Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Instamart Modak Orders : मुंबईकर मोदकाच्या प्रेमात… मिनिटाला 100 ऑर्डर्स; भायखळ्यातील एका ग्राहकाकडून तब्बल 3.88 लाखांची खरेदी

Instamart Modak Orders : यंदाच्या गणेशोत्सवात मुंबईकरांनी मोदक, पूजासाहित्य आणि सोन्याच्या नाण्यांची विक्रमी खरेदी केली आहे. क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म Swiggy Instamart च्या अहवालानुसार, गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी प्रतिमिनिट १०० मोदकांच्या ऑर्डर्सची नोंद झाली.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 26, 2026 | 05:30 PM
मुंबईकर मोदकाच्या प्रेमात... मिनिटाला 100 ऑर्डर्स ( सौजन्य - सोशल मीडिया )

मुंबईकर मोदकाच्या प्रेमात... मिनिटाला 100 ऑर्डर्स ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:

• मुंबईतील सर्वाधिक मागणीत मोदकांनी अव्वल स्थान मिळवले. त्यानंतर लाडू आणि काजू कतलीचा क्रमांक
• शहरातील सर्वाधिक खर्च सोने-चांदीची नाणी आणि मिठाईंसह एकूण ₹3.88 लाखांची खरेदी
• बाप्पाच्या आगमनाच्या आदल्या दिवशी मोदकांची मागणी प्रति मिनिट जवळपास 100 ऑर्डर्सच्या शिखरावर 

Instamart Modak Orders : गणेशोत्सव म्हणजे फक्त उत्सव नाही तर गोडाथोडाची मोठ्या प्रमाणावर असणारी रेलचेलही आहे. यंदाच्या गणेशोत्सवात मुंबईकरांच्या खरेदीच्या पसंतीत मोदक, ताजी फुले आणि पूजासाहित्य यांचा विशेष प्रभाव दिसून आला. विशेष म्हणजे मुंबईकर मोदकाच्या प्रेमात असलेले पाहायला मिळाले. भारतातील अग्रगण्य क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म Instamart च्या 14 ते 23 सप्टेंबरदरम्यानच्या ऑर्डर विश्लेषणानुसार, मिठाईंपैकी मोदक हे मुंबईकरांचे सर्वाधिक आवडते पर्याय ठरले आहे. त्यानंतर लाडू आणि काजू कतली यांचा नंबर लागता यांनाही बरीच पसंती मिळाली असल्याचं पाहायला मिळत आहे. ( Instamart Modak Orders ) 

Bank Strike Update : बँक ग्राहकांना मोठा दिलासा! 28, 29 अन् 30 सप्टेंबरला ‘या’ सहकारी बँकांचं काम नियमित सुरु राहणार

बाप्पाच्या आवडत्या मोदकाच्या प्रेमात

बाप्पाच्या आवडत्या मोदकांविषयीचे प्रेम मोठ्या ऑर्डर्समध्येही स्पष्ट दिसून आले. शहरातील एका ग्राहकाने तर फक्त मोदकांवरच तब्बल ₹8,277 खर्च केले आहे.

मिठाईंच्या एकूण मागणीतही मोठी वाढ

संपूर्ण उत्सवादरम्यान खरेदीचा कल धार्मिक विधींशी सुसंगत राहिला. 13 सप्टेंबर रोजी सकाळी 10:12 वाजता मोदकांच्या ऑर्डर्सने उच्चांक गाठला, तर त्याच दिवशी दुपारी 2:27 वाजता मिठाईंच्या एकूण मागणीतही मोठी वाढ झाली. गणेश चतुर्थीच्या सकाळी 7:45 वाजता फुलांच्या ऑर्डर्स सर्वाधिक नोंदवल्या गेल्या, तर सकाळी 8:47 वाजता पूजासाहित्याची मागणी शिखरावर पोहोचली. पाहुण्यांच्या स्वागतासाठी आणि घराच्या तयारीमुळे 19 सप्टेंबर रोजी साफसफाईच्या साहित्याची मागणीही लक्षणीयरीत्या वाढली.

सोने खरेदी आणि भेटवस्तूंवरही मनसोक्त खर्च

गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करणाऱ्या मुंबईकरांनी यंदा पारंपरिक सोने खरेदी आणि भेटवस्तूंवरही मनसोक्त खर्च केला. Byculla येथील एका ग्राहकाने विविध ऑर्डर्समधून तब्बल ₹3.88 लाख खर्च केले, तर Juhu आणि Kasarwadawali येथील ग्राहकांनीही मोठ्या प्रमाणात खरेदी केली. शहरातील सर्वात मोठ्या खरेदीच्या ऑर्डर्समध्ये सोने व चांदीची पूजेची नाणी मोठ्या प्रमाणात दिसून आली. दुसऱ्या क्रमांकाच्या ऑर्डरमध्ये 24 कॅरेट सोन्याचे नाणे, मोतीचूर लाडू आणि काजू कतली यांचा समावेश होता, तर तिसऱ्या क्रमांकाच्या ऑर्डरमध्ये सोन्याचे नाणे, फुलांच्या माळा आणि पूजासाहित्याचा समावेश होता.

अरे वाहह… Tax चं झंझटही होणार कमी, NRI कडून घर किंवा जमीन खरेदी करणे होणार सोपं! 1 ऑक्टोबरपासून बदलणार नियम

Web Title: Ganesh utsav shopping mumbaikars spend highest on modak and gold coins marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2026 | 05:30 PM

Topics:  

  • ganesh special modak
  • Swiggy

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.