Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India Saudi प्रवास आता अधिक सोपा अन् परवडणारा! Flyadeal चे मुंबईत आगमन; आठवड्यातून 5 दिवस Flights

India Saudi Arabia Flight Network : सौदीया ग्रुपची प्रसिद्ध बजेट एअरलाइन 'फ्लायडील'ने भारत आणि सौदी अरेबिया दरम्यान हवाई संपर्क वाढवत मुंबई ते रियाध दरम्यान थेट नॉन-स्टॉप विमानसेवा सुरू केली आहे. ३ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू झालेली ही सेवा आपल्या अत्याधुनिक A320neo विमानाद्वारे आठवड्यातून ५ दिवस चालवली जाणार आहेत.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Oct 05, 2026 | 06:25 PM
फ्लायडीलची मुंबई-रियाध थेट नॉन-स्टॉप विमानसेवा सुरू ( सौजन्य - सोशल मीडिया )

फ्लायडीलची मुंबई-रियाध थेट नॉन-स्टॉप विमानसेवा सुरू ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी!
  • फ्लायडीलची मुंबई-रियाध थेट नॉन-स्टॉप विमानसेवा सुरू
  • आठवड्यातून ५ दिवस उड्डाण
India Saudi Arabia Flight Network : फ्लायडील या सौदीया ग्रुपची वेगाने विस्तारणारी कमी खर्चाची विमान कंपनी आणि जीसीसीमधील सर्वात मोठ्या कमी खर्चाच्या एअरलाइनने मुंबई आणि रियाध दरम्यान आपली थेट नॉन-स्टॉप विमानसेवा सुरू केली आहे. हैदराबादसाठी सुरू केलेल्या विमानसेवेनंतर मुंबई कंपनीचे भारतातील दुसरे गंतव्यस्थान ठरले आहे, यामुळे कंपनीची प्रमुख आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील उपस्थिती अधिक दृढ झाली आहे. ( India Saudi Arabia Flight Network ) 

Fintech Industry : केवळ कर्ज देणे पुरेसे नाही, जबाबदार सवयी महत्त्वाच्या! फिनटेक क्षेत्राच्या भविष्याबाबत तज्ज्ञांचा मोठा दावा

रियाध-मुंबई विमानसेवा ३ ऑक्टोबर २०२६ रोजी सुरू झाली. एअरलाइनचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर कॅप्टन अब्दुलअझीझ बाहरी आणि चीफ पायलटकॅप्टन अली हकीम यांनी या फ्लाइटचे कार्यसंचालन पाहिले. ३ जुलै २०२६ रोजी हैदराबादसाठी विमानसेवा सुरू करून भारतातील बाजारपेठेत नुकतेच केलेल्या प्रवेशानंतर फ्लायडीलने ही सेवा सुरू केली आहे.

आठवड्यातून पाच दिवस सेवा

फ्लायडील आता आपल्या अत्याधुनिक A320neo एअरक्राफ्टद्वारे मुंबई आणि रियाध दरम्यान आठवड्यातून पाच दिवस सेवा चालवत आहे. यामुळे दोन्ही शहरांदरम्यान दरमहा ७,४०० हून अधिक नवीन आसनांची भर पडली आहे, ज्यासह भारत आणि सौदी अरेबिया दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अधिक पर्याय आणि सोयीसुविधा उपलब्ध झाली आहे.

नवीन फ्लाइट्सची वेळ प्रवाशांच्या दृष्टीने अत्यंत सोयीस्कर

नवीन फ्लाइट्सची वेळ प्रवाशांच्या दृष्टीने अत्यंत सोयीस्कर ठेवण्यात आली आहे, ज्यामध्ये मुंबईहून उड्डाण घेणारे विमान सकाळच्या मध्यावर रियाधमध्ये पोहोचेल आणि तसेच रियाधहून उड्डाण घेणारे विमान सकाळी मुंबईत दाखल होईल. यामुळे सौदी अरेबियातील आभा, दम्माम, जेद्दाह आणि मदिना यांसारख्या लोकप्रिय शहरांसाठी एकाच बुकिंगवर थ्रू-फेअरसह आणि बॅगेज थेट अंतिम गंतव्यस्थानापर्यंत पोहोचवून विनासायास कनेक्टिव्हिटी शोधणाऱ्या प्रवाशांसाठी हे वेळापत्रक अत्यंत अनुकूल ठरते.

इकॉनॉमी क्लास संरचनेत १८६ सीट्स

या मार्गावर चालवल्या जाणाऱ्या फ्लायडीलच्या A320neo एअरक्राफ्टमध्ये संपूर्ण इकॉनॉमी क्लास संरचनेत १८६ सीट्स उपलब्ध आहेत. प्रत्येक सीटवर यूएसबी-ए किंवा यूएसबी-सी चार्जिंग पोर्ट्स देण्यात आले आहेत. तसेच, यामध्ये एअरबसचे प्रसिद्ध एअरस्पेस केबिन इंटिरिअर, सामानासाठी अधिक जागा असलेले एक्स्ट्रा-लार्ज ओव्हरहेड बिन्स आणि आरामदायी प्रवासासह उत्साहवर्धक वातावरण निर्माण करणारे केबिन डिझाइन व लाइटिंगची सुविधा आहे.

वेगाने वाढणारी विमान वाहतूक बाजारपेठ

“भारत जगातील सर्वात मोठी आणि वेगाने वाढणारी विमान वाहतूक बाजारपेठ आहे, तसेच आम्ही आमच्या आंतरराष्ट्रीय नेटवर्कचा विस्तार करत असताना फ्लायडीलसाठी भारत धोरणात्मक प्राधान्य बाजारपेठ आहे. सौदी अरेबिया आता भारतातील आघाडीच्या तीन सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय प्रवास बाजारपेठांपैकी एक बनले आहे आणि दोन्ही देशांमधील प्रवास व पर्यटकांची ये-जा सातत्याने वाढत असल्याने प्रवाशांना सोयीस्कर, परवडणाऱ्या व विश्वासार्ह सेवांद्वारे कनेक्ट करण्याची प्रचंड क्षमता आम्हाला येथे दिसते.” फ्लायडीलचे अॅक्टिंग चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आणि सौदीया ग्रुपचे स्ट्रॅटेजीजचे एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट संजीव कपूर

मुंबईला सौदी अरेबियाच्या राजधानीशी कनेक्ट

कपूर पुढे म्हणाले: “मध्य पूर्व प्रदेशातील तिसरी सर्वात मोठी कमी खर्चाची विमान कंपनी म्हणून आम्ही भारतातील आमची उपस्थिती दृढ करण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि या प्रवासात मुंबई महत्त्वाचा टप्पा आहे. मुंबईला सौदी अरेबियाच्या राजधानीशी कनेक्ट करण्यासोबत ही नवीन सेवा एकाच बुकिंगवर विनासायास पुढील कनेक्टिव्हिटीद्वारे संपूर्ण किंगडममधील विविध ठिकाणांपर्यंत सोयीस्कर प्रवेश मिळवून देते. महत्त्वाचे म्हणजे, फ्लायडीलच्या फ्लाइट्स जेद्दाह येथील अत्याधुनिक टर्मिनल १ चा वापर करतात, जिथून मक्का आणि मदिना या दोन्ही शहरांसाठी थेट टर्मिनलवरूनच बुलेट ट्रेनची सुविधा उपलब्ध आहे, तसेच रियाध येथील टर्मिनल ४ चा वापर करतात, जे फ्लायडीलच्या विस्तृत देशांतर्गत नेटवर्कशी जलद आणि विनासायास कनेक्टिव्हिटी प्रदान करते. प्रवासाचे नियोजन करताना अधिक स्थिरता, सोयीसुविधा आणि मनःशांती प्रदान करणाऱ्या इतर नवीन उपक्रमांसह आम्ही परवडणाऱ्या दरांमध्ये विश्वासार्ह प्रवास देण्याप्रती आमच्या कटिबद्धतेशी बांधील राहत ग्राहक अनुभव अधिक उत्साहवर्धक करत आहोत.”

भारतात फ्लाय‍डीलचे वाढते कार्यसंचालन

सौदीया ग्रुपचा भाग म्हणून, फ्लायडील सौदी अरेबियाच्या व्हिजन २०३० ला पाठबळ देण्यासाठी आपल्या आंतरराष्ट्रीय नेटवर्कचा सतत विस्तार करत आहे. ही कंपनी विमान वाहतूक आणि पर्यटन क्षेत्राच्या विकासाद्वारे जागतिक कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या आणि जास्तीत-जास्त पर्यटकांना आकर्षित करण्याच्या किंगडमच्या महत्त्वाकांक्षी ध्येयामध्ये आपले योगदान देत आहे.

भारत आणि सौदी अरेबिया दरम्यान फ्लायडीलच्या फ्लाइट्सचे वेळापत्रक (स्थानिक वेळेनुसार)

प्रस्थान स्थान गंतव्य स्थान उड्डाणाचे दिवस प्रस्थान वेळ आगमन वेळ
रियाध मुंबई सोमवार आणि शुक्रवार वगळता सर्व दिवस ००:५५ ०७:४०
मुंबई रियाध ०८:४० १०:१५
रियाध हैदराबाद रविवार आणि मंगळवार वगळता सर्व दिवस २३:२५ ०६:५० (+१)
हैदराबाद रियाध सोमवार आणि बुधवार वगळता सर्व दिवस ०७:५५ १०:१५

PM Kisan योजनेचा 24 वा हप्ता येण्यापूर्वी 4 मोठ्या अपडेट! शेतकऱ्यांनो, तात्काळ करा ‘ही’ कामे!

Web Title: Flyadeal launches direct flight between mumbai and riyadh marathi ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2026 | 06:25 PM

Topics:  

  • flight
  • Saudi Arabia

संबंधित बातम्या

Flydubai FZ1073 : तेल अवीवमध्ये विमान पाडण्याचा होता कट; जाणून घ्या फ्लायदुबई विमानाच्या 30 सेकंदांच्या थराराची संपूर्ण कहाणी
1

Flydubai FZ1073 : तेल अवीवमध्ये विमान पाडण्याचा होता कट; जाणून घ्या फ्लायदुबई विमानाच्या 30 सेकंदांच्या थराराची संपूर्ण कहाणी

Yemen Crisis : हुथींविरोधात येमेनची मोठी लष्करी मोहीम; ताब्यातील सर्व प्रदेश परत घेण्याची घोषणा
2

Yemen Crisis : हुथींविरोधात येमेनची मोठी लष्करी मोहीम; ताब्यातील सर्व प्रदेश परत घेण्याची घोषणा

Flydubai Flight Incident: फ्लायदुबई विमान अपघातात  विमान उतरण्यापर्यंत प्रवाशांमध्ये झटापट; कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
3

Flydubai Flight Incident: फ्लायदुबई विमान अपघातात विमान उतरण्यापर्यंत प्रवाशांमध्ये झटापट; कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

Flydubai FZ1073 : फ्लायदुबई विमान घटनेबाबत नवा खुलासा; ओमानी को-पायलट 2024 मध्ये झाला होता सस्पेंड, जवळ आढळले अतिरेकी साहित्य
4

Flydubai FZ1073 : फ्लायदुबई विमान घटनेबाबत नवा खुलासा; ओमानी को-पायलट 2024 मध्ये झाला होता सस्पेंड, जवळ आढळले अतिरेकी साहित्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.