Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Godrej Block Launch: गोदरेज कन्झ्युमरकडून ‘गोदरेज ब्लॉक’ लाँच; भामला फाऊंडेशनसोबत ५०० महिलांना देणार मोफत ‘पिंक ई-रिक्षा’

महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी पिंक ई-रिक्षा योजना सुरु केली आहे. महिलांना स्वतःच्या वाहनाच्या मालकीद्वारे रोजगार आणि उद्योजकतेच्या संधी उपलब्ध करुन देणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. अधिकाधिक महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा याकरिता भामला फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 23, 2026 | 03:09 PM
Godrej Block Launch: गोदरेज कन्झ्युमरकडून ‘गोदरेज ब्लॉक’ लाँच; भामला फाऊंडेशनसोबत ५०० महिलांना देणार मोफत ‘पिंक ई-रिक्षा’
Follow Us
Follow Us:
  • गोदरेज कन्झ्युमरकडून ‘गोदरेज ब्लॉक’ लाँच
  • भामला फाऊंडेशनसोबत ५०० महिलांना देणार मोफत ‘पिंक ई-रिक्षा’!
  • वाता सविस्तर बातमी!
मुंबई: गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडने आपल्या गोदरेज ब्लॉक या अंडरआर्म डिओडरंट आणि अँटीपस्पिरंट या ब्रँण्डचा देशभरात शुभारंभ केला. कंपनीने भागला फाऊंडेशनसोबत भागीदारी केली आहे. या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील महिलांना ५०० पिंक ई-रिक्षांचे वाटप करणयात येणार आहे. महिला सक्षमीकरण, रोजगार निर्मिती आणि पर्यावरणपूरत वाहतूक व्यवस्थेला प्रोत्साहन देणे हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे. बदलत्या जीवनशैलीत ग्राहकांच्या गरजा लक्षात घेत पर्सनल केअर उत्पादनेही उपलब्ध करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी पिंक ई-रिक्षा योजना सुरु केली आहे. महिलांना स्वतःच्या वाहनाच्या मालकीद्वारे रोजगार आणि उद्योजकतेच्या संधी उपलब्ध करुन देणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. अधिकाधिक महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा याकरिता भामला फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे. फाऊंडेशनकडून ५०० महिलांना ही योजना दिली जाईल. याकरिता लाभार्थ्यांचा आर्थिक सहभागाचा भार उचलण्यासोबत वाहनासाठी आवश्यक वित्तपुरवठा, प्रशिक्षण, नोंदणी आणि योजनेत सहभागी होण्यासाठी आवश्यक मार्गदर्शनही उपलब्ध करुन दिले जाईल. या उपक्रमात गोदरेज ब्लॉकनेही सहभाग नोंदवला असून, कंपनीच्यावतीने ५०० पिंक ई-रिक्षांचे वितरण केले जाईल. सहभागी महिला ई-रिक्षा चालकांना ब्लॉक फ्रेशनेस किटही दिले जाईल. त्यामुळे ग्राहकांसाठी डिझाइन केलेल्या नवीन पर्सनल केअर उत्पादनांचाही लाभ घेता येईल. या उत्पादनांमुळे कामाच्या ठिकाणी ताजेतवाने आणि आत्मविश्वासपूर्ण राहण्यास मदत होणार आहे.

Hydrogen Train vs Vande Bharat Fare: केवळ 5 रूपयात सुरू होणार हायड्रोजन ट्रेनचे तिकीट, वंदे भारतपेक्षा किती स्वस्त

नव्या ब्रँण्डच्या शुभारंभाप्रसंगी गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडचे पर्सनल केअर मार्केटिंग प्रमुख समीर सूर्यवंशी म्हणाले,” आजचे ग्राहक सतत बदलणारी सक्रिय जीवनशैली जगतात. त्यामुळे त्यांना सोयीस्कर आणि दर्जेदार उत्पादनांची गरज असते. आम्ही ग्राहकांची हीच गरज लक्षात घेत गोदरेज ब्लॉक बाजारात आणले आहे. हे उत्पादन एका आधुनिक लोशन स्वरुपात तयार करण्यात आले आहे. हे लोशन घाम आणि दुर्गंधीपासून संरक्षण देते. त्यामुळे ग्राहकांना दिवसभर आत्मविश्वासाने वावरता येते. त्यांना फ्रेश राहण्यासही मदत होते.”

कंपनीने अँटीपस्पिरंट वर्गवारीत गोदरेज ब्लॉक हे नवे उत्पादनही बाजारात आणले आहे. सहजतेने हलक्या स्वरूपात वापरता येणारे हे उत्पादन घाम आणि शरीराच्या दुर्गंधीपासून ४८ तासांपर्यंत संरक्षण करते. शिवाय अंडरआर्मच्या त्वचेची योग्य निगा राखण्यासही मदत करते. हे उत्पादन सर्व प्रकारच्या त्वचेसाठी सुरक्षित आणि योग्य असल्याचे कंपनीने स्पष्ट केले. हे उत्पादन ४० ग्रॅम आकर्षक पॅकमघ्ये उपलब्ध असून, बाजारात केवळ ९९ रुपयांत उपलब्ध आहे. गोदरेज ब्लॉक हे उत्पादन ब्लिंकिट, झेप्टो, बिगबास्केट आणि अमेझॉन यांसारख्या सर्व प्रमुख क्विक-कॉमर्स आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर सहज खरेदी करता येईल.

ITR Verification: करदात्यांनो, सावधान! ITR फाइल केलं, पण व्हेरिफाय नाही? जाणून घ्या ‘या’ Steps

Web Title: Godrej consumer launches godrej block partners with bhamla foundation for 500 pink e rickshaws marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2026 | 03:09 PM

Topics:  

  • Business News
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Mumbai Ganesh Murti Collapse : गणेशोत्सवाला पुन्हा एकदा गालबोट! कुर्ल्यात स्पीड ब्रेकरवर तोल गेला अन् गणेशमूर्ती रस्त्यावर कोसळली
1

Mumbai Ganesh Murti Collapse : गणेशोत्सवाला पुन्हा एकदा गालबोट! कुर्ल्यात स्पीड ब्रेकरवर तोल गेला अन् गणेशमूर्ती रस्त्यावर कोसळली

Mumbai : मूर्धा गावात महापुरुषांची छायाचित्रे कचऱ्यात, मोदींसह राष्ट्रनायकांची चित्रे आढळल्याने खळबळ
2

Mumbai : मूर्धा गावात महापुरुषांची छायाचित्रे कचऱ्यात, मोदींसह राष्ट्रनायकांची चित्रे आढळल्याने खळबळ

PM Modi Security Breach : मोदींच्या कार्यक्रमात मोठी खळबळ; बनावट PMO ID, बंदुकधारी बॉडीगार्डसह दोघे ताब्यात
3

PM Modi Security Breach : मोदींच्या कार्यक्रमात मोठी खळबळ; बनावट PMO ID, बंदुकधारी बॉडीगार्डसह दोघे ताब्यात

SPJIMR FT MiM Ranking : जगभरातील टॉप 50 बिझनेस स्कूल्समध्ये भारतीय संस्थांचा डंका! SPJIMR ने मिळवले 26 वे स्थान; पाहा काय आहे खास?
4

SPJIMR FT MiM Ranking : जगभरातील टॉप 50 बिझनेस स्कूल्समध्ये भारतीय संस्थांचा डंका! SPJIMR ने मिळवले 26 वे स्थान; पाहा काय आहे खास?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.