India vs New Zealand T20 Live Streaming: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील T20 सीरिजचा धमाका आजपासून सुरू होत आहे. पण यावेळी क्रिकेटच्या दुनियेत एक वेगळाच प्रयोग होत आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने पहिल्यांदाच हा सामना TikTok वर लाईव्ह दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. पण इथेच भारतीय चाहत्यांसाठी मोठा प्रॉब्लेम आहे, कारण भारतात TikTok बंद आहे. मग आता सामना पाहायचा कसा? टेन्शन घेऊ नका, आम्ही तुम्हाला त्याचा सोपा उपाय सांगतो. India vs New Zealand T20 Live Streaming:
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडतंय. न्यूझीलंड बोर्ड आणि Sky Sports यांनी मिळून ठरवलंय की भारत विरुद्ध न्यूझीलंडच्या T20 मधले पहिले 6 ओव्हर्स, म्हणजे पॉवरप्ले, ते TikTok वर व्हर्टिकल फॉरमॅटमध्ये दाखवतील. म्हणजे जसं आपण रील बघतो, तसाच सामना मोबाईलवर उभा दिसणार.
India Today च्या रिपोर्टनुसार, तरुण पिढीला, ज्यांना सतत रील्स पाहायची सवय आहे, त्यांना क्रिकेटकडे खेचण्यासाठी हा प्रयोग केला जात आहे.
जगभरात याची चर्चा सुरू आहे, पण भारतात TikTok वर बंदी आहे. सुरक्षेच्या कारणामुळे सरकारने काही वर्षांपूर्वीच TikTok भारतात बंद केलंय. त्यामुळे भारतीय लोक सरळ TikTok वर जाऊन सामना पाहू शकत नाहीत. काही लोक VPN वापरून पाहण्याचा प्रयत्न करतील, पण तो मार्ग सुरक्षित नाही आणि त्यात अडचणी येऊ शकतात.
त्यात पण TikTok वर फक्त पहिले 6 ओव्हर्सच दिसणार आहेत. पूर्ण सामना तिथे दिसणार नाहीये. त्यामुळे फक्त 6 ओव्हरसाठी एवढा खटाटोप करण्यापेक्षा पूर्ण सामना पाहण्यासाठी एकदम सोपा आणि अधिकृत मार्ग उपलब्ध आहे.
भारतासाठी न्यूझीलंड क्रिकेटचे सगळे हक्क Sony Pictures कडे आहेत. 2024 ते 2031 पर्यंतचे TV आणि ऑनलाईन हक्क त्यांच्याकडेच आहेत. त्यामुळे तुम्हाला कोणतंही टेन्शन न घेता सामना इथे पाहता येईल.
1. मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर: तुम्हाला ऑनलाईन सामना पाहायचा असेल तर Sony LIV App डाउनलोड करा. त्याच्या वेबसाईटवर पण तुम्ही लॉगिन करून सामना पाहू शकता.
2. टीव्हीवर: तुम्हाला मोठ्या स्क्रीनवर सामना पाहायचा असेल तर Sony Sports Ten 1, Ten 3 आणि Ten 5 या चॅनेलवर सामना थेट दाखवला जाईल.श्रेयस अय्यरच्या कॅप्टन्सीमध्ये भारतीय टीम हा सामना खेळत आहे. सगळे T20 सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 12:30 वाजता सुरू होतील. त्यामुळे TikTok च्या भानगडीत न पडता Sony LIV हाच सगळ्यात सुरक्षित आणि बेस्ट ऑप्शन आहे. कोणताही अडथळा नाही, एकदम क्लिअर मध्ये तुम्हाला पूर्ण मॅच पाहता येईल.
Ans: बातमीनुसार, सामन्यातील पहिले 6 षटके TikTok वर व्हर्टिकल फॉरमॅटमध्ये दाखवण्याचा प्रयोग केला जाणार
Ans: भारतात TikTok वर बंदी असल्यामुळे भारतीय चाहत्यांना या प्लॅटफॉर्मवर थेट सामना पाहता येणार नाही.
Ans: SonyLIV ॲप किंवा वेबसाइटवर ऑनलाइन सामना पाहता येईल.






