सोने खरेदीची इच्छा (Gold Buying) असलेल्यांसाठी सध्या सुवर्ण संधी आहे. भारतीय सराफा बाजारात मागील आठवड्यापासून सोन्या-चांदीच्या किमती (Gold-silver price) जवळपास स्थिर आहेत. या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किंमतीत मागील आठवड्यापासून काहीसा चढ-उतार पाहायला मिळतोय, मात्र एकंदरीत किंमतीत फार तफावत जाणवत नाही. बुधवारीदेखील सोन्याचे दर स्थिर आहेत तर चांदीच्या किंमतीत (Silver Price) अगदी किंचित घसरण दिसून येतेय.
[read_also content=”भोंग्यांच्या आवाजाची पातळी सांभाळा; गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची मशिदींना सूचना https://www.navarashtra.com/maharashtra/control-the-level-sound-of-the-loudspeaker-on-masjid-home-minister-dilip-walse-patils-instruction-to-mosques-nrvk-265584.html”]
देशाची राजधानी दिल्लीत आज २२ कॅरेट सोन्याचे दर ४८,००० रुपये प्रति तोळा तर २४ कॅरेट सोन्याचे दर ५२,३७० रुपये प्रतितोळा एवढे नोंदले गेले. तर महाराष्ट्राची राजधानी मुंबईत सोन्याचे २२ कॅरेटचे दर ४८,००० रुपये प्रति तोळा आणि २४ कॅरेटचे दर ५२,३७० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. मागील दहा दिवसांचे सोन्याचे सरासरी दर पाहिले असता बावीस कॅरेट सोन्याचे दर ४७,७०० ते ४८१०० रुपये प्रति तोळा या पातळीवरच स्थिर असल्याचे दिसून आले आहे.
प्रमुख शहरांतील २४ कॅरेट सोन्याचे दर – दिल्ली – ५२,३७० रुपये प्रतितोळा, मुंबई – ५२,३७० रुपये प्रतितोळा, नागपूर- ५२,४७० रुपये प्रतितोळा, पुणे- ५२,४७० रुपये प्रतितोळा, नाशिक- ५२,४७० रुपये प्रतितोळा, औरंगाबाद- ५२,४८० रुपये प्रतितोळा
प्रमुख शहरांतील चांदीचे दर – दिल्ली- ६६,३०० रुपये प्रति किलो, मुंबई- ७१,००० रुपये प्रति किलो, नागपूर- ६६,३०० रुपये प्रति किलो, पुणे- ६६,३००रुपये प्रति किलो, नाशिक – ६६,३०० रुपये प्रति किलो, औरंगाबाद- ६६,३०० रुपये प्रति किलो