
फोटो सौजन्य सोशल मीडिया
देशभर सरकारी सत्ता आणि सरकारी संस्थांचे नियंत्रण पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी सैन्य, सुरक्षा दल आणि इतर लष्करी तुकड्यांना कारवाई सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अलीमी यांनी दूरचित्रवाणीवरील भाषणातून लष्करी कारवाई सुरू झाल्याची घोषणा केली. मंजूर करण्यात आलेल्या योजनेनुसार लष्कर आणि सुरक्षा यंत्रणांनी आपापली जबाबदारी पार पाडावी, असे आदेश त्यांनी दिले. या मोहिमेचा उद्देश येमेनच्या संपूर्ण भूभागावर सरकारी संस्थांचे नियंत्रण पुन्हा प्रस्थापित करणे हा आहे. सरकारी यंत्रणांना मोहिम पूर्ण होईपर्यंत हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.
नव्या मोहिमेची घोषणा अशा वेळी झाली आहे, जेव्हा येमेनमध्ये हुथी आणि सरकार समर्थक सैन्यामधील संघर्ष वाढला आहे. अलीकडे तैझ परिसरात लढाई तीव्र झाली असून, हुथींच्या हालचालींमुळे सरकारच्या ताब्यातील भागांवरील दबाव वाढला आहे. लाल समुद्र आणि बाब-अल-मंदेब सामुद्रधुनीचा परिसरही या संघर्षाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. या मार्गातून जागतिक व्यापार आणि तेल वाहतूक मोठ्या प्रमाणात होते.
Middle East Breaking : जगाची धडधड वाढली,तेलाच्या बाजारात खळबळ ;रियादच्या Aramco वर हुथींचा हल्ला
अलीमी यांच्या नेतृत्वाखालील येमेनचे सरकार सौदी अरेबियाच्या पाठिंब्यावर आहे. नव्या लष्करी मोहिमेत येमेनच्या सरकारी सैन्याची कारवाई आणि सौदीच्या हवाई कारवायांचा समन्वय होण्याची शक्यता आहे. संघर्ष वाढल्यास लाल समुद्रातील जहाज वाहतूक, तेल पुरवठा आणि आधीच गंभीर असलेल्या येमेनमधील मानवतावादी परिस्थितीवर परिणाम होऊ शकतो. येमेनमध्ये २०१४ पासून सुरू असलेल्या संघर्षाला या नव्या मोहिमेमुळे पुन्हा मोठी तीव्रता मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.