Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Evonith Steel ची मोठी आर्थिक झेप! 1750 कोटींचे कर्ज उभारून भांडवली संरचनेत सुधारणा

भविष्यातील विकास योजनांना पाठबळ देण्यासाठी आर्थिक स्थिरता वाढवून कंपनीची भांडवली रचना सुधारणे हा आहे. या व्यवहाराचे अंडररायटिंग व सिंडिकेशन स्टँडर्ड चार्टर्ड आणि जेपी मॉर्गन चेस बँक, एन. ए., मुंबई शाखा यांनी केले आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 15, 2026 | 03:13 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:
  • म्युच्युअल फंडकडून २५० कोटी रुपयांचे नॉन-कन्व्हर्टिबल डिबेंचर्स
  • इव्होनिथ स्टीलने महत्त्वपूर्ण कार्यात्मक सुधारणा
  • कंपनीची उत्तम कामगिरी आणि कार्यक्षम ऑपरेशन्स
Evonith Steel Raises : इव्होनिथ स्टीलने आपल्या विद्यमान कर्जाचे रिफायनान्‍स करण्यासाठी १,७५० कोटी रुपयांचे नवीन कर्ज उभारल्याची घोषणा केली आहे. या रिफायनान्सिंग प्रक्रियेचा उद्देश कर्जाचा खर्च कमी करणे, कर्जाचा कालावधी वाढवणे आणि विद्यमान, तसेच भविष्यातील विकास योजनांना पाठबळ देण्यासाठी आर्थिक स्थिरता वाढवून कंपनीची भांडवली रचना सुधारणे हा आहे. या व्यवहाराचे अंडररायटिंग व सिंडिकेशन स्टँडर्ड चार्टर्ड आणि जेपी मॉर्गन चेस बँक, एन. ए., मुंबई शाखा यांनी केले आहे.

Rent vs Buy: घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘हे’ कॅल्क्युलेशन नक्की तपासा; 90% लोकांना माहित नाहीये अशीही बाजू

म्युच्युअल फंडकडून २५० कोटी रुपयांचे नॉन-कन्व्हर्टिबल डिबेंचर्स

कंपनीने एचडीएफसी म्युच्युअल फंडकडून आणखी २५० कोटी रुपयांचे नॉन-कन्व्हर्टिबल डिबेंचर्स उभारले आहेत, ज्यामुळे उच्‍च श्रेणीतील आर्थिक संस्थांमधील कंपनीची विविधता अधिक दृढ झाली आहे. जे.पी. मॉर्गन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने या एनसीडीसाठी स्ट्रक्चरिंग अॅडवायजर म्हणून काम पाहिले.

कंपनीच्या मागील कर्जाची आता पूर्णपणे परतफेड

कंपनीने यापूर्वी क्रिसिल रेटिंग्‍जकडून ‘एए-; स्‍टेबल’ रेटिंग मिळवल्याचे जाहीर केले होते, ज्याची मार्च २०२६ मध्ये पुन्‍हा पुष्टी करण्यात आली. या रेटिंगमधून इव्होनिथ स्टीलच्या पाठीशी असलेल्या घटकांमधील व्यवस्थापनाने केलेल्या सुधारणा दिसून येतात. ऑक्टोबर २०२४ मध्ये जाहीर केलेल्या कंपनीच्या मागील कर्जाची आता पूर्णपणे परतफेड करण्यात आली आहे.

इव्होनिथ स्टीलने महत्त्वपूर्ण कार्यात्मक सुधारणा

डिसेंबर २०२० मध्ये हा व्यवसाय ताब्यात घेतल्यापासून इव्होनिथ स्टीलने महत्त्वपूर्ण कार्यात्मक सुधारणा सुनिश्चित केल्या आहेत. ज्यामुळे उत्पादनात वाढ, प्रकल्पांची यशस्वी पूर्तता आणि व्यवसायाची एकंदरीत कामगिरी व नफाक्षमतेत वाढ झाली आहे. परिणामी, कंपनी आता आपल्या विकासाच्या पुढील टप्प्यासाठी प्रबळपणे सज्ज झाली आहे.

आमच्या दीर्घकालीन दृष्टीकोनाशी सुसंगत

या रिफायनान्सिंग प्रक्रियेबाबत मत व्‍यक्त करत इव्होनिथ स्टीलचे अध्यक्ष जय सराफ म्हणाले, “आमची वित्तपुरवठा धोरणे आर्थिकदृष्ट्या स्थिर आणि विकासोन्मुख व्यवसाय उभारण्याच्या आमच्या दीर्घकालीन दृष्टीकोनाशी सुसंगत आहेत. भांडवलाचा खर्च कमी करून आणि कर्जाची मुदत वाढवून आम्ही कार्यात्मक उत्कृष्टता, तसेच आमच्या वर्तमान व भविष्यातील विस्तारासाठी गुंतवणूक करण्यास अधिक उत्तम स्थितीत आहोत. इव्होनिथ स्टीलमध्ये आमचे भविष्याभिमुख संस्थेच्या उभारणीवर लक्ष केंद्रित आहे, जी आमच्या सर्व भागधारकांसाठी मूल्य निर्माण करेल.”

कंपनीची उत्तम कामगिरी आणि कार्यक्षम ऑपरेशन्स

या फायनान्सिंगमधून कंपनीची उत्तम कामगिरी आणि कार्यक्षम ऑपरेशन्समुळे निर्माण झालेली मजबूत आर्थिक स्थिती दिसून येते, विशेषतः जागतिक भू-राजकीय वातावरणातील सध्याच्या अस्थिर काळात हे महत्त्वपूर्ण आहे. कंपनी आता व्हॅल्यू चेनमध्ये डाउनस्ट्रीम प्रक्रियेत अधिक प्रगती करण्यासाठी आणि एकूण उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी अनेक नवीन भांडवली खर्च उपक्रम हाती घेत आहे. आपले मत व्‍यक्त करत इव्होनिथ स्टीलचे संचालक राजिब गुहा म्हणाले, “या फायनान्सिंगमुळे आमचा वित्तपुरवठा खर्च लक्षणीयरित्या कमी झाला आहे. हे केवळ यशस्वी भांडवल वाटपामुळे शक्य झाले आहे, ज्याने गुंतवलेल्या भांडवलावर उच्‍च स्तरीय परतावा मिळवून दिला आहे.”

Iran Us War : तेल कंपन्यांना दररोज 1600 कोटींचा फटका! धक्कादायक अहवाल समोर; सर्वसामान्यांवर इंधन दरवाढीची टांगती तलवार

Web Title: Evonith steel raises 2000 crore via refinancing and ncds see for more details marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2026 | 03:13 PM

Topics:  

  • Business News
  • Marathi News
  • Steel Plant
  • tata steel

संबंधित बातम्या

बक्कळ कमाई बॉस! YouTube वर 5 लाख व्ह्यूज मिळाल्यावर किती होईल कमाई? जाणून घ्या ‘ही’ खास माहिती
1

बक्कळ कमाई बॉस! YouTube वर 5 लाख व्ह्यूज मिळाल्यावर किती होईल कमाई? जाणून घ्या ‘ही’ खास माहिती

Ahilyanagar News: वणव्याचे थैमान! जांभळदरा परिसरात ९ शेतकऱ्यांच्या बागा खाक; ठिबकसह शेती साहित्याचे मोठे नुकसान
2

Ahilyanagar News: वणव्याचे थैमान! जांभळदरा परिसरात ९ शेतकऱ्यांच्या बागा खाक; ठिबकसह शेती साहित्याचे मोठे नुकसान

आता प्रवास करतानाही होणार कमाई! Flipkart आणि Uber ची ऐतिहासिक भागीदारी, राइड्सवर मिळणार ‘सुपरकॉइन्स’
3

आता प्रवास करतानाही होणार कमाई! Flipkart आणि Uber ची ऐतिहासिक भागीदारी, राइड्सवर मिळणार ‘सुपरकॉइन्स’

Jalgaon Crime News : अघोरी कृत्ये अन् मोठी लूट! फरार भोंदू बाबाला कधी पकडणार? पीडितांचा सवाल
4

Jalgaon Crime News : अघोरी कृत्ये अन् मोठी लूट! फरार भोंदू बाबाला कधी पकडणार? पीडितांचा सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.