
Flydubai cockpit attack Captain Smit Machchhar
दुबईहून इस्रायलची राजधानी तेल अवीवकडे उड्डाण करणाऱ्या ‘फ्लायदुबई’ (Flydubai) विमानात हवेतच एक अत्यंत भयानक आणि थरारक घटना घडली आहे. इटालियन वृत्तपत्र ‘कॉरिअर डेला सेरा’च्या एका विशेष अहवालानुसार आणि आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, विमानाचा २९ वर्षीय ओमानी सह-वैमानिक हम्माम अल-हम्मामी (Hamam al-Hammami) याने विमान तेल अवीवमधील उंच इमारतींवर आदळवून ९/११ सारखा भीषण दहशतवादी अपघात घडवून आणण्याचा कट रचला होता. मात्र, विमानाचे भारतीय मुख्य वैमानिक कॅप्टन स्मित मच्छर (Captain Smit Machchhar) यांनी आपल्या प्राणाची बाजी लावून हा प्रयत्न उधळून लावला आणि विमानावरील १७४ प्रवासी आणि ६ कर्मचाऱ्यांचे प्राण वाचवले.(
३० सप्टेंबर रोजी या विमानाने सुरळीत उड्डाण केले होते. उड्डाणादरम्यान २९ वर्षीय सह-वैमानिक अल-हम्मामी याच्या वर्तनात सुरुवातीला कोणताही संशय आला नाही. परंतु, विमान सौदी अरेबिया आणि जॉर्डनच्या वरील आकाशात असताना, सह-वैमानिकाने प्रार्थनेचे निमित्त करून जागेवरून उठण्याचा बनाव केला. कॅप्टन स्मित मच्छर समोर पाहत असताना, अल-हम्मामीने कॉकपिटमधील आपत्कालीन कुऱ्हाडीने (Crash Axe) त्यांच्या डोक्यावर मागून अचानक जोरदार वार केले. या भीषण हल्ल्यामुळे कॅप्टन मच्छर गंभीर जखमी झाले आणि त्यांच्या डोळ्यांसमोर अंधारी आली.
त्याच वेळी सह-वैमानिकाने विमानाचा ताबा घेऊन ते तीव्र वेगाने खाली आणण्यास सुरुवात केली, ज्यामुळे बोईंग ७३७ MAX ८ (Boeing 737 MAX 8) विमान अवघ्या काही सेकंदांत तब्बल १६,००० फूट खाली कोसळले. जेव्हा विमान वेगाने खाली येत होते, तेव्हा अल-हम्मामीने विमानाची दोन्ही इंजिने बंद करण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून विमान थेट जमिनीवर किंवा इमारतीवर कोसळावे.
🇮🇱✈️🇸🇦 Cockpit fight on flydubai flight to Tel Aviv triggers hijack code, steep dive and emergency landing in Saudi Arabia Flydubai flight FZ1073, a Boeing 737 MAX 8 from Dubai to Tel Aviv, squawked 7700 (general emergency) and then 7500 (unlawful interference) about 90 minutes after departing on Sept. 30, then landed safely at Tabuk Airport in Saudi Arabia. flydubai confirmed an “incident” and that all passengers are safe and accounted for; per Ynet, citing the airline, the alert was triggered by a fight between the pilots. Passengers described screams, blood in the cockpit and a pilot stabbed with a pocketknife, with Israeli passengers helping crew restrain a man. Flight-tracking data shows a sharp dive from about 34,000 feet to around 17,000 in roughly a minute or two, with speed rising from 411 knots to nearly 600 (Times of Israel). Israeli fighter jets were scrambled and Israeli airspace was briefly closed. flydubai is sending a second aircraft to Tabuk. Confirmed by flydubai, Times of Israel, Ynet and the Jerusalem Post. Accounts conflict on who stabbed whom, and Israeli officials say one pilot may have tried to crash the plane; that assessment has not been confirmed by the airline or by any investigation. Motive is unknown. Dive figures come from public flight tracking and vary by source. Investigators in Saudi Arabia, the UAE and Israel will examine the flight recorders and passenger statements. The rare part is the mix of a hijack code and a cockpit struggle with two pilots involved, which is why authorities are treating an attempt to bring the plane down as a live possibility. Until the recorders are read, the confirmed picture is narrower and still remarkable: an airliner full of families nearly lost control over Saudi Arabia, and passengers and crew got it on the ground. Sources: flydubai; Times of Israel; Ynet; Jerusalem Post; Flightradar24 data. — 🔥🗞The Informant (@theinformant_x) September 30, 2026
redit – social media and Twitter
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 5 ऑक्टोबरला का साजरा केला जातो World Teachers Day? जाणून घ्या इतिहास, महत्त्व आणि डिजिटल युगातील शिक्षकांचे स्थान
गंभीर जखमी झालेल्या आणि रक्तबंबाळ झालेल्या कॅप्टन स्मित मच्छर यांनी भान हरपण्यापूर्वी आपल्या उर्वरित ताकदीचा वापर केला. त्यांनी अत्यंत हुशारीने कॉकपिटचा दरवाजा आतून उघडला. दरवाजा उघडताच विमानात उपस्थित असलेले इतर क्रू मेंबर्स आणि काही धाडसी प्रवासी तातडीने कॉकपिटमध्ये घुसले. त्यांनी तात्काळ माथेफिरू सह-वैमानिक अल-हम्मामीला पकडले आणि त्याच्यावर नियंत्रण मिळवले. विमानात प्रवास करत असलेल्या एका अन्य रिझर्व्ह पायलटच्या मदतीने, फक्त ३० सेकंदात कोसळणाऱ्या विमानावर पुन्हा ताबा मिळवण्यात आला नि ते हवेत स्थिर करण्यात आले. जर आणखी काही सेकंद उशीर झाला असता, तर एक खूप मोठी भीषण शोकांतिका घडली असती.
This incident clearly demonstrates that their fanaticism will never end. Yesterday, on a flydubai flight bound for Israel from Dubai, an Omani Muslim terrorist Co pilot attempted to crash the plane in a 9/11-style;
Indian Hindu Captain Smit Machchhar. thwarted attempt despite being injured — Kamalraj Singh (@kamalrajsingh_) October 1, 2026
credit – social media and Twitter
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Flydubai Flight Incident: फ्लायदुबई विमान अपघातात विमान उतरण्यापर्यंत प्रवाशांमध्ये झटापट; कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
या थरारक घटनेनंतर वैमानिकांनी तातडीने आपत्कालीन संदेश पाठवून विमानाची दिशा बदलली आणि सौदी अरेबियातील तबूक (Tabuk) विमानतळावर विमानाचे सुरक्षित आणीबाणीचे लँडिंग केले. सौदी अधिकाऱ्यांनी तात्काळ आरोपी सह-वैमानिक अल-हम्मामीला ताब्यात घेतले. त्यानंतर सर्व प्रवाशांना दुसऱ्या विमानाने सुरक्षितपणे तेल अवीव येथे पोहोचवण्यात आले.
तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, अल-हम्मामी याच्या कट्टरपंथी विचारांविषयी आणि त्याच्या भूतकाळाविषयी आधीही काही प्रश्न उपस्थित झाले होते. सध्या त्याला संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये हलवण्यात आले असून आंतरराष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. या अतुलनीय शौर्याबद्दल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी कॅप्टन स्मित मच्छर यांचे मनापासून कौतुक केले असून त्यांच्या धाडसाला सलाम केला आहे.