ई-व्हेरिफिकेशन (E-verification) (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
यामुळे भविष्यात अनावश्यक अडचणी निर्माण होऊ शकतात. म्हणूनच ITR भरल्यानंतर ई-व्हेरिफिकेशन झाले आहे की नाही, याची खात्री करणे प्रत्येक करदात्याचे पाहिले काम आहे. (ITR Verification)
आयकर विभागाच्या नियमांनुसार, ITR दाखल केल्यानंतर ठराविक कालावधीत त्याची ऑनलाइन पडताळणी करणे बंधनकारक आहे. जर ही प्रक्रिया वेळेत पूर्ण झाली नाही, तर रिटर्न अपूर्ण समजले जाऊ शकते.
अनेक करदाते रिटर्न भरल्यानंतर आपले काम संपले असं समजतात, मात्र हे दर्लुक्ष पुढे पहिल्यापासूनची सुरुवात असू शकते.त्यामुळे रिटर्न सबमिट केल्यानंतर ई-व्हेरिफिकेशनला प्राधान्य देणे गरजेचे आहे.
ई-व्हेरिफिकेशन करण्यासाठी कोणत्याही कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. आपल्या मोबाईल किंवा संगणकाच्या मदतीने काही मिनिटांत ही प्रक्रिया ऑनलाइन पूर्ण करता येते. करदात्यांच्या सोयीसाठी आयकर विभागाने अनेक पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे प्रत्येकजण आपल्या सुविधेनुसार योग्य पद्धतीची निवड करू शकतो.
सर्वाधिक वापरली जाणारी पद्धत म्हणजे आधारशी जोडलेल्या मोबाईल क्रमांकावर येणारा वन-टाइम पासवर्ड (OTP). यासाठी पॅन आणि आधार एकमेकांशी लिंक असणे तसेच आधारशी मोबाईल क्रमांक नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. OTP टाकताच काही सेकंदांत ई-व्हेरिफिकेशन पूर्ण होते. ही पद्धत जलद, सुरक्षित आणि वापरण्यास सोपी मानली जाते.
Stock Market: IPO बाजारात पुन्हा उत्साह! आज तीन मोठ्या कंपन्यांची एंट्री; गुंतवणूकदारांचे लक्ष कुठे?
Stock Market: IPO बाजारात पुन्हा उत्साह! आज तीन मोठ्या कंपन्यांची एंट्री; गुंतवणूकदारांचे लक्ष कुठे?
ज्यांच्याकडे इंटरनेट बँकिंग सेवा सुरू आहे, ते आपल्या बँकेच्या खात्यात लॉगिन करून थेट आयकर विभागाच्या पोर्टलवर जाऊन ई-व्हेरिफिकेशन करू शकतात. मात्र, बँक खाते आणि पॅनची माहिती योग्यरीत्या नोंदलेली असणे आवश्यक आहे. याशिवाय इलेक्ट्रॉनिक व्हेरिफिकेशन कोड (EVC) वापरूनही पडताळणी करता येते. हा कोड नोंदणीकृत बँक खाते किंवा इतर अधिकृत माध्यमातून मिळतो. कोड पोर्टलवर भरल्यानंतर प्रक्रिया पूर्ण होते.
काही करदाते डिमॅट खात्याच्या माध्यमातूनही ही सुविधा वापरू शकतात. तसेच व्यावसायिक आणि काही संस्थांसाठी डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट (DSC) वापरण्याची सुविधाही उपलब्ध आहे.
सर्वप्रथम आयकर विभागाच्या अधिकृत ई-फायलिंग पोर्टलवर लॉगिन करावे. त्यानंतर ई-व्हेरिफिकेशनचा पर्याय निवडून आवश्यक माहिती भरावी. यामध्ये पॅन क्रमांक, मूल्यांकन वर्ष (Assessment Year), रिटर्नचा पोच क्रमांक आणि इतर आवश्यक तपशील भरल्यानंतर पडताळणी पूर्ण करता येते.
काही प्रकरणांमध्ये लॉगिन न करताही केवळ पोच क्रमांकाच्या मदतीने ही प्रक्रिया करण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया अधिक सुलभ झाली आहे.
करतज्ज्ञांच्या मते, ITR भरल्यानंतर ई-व्हेरिफिकेशन पुढे ढकलणे टाळावे. अनेकजण ही प्रक्रिया विसरतात किंवा अंतिम तारखेची वाट पाहतात. त्यामुळे नंतर रिटर्नशी संबंधित अडचणी निर्माण होण्याची शक्यता वाढते.
Elon Musk ला एका दिवसात तब्बत $44000000000 नुकसान, धाडकन कोसळले Tesla आणि SpaceX चे शेअर्स!
वेळेत पडताळणी केल्यास रिटर्नची प्रक्रिया सुरळीत पूर्ण होते आणि पुढील टप्प्यांमध्ये कोणताही अडथळा येत नाही. त्यामुळे ITR दाखल केल्यानंतर ई-व्हेरिफिकेशन पूर्ण झाले आहे याची खात्री करणे ही प्रत्येक करदात्याची महत्त्वाची जबाबदारी आहे.






