Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Foreign Direct Investment : सरकारचा मास्टस्ट्रोक! भारतात 4895 कोटींची परदेशी गुंतवणूक; FDI नियमांमधील बदलामुळे फायदा?

Foreign Direct Investment : केंद्र सरकारने थेट परकीय गुंतवणुकीच्या नियमांमध्ये ऐतिहासिक सुधारणा आणि सुटसुटीतपणा आणला. त्याचे आता सकारात्मक परिणाम आता दिसू लागला आहे. या नव्या नियमांमुळे परदेशी कंपन्यांचा भारतीय बाजारावरील विश्वास बऱ्याच मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे देशात तब्बल ४,८९५ कोटी रुपयांची परदेशी गुंतवणूक झाली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 24, 2026 | 12:12 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • सरकारचा मोठा मास्टस्ट्रोक!
  • भारतात 4895 कोटींची परदेशी गुंतवणूक
  • FDI नियमांमधील बदलामुळे फायदा?
Foreign Direct Investment : भारतीय अर्थव्यवस्था बळकट व्हावी यासाठी सरकार वेळोवेळी बदल आणि उपाययोजना करत असतात. आताही केंद्र सरकारने थेट परकीय गुंतवणुकीच्या नियमांमध्ये आणि धोरणांमध्ये बदल केले आहेत. त्याच्या परिणाम आता प्रार्थमिक स्तरावर दिसू लागला आहे. नियमांमध्ये केलेली ऐतिहासिक सुधारणा आणि सुटसुटीतपणा यामुळे धोरणांचा सकारात्मक परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होत आहे. या नव्या नियमांमुळे परदेशी कंपन्यांचा भारतीय बाजारावरील विश्वास वाढला आहे. त्यामुळे भारतातमध्ये गुंतवणूकीचा ओघ देखील वाढला आहे. यामुळे नेमका कोणत्या क्षेत्राला फायदा झालाय? आणि कोणत्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत? ( Foreign Direct Investment ) 

LIC Jeevan Umang Plan : कमाल…एलआयसीची ‘ही’ पॉलिसी ऐकली का? दरमहा 5000 गुंतवणुकीवर मिळणार 100 वर्षांपर्यंतचे लाइफ कव्हर

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, नवीन नियमांमुळे २९ गुंतवणूक प्रस्तावांमार्फत भारतात अंदाजे तब्बल ४,८९५ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. भारतीय बाजारासाठी ही आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे. हा निर्णय भारताच्या शेजारी संलग्न भूसीमा असलेल्या देशांतील गुंतवणूकदारांसाठी हा बदल महत्त्वाचा ठरतो. मे महिन्यात लागू झालेल्या सुधारित FDI नियमांनुसार, मर्यादित आणि नियंत्रक नसलेल्या हिश्श्याच्या काही विशिष्ट गुंतवणुकींना सरकारी मंजुरीच्या गरजेतून सूट देण्यात आली आहे.

FDI च्या नियमांमध्ये काय बदल ?

नवीन बदललेल्या प्रणालीनुसार, जर गुंतवणूक नॉन-कंट्रोलिंग असेल आणि १०% पेक्षा जास्त नसेल, तर तिला ऑटोमॅटिक रूटने परवानगी दिली जाऊ शकते. याचा अर्थ असा की, अशा प्रकरणांमध्ये गुंतवणूकदाराला सरकारची पूर्वपरवानगी घेण्याची गरज भासणार नाही. पण संबंधित सेक्टरमध्ये FDI मर्यादा आणि इतर अटींचे पालन करणे गरजेचं असणार आहे. ही सूट सर्व प्रकारच्या परकीय गुंतवणुकीला लागू होत नाही. तिची व्याप्ती केवळ अशा गुंतवणुकींपुरती मर्यादित आहे, ज्या सुधारित नियमांमध्ये नमूद केलेल्या अटी पूर्ण करतात.

2020 मध्ये का कडक केले होते नियम?

२०२० मध्ये, भारताने लँड बॉर्डर शेअर लागून असलेल्या देशांकडून येणाऱ्या परकीय गुंतवणुकीसाठीचे नियम अधिक कडक केले गेले होते. याचा उद्देश गुंतवणुकींवर महत्त्वाच्या भारतीय कंपन्यांमध्ये परदेशातून होणाऱ्या गुंतवणूकीवर सरकारची नजर ठेवणं हा होता. त्यावेळी, गुंतवणूकदाराची मालकी शेजारील देशात असली तरीही, छोटा हिस्सा असला तरीही अनेक प्रकरणांमध्ये सरकारी मंजुरीची आवश्यकता होती. नवीन नियमांनुसार मर्यादित आणि नियंत्रक नसलेल्या हिस्सेदारीसाठी काहीसा दिलासा देण्यात आला आहे. म्हणजे छोटा हिस्सा असेल आणि कंपनीवर त्याच्या नियंत्रणाचा अधिकार नसेल तर काही परिस्थितीत ही प्रक्रिया सोपी होऊ शकते. यामुळे अशा गुंतवणुकीची प्रक्रिया सुलभ होणार आहे.

नवीन नियमांचा परिणाम कोणत्या क्षेत्रांवर?

सरकारच्या मते, नवीन नियमांनुसार प्राप्त झालेले गुंतवणुकीचे प्रस्ताव विविध क्षेत्रांना परिणाम करतात. हे नियम बरेच क्षेत्र व्यापतात. यामध्ये माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, मॅन्युफॅक्चरिंग, फार्मास्यूटिकल्स, डेटा सेंटर्स आणि ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस यांचा समावेश आहे. या सगळ्याच्या समावेशावरून हे स्पष्ट होतं की सुधारित एफडीआय नियम एकाच क्षेत्रापुरते मर्यादित नाही. त्यामुळे अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक अधिक सुलभ करण्याचा यामागील उद्देश आहे.

गुंतवणूकीचे प्रस्ताव कोणत्या देशाकडून?

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या मते, २९ गुंतवणुकीचे प्रस्ताव मॉरिशस, अमेरिका, दक्षिण कोरिया, जपान, सिंगापूर, लक्झेंबर्ग आणि केमन आयलंड्स येथील गुंतवणूकदार किंवा संस्थांकडून आले आहेत. याचा अर्थ असा की, या गुंतवणुकीच्या प्रस्तावांचा स्रोत अनेक देश आणि ज्यूरिस्डिक्शनमध्ये पसरलेला आहे. पण या बदलावर चीनच्या संदर्भात सर्वाधिक चर्चा होत आहे. चीन हा भारताचा सर्वात मोठा भू-सीमा असलेला शेजारी देश आहे. त्यामुळे, या सगळ्या परिस्थितीवर चीन कशा पद्धतीने घेतो हे देखील पहावं लागेल.

गुंतवणूकदारांसाठी याचा काय फायदा?

नवीन नियमांनुसार, १०% पर्यंत हिस्सा असलेल्या नॉन-कंट्रोलिंग आणि पात्र गुंतवणूकदारांसाठीची शासकीय मंजुरी प्रक्रिया काढून टाकण्यात आली आहे, ज्यामुळे गुंतवणूक अधिक सोपी आणि जलद झाली आहे. पण, याचा अर्थ असा नाही की अशा गुंतवणुकी कोणत्याही अटीशर्ती नसतील. गुंतवणूकदारांना क्षेत्रीय मर्यादांसह सर्व लागू नियमांचे पालन करावे लागेल.

UPI Transaction : यूपीआय वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! डेबिट कार्डचा नियम ठरणार गेंमचेंजर; काय होणार फायदा?

Web Title: Foreign direct investment india attracts 4895 crores fdi after policy rule changes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2026 | 12:12 PM

Topics:  

  • Business News
  • FDI
  • foreign exchange
  • investment

संबंधित बातम्या

M1xchange Maharashtra: महाराष्ट्रातील छोट्या उद्योगांसाठी खुशखबर, आता पैशांची अडचण होणार नाही
1

M1xchange Maharashtra: महाराष्ट्रातील छोट्या उद्योगांसाठी खुशखबर, आता पैशांची अडचण होणार नाही

Share Market: शेअर बाजारात चहूबाजूने हाहाःकार! तेलापासून RBI पर्यंत 5 मोठे आघात
2

Share Market: शेअर बाजारात चहूबाजूने हाहाःकार! तेलापासून RBI पर्यंत 5 मोठे आघात

Bajaj Finance : FD गुंतवणूकदारांसाठी Good News! बजाज फायनान्सने वाढवले व्याजदर, ज्येष्ठांना ‘इतक्या’पर्यंत परतावा
3

Bajaj Finance : FD गुंतवणूकदारांसाठी Good News! बजाज फायनान्सने वाढवले व्याजदर, ज्येष्ठांना ‘इतक्या’पर्यंत परतावा

दुग्ध व्यवसाय क्षेत्रासाठी Findability Sciencesचे Lacta Insight लाँच; दुधाचे नुकसान टळणार आता बचत वाढणार
4

दुग्ध व्यवसाय क्षेत्रासाठी Findability Sciencesचे Lacta Insight लाँच; दुधाचे नुकसान टळणार आता बचत वाढणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.