा काय संबंध?

अंड्यांच्या दरवाढीमागे मक्क्याच्या वाढत्या किमती महत्त्वाचे कारण ठरत आहेत. कोंबड्यांच्या खाद्यामध्ये मक्क्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. मात्र इथेनॉल निर्मितीसाठीही मक्क्याची मागणी वाढल्याने पोल्ट्री उद्योगाला उपलब्ध होणाऱ्या मक्क्याच्या पुरवठ्यावर दबाव निर्माण झाला आहे.

इथेनॉल ब्लेंडिंग कार्यक्रमांतर्गत पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळले जाते. इथेनॉलच्या निर्मितीसाठी ऊसासह मक्क्यासारख्या धान्यांचाही वापर होतो. त्यामुळे इथेनॉलसाठी मक्क्याची मागणी वाढल्यास पशुखाद्य आणि पोल्ट्री फीडसाठी उपलब्ध पुरवठा तसेच त्याच्या किमतींवर परिणाम होऊ शकतो.

14 हजारांवरून 26,500 रुपये टनावर मक्का

दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या तीन वर्षांत मक्क्याची किंमत प्रति टन सुमारे 14 हजार रुपयांवरून 26,500 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. गेल्या पाच महिन्यांतच मक्क्याच्या दरात सुमारे 20 टक्क्यांची वाढ झाल्याचा दावा करण्यात आला आहे. मक्का हा पोल्ट्री खाद्यातील अत्यंत महत्त्वाचा घटक असल्यामुळे त्याच्या किमती वाढल्यास कोंबडीपालनाचा उत्पादन खर्च थेट वाढतो. पोल्ट्री व्यवसायातील एकूण उत्पादन खर्चात खाद्याचा वाटा मोठा असल्याने मक्क्याची दरवाढ व्यावसायिकांसाठी चिंतेचा विषय बनली आहे.

उत्पादन खर्च वाढल्याचा अंड्यांच्या दरावर परिणाम

कोंबड्यांचे खाद्य महाग झाल्यानंतर अंडी उत्पादकांचा उत्पादन खर्च वाढतो. वाढलेल्या खर्चाची भरपाई करण्यासाठी अंड्यांच्या विक्री दरात वाढ करावी लागते. त्यामुळे इथेनॉलसाठी मक्क्याची वाढती मागणी, मक्क्याच्या किमतीतील तेजी आणि पोल्ट्री खाद्याचा वाढलेला खर्च अशी साखळी अंड्यांच्या किमतीपर्यंत पोहोचत असल्याचे उद्योगाचे म्हणणे आहे.

Tata Car Price Hike: ₹25000 पर्यंत वाढणार किंमत – Navarashtra

हिवाळ्यात पुन्हा भाव वाढण्याची शक्यता

सध्या अंड्यांच्या किमती स्थिर राहण्याचा अंदाज पोल्ट्री उद्योगाकडून व्यक्त केला जात असला तरी हिवाळ्यात चित्र बदलू शकते. थंडीच्या काळात अंड्यांची मागणी सामान्यतः वाढते. त्यामुळे पुरवठा आणि उत्पादन खर्चावर दबाव कायम राहिल्यास अंड्यांच्या किमती पुन्हा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

साखर, कांदा आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीमुळे घरगुती बजेटवर आधीच ताण असताना अंडीही महाग झाल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे.

Web Title: Egg price hike in india maize shortage ethanol production poultry feed cost increase

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2026 | 11:18 AM

Topics:  

  • Business News
  • india
  • Sugar

संबंधित बातम्या

Kitchen Budget Inflation : महागाईच्या झळा आणखीनच तीव्र… कांदा, तेल LPG  सगळंच कडाडलं! घरचा स्वयंपाक 10 टक्क्यांनी महागला
1

Kitchen Budget Inflation : महागाईच्या झळा आणखीनच तीव्र… कांदा, तेल LPG सगळंच कडाडलं! घरचा स्वयंपाक 10 टक्क्यांनी महागला

SIR Process Protest: SIR प्रक्रियेला इंडिया आघाडीचा विरोध! शासन आणि निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
2

SIR Process Protest: SIR प्रक्रियेला इंडिया आघाडीचा विरोध! शासन आणि निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

IMD Weather Alert: मान्सून जाता जाता पुन्हा बरसणार! देशभरात हवामान बदलले, कुठे अतिवृष्टी तर कुठे वादळी पावसाचा इशारा
3

IMD Weather Alert: मान्सून जाता जाता पुन्हा बरसणार! देशभरात हवामान बदलले, कुठे अतिवृष्टी तर कुठे वादळी पावसाचा इशारा

Bhandara:शाळेच्या मैदानावर आढळल्या भानामतीच्या आकृत्या! पांढऱ्या रेषा, पूजासाहित्य, खिळे, लिंबू यांची सांगड; चर्चेला मोठे उधान
4

Bhandara:शाळेच्या मैदानावर आढळल्या भानामतीच्या आकृत्या! पांढऱ्या रेषा, पूजासाहित्य, खिळे, लिंबू यांची सांगड; चर्चेला मोठे उधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.