(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
कंपनीने एचडीएफसी म्युच्युअल फंडकडून आणखी २५० कोटी रुपयांचे नॉन-कन्व्हर्टिबल डिबेंचर्स उभारले आहेत, ज्यामुळे उच्च श्रेणीतील आर्थिक संस्थांमधील कंपनीची विविधता अधिक दृढ झाली आहे. जे.पी. मॉर्गन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने या एनसीडीसाठी स्ट्रक्चरिंग अॅडवायजर म्हणून काम पाहिले.
कंपनीने यापूर्वी क्रिसिल रेटिंग्जकडून ‘एए-; स्टेबल’ रेटिंग मिळवल्याचे जाहीर केले होते, ज्याची मार्च २०२६ मध्ये पुन्हा पुष्टी करण्यात आली. या रेटिंगमधून इव्होनिथ स्टीलच्या पाठीशी असलेल्या घटकांमधील व्यवस्थापनाने केलेल्या सुधारणा दिसून येतात. ऑक्टोबर २०२४ मध्ये जाहीर केलेल्या कंपनीच्या मागील कर्जाची आता पूर्णपणे परतफेड करण्यात आली आहे.
डिसेंबर २०२० मध्ये हा व्यवसाय ताब्यात घेतल्यापासून इव्होनिथ स्टीलने महत्त्वपूर्ण कार्यात्मक सुधारणा सुनिश्चित केल्या आहेत. ज्यामुळे उत्पादनात वाढ, प्रकल्पांची यशस्वी पूर्तता आणि व्यवसायाची एकंदरीत कामगिरी व नफाक्षमतेत वाढ झाली आहे. परिणामी, कंपनी आता आपल्या विकासाच्या पुढील टप्प्यासाठी प्रबळपणे सज्ज झाली आहे.
या रिफायनान्सिंग प्रक्रियेबाबत मत व्यक्त करत इव्होनिथ स्टीलचे अध्यक्ष जय सराफ म्हणाले, “आमची वित्तपुरवठा धोरणे आर्थिकदृष्ट्या स्थिर आणि विकासोन्मुख व्यवसाय उभारण्याच्या आमच्या दीर्घकालीन दृष्टीकोनाशी सुसंगत आहेत. भांडवलाचा खर्च कमी करून आणि कर्जाची मुदत वाढवून आम्ही कार्यात्मक उत्कृष्टता, तसेच आमच्या वर्तमान व भविष्यातील विस्तारासाठी गुंतवणूक करण्यास अधिक उत्तम स्थितीत आहोत. इव्होनिथ स्टीलमध्ये आमचे भविष्याभिमुख संस्थेच्या उभारणीवर लक्ष केंद्रित आहे, जी आमच्या सर्व भागधारकांसाठी मूल्य निर्माण करेल.”
या फायनान्सिंगमधून कंपनीची उत्तम कामगिरी आणि कार्यक्षम ऑपरेशन्समुळे निर्माण झालेली मजबूत आर्थिक स्थिती दिसून येते, विशेषतः जागतिक भू-राजकीय वातावरणातील सध्याच्या अस्थिर काळात हे महत्त्वपूर्ण आहे. कंपनी आता व्हॅल्यू चेनमध्ये डाउनस्ट्रीम प्रक्रियेत अधिक प्रगती करण्यासाठी आणि एकूण उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी अनेक नवीन भांडवली खर्च उपक्रम हाती घेत आहे. आपले मत व्यक्त करत इव्होनिथ स्टीलचे संचालक राजिब गुहा म्हणाले, “या फायनान्सिंगमुळे आमचा वित्तपुरवठा खर्च लक्षणीयरित्या कमी झाला आहे. हे केवळ यशस्वी भांडवल वाटपामुळे शक्य झाले आहे, ज्याने गुंतवलेल्या भांडवलावर उच्च स्तरीय परतावा मिळवून दिला आहे.”






